एकूण 219 परिणाम
मे 31, 2019
नवी दिल्ली - ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत एका छोट्याशा झोपडीत राहत होते.. सायकलवर गावभर फिरायचे.. निवडणुकीच्या प्रचार त्यांनी चक्क रिक्षातून केला.. आता ते देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या संसदेत दाखल झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या भक्कम सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.. नाव आहे...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री...
मे 29, 2019
भुवनेश्‍वर : विधानसभा निवडणुकीत एकूण 146 पैकी 112 जागांवर 'बीजेडी'ने विजय मिळविल्यानंतर नवीन पटनाईक यांनी आज (बुधवार) पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशाला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फणी चक्रीवादळाच्या झंझावाताला सामोरे जावे...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 26, 2019
नवी दिल्ली : ओडिशातील एका 25 वर्षीय तरूणीने सर्वात कमी वयाची लोकसभा सदस्य होण्याचा मान पटकाविला. चंद्रानी मुर्मू असे त्यांचे नाव असून त्या अभियांत्रिकीच्या पदवीधारक आहेत. आदिवासी मतदारांचे वर्चस्व असलेल्या केंजर या मतदार संघातून बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली....
मे 24, 2019
पुरी: ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे. पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये लढाई होती. या...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 07, 2019
भुवनेश्वर : ओडिशात आलेल्या 'फणी' चक्रीवादळाने आत्तापर्यंत 29 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता येथील नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले जात असून, येथील नागरिकांना बचावपथकाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. ही कार्यवाही आजपासून(मंगळवार) सुरु करण्यात आली. 'फणी' चक्रीवादळाने...
मे 07, 2019
भुवनेश्‍वर : फणी वादळामुळे ओडिशामध्ये झालेल्या हानीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. यानंतर मोदींनी ओडिशाला केंद्र सरकारकडून अतिरिक्त एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.  या वादळाची पूर्वसूचना येताच केंद्राने पूर्वीच 381 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. या वादळामुळे ओडिशामध्ये...
मे 07, 2019
गोपीबल्लावपूर ः "फणी' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी खरगपूरमध्ये आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकत्यातील माझ्या कार्यालयात केलेल्या दूरध्वनीवेळी मी उपलब्ध होऊ शकले नाही, असा दावा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. मोदी जातील तेथे उपस्थित...
मे 07, 2019
तामलूक (पश्‍चिम बंगाल) ः "फणी' चक्रीवादळाच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. "फणी' चक्रीवादळामुळे पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला...
मे 06, 2019
नुकत्याच येऊन गेलेल्या "फणी' चक्रवाताच्या तडाख्याच्या जखमांनी ओडिशा राज्य घायाळ झाले असले; तरी ते ताठ मानेने उभे आहे, याचे श्रेय नि:संशय तेथील प्रशासनाला द्यायला हवे. भारतातले एक आर्थिकदृष्ट्या यथातथा परिस्थिती असलेले छोटेसे राज्य निसर्गाच्या प्रकोपाला एकजुटीने तोंड देत नामोहरम करते,...
मे 05, 2019
भुवनेश्वर: 'फणी' चक्रीवादळाने ओडिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी 29 वर पोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'फणी' चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या भागातील नागरिकांना आता पिण्याचे...
मे 05, 2019
भुवनेश्वर, कोलकता : ओडिशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या फणी चक्रीवादळाने आज सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश केला. फणी चक्रीवादळाची तीव्रता आज काही प्रमाणात कमी झाली असून, ते बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या चक्रीवादळामुळे पश्‍चिम...
मे 04, 2019
भुवनेश्वर/कोलकता : फणी चक्रिवादळाने आज (शनिवार) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा दिला असून, कोलकता शहरात जोरदार पाऊस पडत आहे. कोलकतातील विमानसेवा काहीवेळ बंद ठेवण्यात आली होती, तर अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  फणी वादळाने ओडिशाला शुक्रवारी जोरदार तडाखा दिला. मुसळधार पाऊस आणि ताशी...