एकूण 251 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालं...भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा आघाडी झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी युती होणे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे होते. सांगली तर काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला,  तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी आघाडी झाली. त्याला...
फेब्रुवारी 19, 2019
परभणी : तब्बल साडेचार वर्ष एकत्र संसार करत असतांनाही एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना-भाजप या दोन समविचारी पक्षाची सोमवारी परत युती झाली. परंतू परभणी जिल्ह्यात मागील साडेचार वर्षाच्या काळात दुभंगलेली मने या युतीमुळे जुळतील का? सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते भाजपवासी...
फेब्रुवारी 19, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची 'टाळी' दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी...
फेब्रुवारी 19, 2019
प्रि य सौभाग्यवती कमळाबाई ईस अनेकाअनेक इष्ट नमस्कार. माझे पत्र आल्याने तुजला आश्‍चर्य वाटले असेल. स्वत:स अनेकानेक चिमटे काढून पाहिले असशील! आम्हीही (पत्र लिहीत असताना) स्वत:स इतके चिमटे काढून पाहिले आहेत की हे पत्र लिहून पुरे होईतोवर आमच्या सर्वांगावर लालेलाल वळांची नक्षी उमटलेली असेल, असे वाटते....
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढातून आव्हान देण्याची तयारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दाखवली आहे. पत्रकारांशी गुरुवारी बोलताना ते म्हणाले, ‘‘आपला पक्ष भाजपचा घटक पक्ष म्हणूनच निवडणुकांना सामोरा जाईल पण ‘कमळ...
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 14, 2019
जे पूर्वी भाजपवाले ओरडत होते, तेच आरोप आता काँग्रेसवाले करत आहेत. ‘चौकीदार चोर आहे...’ हा आरोप राफेलसंदर्भातला आहे. तो आता महापालिकेतील अमृत योजनेला उद्देशून झाला. भाजपला तो चांगलाच झोंबला. ‘सत्ता द्या. सहा महिन्यांत सर्व घोटाळे बाहेर काढतो...’ असे सहा महिन्यांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील...
फेब्रुवारी 13, 2019
बारामती- शहरात काही महत्वाच्या ठिकाणी लागलेल्या फलकांनी आज वातावरण ढवळून निघाले. बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही, समस्त बारामतीकर, अशा आशयाचे फ्लेक्स आज शहरातील प्रशासकीय भवन, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या दारावर काही अज्ञात व्यक्तींनी लावले होते...
फेब्रुवारी 13, 2019
सर्वप्रथम हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की आम्ही कमळ पक्षाचे शतप्रतिशत मेंबर आहो! अकरा कोटी मेंबरे करणारी ही जगातली सर्वांत मोठी लोकशाही पार्टी असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पक्षासाठी आम्ही तनमन वेचले आहे... धन वेचण्याची संधी अजूनी मिळालेली नाही, म्हणून तेवढे फक्‍त राहून गेले आहे...
फेब्रुवारी 12, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे. युती झाली तर मैत्रीपूर्ण लढत करून विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष...
फेब्रुवारी 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. (बुद्रुक)  (सौभाग्यवती कमळाबाई (त्यातल्या त्यात) लगबगीने हालचाली करत आवराआवर करत आहेत. दासदासींना सूचना देत आहेत. "चला,चला, तयारीला लागा!', बाई, बाई कित्ती उशीर झाला...आवरायला नको का?' वगैरे बडबड एकीकडे चालू आहे. दुसरीकडे सारखं दरवाजाकडे टुकून पाहात आहेत. अब आगे...) ...
फेब्रुवारी 07, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी संघटनेकडून स्थानिक नेत्यांना ताकद देण्यात आली. साडेचार वर्षात कमळ फुलल्याचा भास झाला. मात्र, स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेतृत्व निर्माण झाले नाही. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला आहे. स्वतंत्र लढायचे झाल्यास भाजपकडे...
जानेवारी 29, 2019
सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी नागरीकांसाठी बसण्यासाठी बांधलेल्या कट्ट्यांवर भाजपचे कमळ चिन्ह रंगविण्यात आले आहे. त्यावर फुली मारत सोलापूरकरांनी भाजपला धोक्याची घंटा दिली आहे. तर, या प्रकरणी दोषींवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणाचा गु्न्हा दाखल करण्याची मागणी कांग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश...
जानेवारी 29, 2019
प्रिय अहो, सौ. कमळाबैचा शिर्साष्टांग नमस्कार. फार दिसात गाठभेट नाही. ‘दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे’ हे जुने गाणे गुणगुणत कसेबसे दिवस काढत्ये आहे. ‘आता आपण वेगळे राहू आणि गुपचूप भेटत जाऊ’ असे तुम्ही सांगितल्याने हे दिवस आले!! (गेले नाहीत, आले, आले!!) मी म्हणून तुमचे ऐकले. दुस्री कोणी...
जानेवारी 21, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून युवक कॉंग्रेसनेही वेगळी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या 23 कलमी कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील  प्रत्येक बूथ वर 5 कमळ...
जानेवारी 20, 2019
पुणे - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या राज्यात मंत्री असले तरी त्यांची आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची दांडगी इच्छा आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण बारामतीतून लढणार, आणि तेही कपबशी ही निशाणी घेऊन, असा पुनरुच्चार त्यांनी केला.  जानकर यांनी...
जानेवारी 16, 2019
मुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यामुळेच बिंग फुटल्याचे उघड झाले.  काँग्रेसमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या तीन आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले आहे त्याचा सुगावा लवकर...
जानेवारी 15, 2019
बंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप नेते दिल्लीतूनच ‘ऑपरेशन कमळ’च्या हालचाली करीत असून, आपल्या पक्षाचे आमदार काँग्रेस व ‘धजद’च्या गळाला लागू नयेत यासाठी त्या सर्वांना...