एकूण 3047 परिणाम
मार्च 22, 2019
औरंगाबाद : आमदारांकडून जेवणाची मदत मागणाऱ्या "त्या' मुलींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियमांचा बडगा उचलला आहे. अवघ्या दोन दिवसात वसतिगृह सोडण्याचे आदेश योगिता तुरुकमाने आणि कोमल शिनगारे या विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसमोर आता जायचे कुठे हा प्रश्‍न...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई - राहुल...
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 22, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झालेली आहे. राज्यातही त्यांची आघाडी झाली असून, ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरूच असले तरीही "सप' आणि "बसप...
मार्च 21, 2019
औरंगाबाद  - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही पूर्वसूचना देणार आहे. ग्राहकांना महावितरणचा कर्मचारी रीडिंगसाठी केव्हा येत आहे, याची सूचना एक दिवस अगोदर "एसएमएस'ने मिळणार आहे.  महावितरणने ऑगस्ट 2016...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली....
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी...
मार्च 19, 2019
माजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकरा वाजता घडली. माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : वाढत्या एनपीएमुळे आयडीबीआय बॅंक संकटात सापडली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) या बॅंकेतील 51 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यानंतर आयडीबीआय आता खासगी बॅंक म्हणून ओळखली जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली आहे. दरम्यान, बॅंकेचे नाव बदलण्याची शिफारस एलआयसीने...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - रस्त्यावरील वाढत्या ताणामुळे मराठवाड्याला सार्वजनिक वाहतुकीचा नवा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत. "सकाळ'ने मांडलेल्या विषयाची दखल घेत रेल्वे बोर्डाने औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. शिवाय औरंगाबादचा समावेश असलेल्या आणखी तीन मार्गांची...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - निवडणुकीत आपली कला सादर करून प्रचारात रंग भरणाऱ्या, नेते, पक्षांचा उदो उदो करणाऱ्या लोककलावंतांच्या मानधन किंवा बिदागीचा प्रश्‍न येतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर बेरंग भाव उमटतात. प्रत्येक निवडणुकीतील लोककलावंतांना ही अनुभूती येत असून, ही उपेक्षा थांबावी, अशी अपेक्षा या...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरात जिवंत साठा संपल्यात जमा आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी उपशातही तब्बल 20 टक्‍क्‍यांपर्यंत घट येत आहे. आपत्कालीन पंप सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाणी जरा जपूनच वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - मॅनहोलमध्ये अनधिकृत टाकलेल्या पाण्याच्या मोटारीच्या फुटबॉलमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेले तीन शेतकरी विषारी वायूमुळे अत्यवस्थ झाले. त्यांनावाचविण्यासाठी आणखी चौघे गेले. सातही जण गुदमरल्याने यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर असून, एकजण मॅनहोलमधून...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - कापूस खरेदी करून करमाड परिसरातील व्यापाऱ्यांसह 28 शेतकऱ्यांना फसविणाऱ्या गुजरातच्या चार व्यापाऱ्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.  राजूभाई जोशी, गौरव राजकोट, राकेश आचार्य व अजय जोशी (रा. सर्व राजकोट, गुजरात) अशी...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - असुविधांचे माहेरघर असलेल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या तिजोरीतून सोयीसुविधांसाठी किती खर्च केला, असा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महापालिकेला केला आहे.  चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांचे त्रांगडे सुटण्याचे नाव घेत नाही. चिकलठाणा...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता....
मार्च 18, 2019
औरंगाबाद - धनगर एसटी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आपल्या हक्‍काचे व विकासाचे प्रतीक आहे. हे आरक्षण न्यायालयीन लढ्याने मिळणारच असल्याचा ठाम विश्‍वास माजी पोलिस आयुक्त मधू शिंदे यांनी व्यक्त केले.  अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचतर्फे...