एकूण 852 परिणाम
मे 23, 2019
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले. रत्नागिरी सिंधुदूर्ग...
मे 23, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते.  बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते - चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३,  रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९ राजपूर - विनायक राऊत ३१११ निलेश राणे १४३५...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना...
मे 15, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे...
मे 15, 2019
कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले....
मे 15, 2019
कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी तसेच वाहन चालक बेहाल झाल्याचे चित्र होते. शहरातील अंतर्गत रस्ते देखील वाहतूक कोंडीने ठप्प झाले होते. महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरण कामासाठी केलेले ठिकठिकाणचे अडथळे आणि त्यावर मार्ग काढण्यात संबंधित...
मे 10, 2019
कणकवली - कोकणातील प्राचीन मंदिरे वगळून कोकणला फारसा पुरातन इतिहास नाही, असा गैरसमज असताना याला छेद देणारे संशोधन पुरातत्व वस्तुसंग्रहालयतर्फे कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे केले आहे. कोळोशीमधील गुहेमध्ये आदिमानवाची वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत. इसवी सनपूर्व दहा हजार...
मे 09, 2019
कणकवली - शहरालगतच्या जानवली नदीपात्र कोरडे पडल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्‍यता निर्माण झाली आहे. जानवली परिसरातील ऊस शेती देखील धोक्‍यात आली आहे. जानवली नदीचा नदी पुनरूज्जीवन योजनेत समावेश करण्यात आला होता; मात्र निधीअभावी ही योजना देखील रखडली आहे. फोंडाघाट येथील डोंगरातून...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
मे 07, 2019
कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत,...
मे 03, 2019
कणकवली - कोकण रेल्वेने आतापर्यंतच्या सेवेत प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधेवर अधिक भर दिला आहे. प्रवासी सुरक्षा व सोयीसुविधा सुधारण्यासाठी पुढाकार म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील लोकप्रिय मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचे रूप पालटणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले एलएचबी कोच...
एप्रिल 29, 2019
कणकवली - वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु पाटबंधारे धरणाच्या पातळीत कमालीची घट होत आहे. आतापर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर आहे. त्यामुळे जूनच्या पहिला आठवड्यात पाऊस झाला तर ठीक अन्यथा दुष्काळी परिस्थिती ओढावेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  तापमान...
एप्रिल 28, 2019
कणकवली - मराठा क्रांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा मेळावा 12 मे रोजी होणार आहे. यासाठी 5 मे रोजी नियोजनाची बैठक ओरोस येथील वसंत स्मृती सिडको विश्रामगृह हॉटेल चैतन्यजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे.  या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे....
एप्रिल 24, 2019
सावंतवाडी -  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात ६४.४२ टक्के मतदान झाले आहे. सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथील मतदानाने राणे तरणार की हरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लक्ष ६६ हजार ७२० मतदारांपैकी ४ लक्ष २९ हजार ५१४ (६४.४२ टक्के...
एप्रिल 24, 2019
कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात सुमारे ६५ टक्‍के...
एप्रिल 23, 2019
रत्नागिरी - दुपारी चार वाजेपर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 38.36  टक्के मतदान झाले होते. मतदार संघात 1942 मतदान केंद्रावर आज मतदान होत आहे. मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघा आहेत. यापैकी रत्नागिरी 39.02 टक्के, चिपळूण 36.73 टक्के, राजापूर 39.19 टक्के, कणकवली 36.52...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 20, 2019
कणकवली - निवडणूक कामकाज आटोपून घरी जाताना मोटारीची धडक बसल्याने निर्भय लक्ष्मण मयेकर (वय ५३, सध्या रा. जानवली, शिक्षक कॉलनी, मूळ बांदा, देऊळवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल (ता. १८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मयेकर पाटबंधारे खात्यात नोकरीला होते.  महायुतीची सभा आटोपल्यानंतर...