एकूण 80 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
कऱ्हाड ः जनतेला गृहीत धरून ज्यांनी पक्षांतर केले. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी खासदारांनी एकही काम...
सप्टेंबर 17, 2019
सातारा : "पार्टी वुइथ डिफरन्स'चा नारा देत व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर टीका करत भारतीय जनता पक्ष 2014 मध्ये राज्यात सत्तेत आला. त्यानंतर पाच वर्षे जिल्ह्यातील त्यांच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी पक्षवाढीसाठी प्रयत्नांची शिकस्त केली; परंतु त्यांना पक्षातून सक्षम कार्यकर्ता तयार करता आला...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली.  दरम्यान सातारा एमआयडीचा प्रश्नाचा लवकरच निर्णय होईल. दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या धर्तीवर मुंबई -...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून काही मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन चर्चा केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेल्याचे सांगितले. त्यांनी ही आकडेवारी कोठुन आणली हे मला माहीत नाही. मात्र, उद्योगामध्ये पहिल्या तीन क्रमांकात असणारा महाराष्ट्र ते मुख्यमंत्री असताना आठव्या...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. फक्त विदर्भ मराठवाड्यातच निधी दिला जात असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र आम्ही सरकार म्हणुन विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''महापुरामुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कऱ्हाडसह महामार्गाची मोठी हानी झाली. पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पावसाचे जागतिक रेकाॅर्ड तोडणारा पाऊस महाबळेश्वरमध्ये झाला. त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँक आणि एशीयन डेव्लपमेंट बँकेच्या सहकार्याने...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून...
सप्टेंबर 16, 2019
सातारा ः साताऱ्याची हद्दवाढ मंजूर झाली असून रविवारी (रात्री) मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी यांना या बाबतची सूचना कऱ्हाड येथे रात्री अकरा वाजता दिली. तसेच सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटी करण्यास 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सोमवारी, ता. 15 महाजनादेश...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी आज, अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कऱ्हाडकडून कोल्हापूर मार्गावर जाताना, शिराळा...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती (कै.) शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना भाजपचा मफलर गळ्यात घातला....
सप्टेंबर 14, 2019
कऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर...
सप्टेंबर 12, 2019
सातारा  : येथील पोवई नाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाने आता गती घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चारी बाजूने तसेच राजपथाकडील वाहतूक सध्या सुरू होत आहे. पाऊस उघडल्यानंतर या रस्त्यांवरून खडीकरण, डांबरीकरण केले जाणार असून, त्यामुळे सातारकरांची बहुतांश कोंडी सुटण्यास मदत...
सप्टेंबर 10, 2019
कऱ्हाड ः महापूर ओसरल्यानंतर शहरासह तालुक्‍यामध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीपासून 455 डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत त्यातील तीन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सुमारे 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एका...
सप्टेंबर 09, 2019
सातारा : जिल्ह्यात पावसाने यावर्षी विक्रम केला असून, आजअखेर 17 हजार 137 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांची सरासरी पावसाने मोडली आहे. सरासरीच्या 1318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगार समजले जाणाऱ्या नवजापेक्षाही सर्वाधिक 7631.1 मिलिमीटर पाऊस महाबळेश्‍वरला झाला आहे.  सातारा...
सप्टेंबर 09, 2019
कऱ्हाड ः सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासह शौच करणाऱ्यांना जागेवर दंड करण्याचे शासनाने पालिकांना अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात "स्पॉट फाईन' करण्यात येथील पालिका अग्रेसर राहिली आहे. मात्र, उत्सव काळात त्या "स्पॉट फाईन'ला ब्रेक लागला आहे. वास्तविक उत्सव काळात "स्पॉट फाईन' काटेकोर राबविण्याची...
सप्टेंबर 09, 2019
मसूर : कारखाना विस्तारवाढीसंदर्भात शासनाची चुकीची धोरणे आहेत. न्यायासाठी न्यायालयात जावे लागत आहे. अडचणींवर मात करून कारखान्याची विस्तारवाढ करण्याचा ठाम निर्धार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. शासनाने आर्थिक साहाय्य दिल्याशिवाय ठिबक सिंचनाला...
सप्टेंबर 07, 2019
नागठाणे  : पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे (ता. सातारा) येथील उड्डाणपुलाच्या बांधकाम दर्जाविषयी आज पुन्हा प्रश्न उभे राहिले. साताऱ्याकडून कऱ्हाडकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आज खड्डा पडल्यामुळे उड्डाणपुलाखाली सुमारे तीन फूट व्यासाचे कॉंक्रिट तुटून पडले. महामार्गावर शेंद्रे येथे लाखो रुपये खर्चून मोठा...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी...