एकूण 60 परिणाम
जून 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने कांद्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घट दिसून आली असून, त्यानंतर एक आठवडा उलटूनही भावातील घसरण तशीच असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने सहा...
जून 02, 2019
औरंगाबाद - कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यावर सरकारने तत्काळ अनुदान जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा...
मे 10, 2019
कांद्याला वर्षभर कायम मागणी असते. अशा वस्तूला भावही चांगला मिळतो हा अर्थशास्त्राचा नियम आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत उलटेच घडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते. यावर उपायासाठी कांदा प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांच्या जेवणात कांदा...
एप्रिल 23, 2019
सोलापूर  - कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत खर्च परवडत नसल्याने सरकारने प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले; परंतु आता राज्यातील चार लाख ९३ हजार २२८ शेतकऱ्यांचे ३९३ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान आचारसंहितेमुळे अडकले आहे. सद्यःस्थितीत...
मार्च 15, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीचे रण पेटत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या शेतकऱ्यांना क्विंटलला ८०० रुपये भाव मिळावा म्हणून ‘मास्टर स्ट्रोक’ खेळलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचा वांदा ठरलेला आहे. अगोदरच यंदा उन्हाळ, पोळ आणि रांगडा कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली....
मार्च 11, 2019
सोलापूर - उत्पादनाच्या तुलनेत कमी किमतीने कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना आचारसंहितेपूर्वी अनुदान मिळावे, यासाठी सरकारने काहीच निर्देश दिले नाहीत. मात्र, लोकसभेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या उद्देशाने तीनवेळा मुदतवाढ देऊन अधिकाऱ्यांचा ताण वाढविल्याचे चित्र आहे....
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - गतवर्षाच्या अखेरीस कांद्याचे दर घसरल्याने उत्पादक शेतकऱ्याला रुपया किलोने कांदा विकण्याची वेळ आली होती. या शेतकऱ्यांना मदत म्हणून क्‍विंटलला २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सरकारकडून हे अनुदान बुधवारी (ता. २७) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले....
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच...
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यात कांदा पिकवला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिक्‍विंटल कांद्याला ९०० ते १७०० रुपयांपर्यंत दर अपेक्षित होता. मात्र, तो १०० ते ७५० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून...
जानेवारी 31, 2019
आष्टी - अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थितीत आधार मिळण्याच्या आशेवर काटकसरीने पाण्याची साठवणूक करून घेतलेल्या कांद्याला कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ एक ते तीन रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्...
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक...
जानेवारी 19, 2019
टाकळी हाजी - पाणी व्यवस्थापन व उत्तम हवामानामुळे मागील हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. कांद्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा चाळीत साठवला होता. पण सध्या बाजारभाव मिळत नसल्याने शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सडत चाललेला कांदा आता माळरानावर...
जानेवारी 18, 2019
वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच अवस्था. सुमारे ४५ पिशव्यांची पट्टी आली अवघी ९५ रुपये.  अरविंद जयसिंग भोसले यांनी दोन एकर क्षेत्रापैकी एक एकरात कांद्याचे पीक घेतले आहे....
जानेवारी 13, 2019
राज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत  सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने...
जानेवारी 10, 2019
नामपूर (जि. नाशिक) - चारआणे, आठआणे चलनातून बाद झालेले असले तरी येथील बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याला व्यापाऱ्यांनी आठ आणे प्रतिकिलो असा भाव दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मालेगाव- ताहराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांदा ओतून आज सायंकाळी चार वाजता रास्ता...
जानेवारी 08, 2019
पाटोदा - दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणले आहे.  हमी भाव नसल्यामुळे कांदा मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. यामधून उत्पादन खर्च तर दूरच मात्र माल बाजारात घेऊन जाण्याचे गाडी भाडे निघणेदेखील मुश्‍किल होऊन बसले आहे. ...
जानेवारी 03, 2019
वैजापूर - कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५२  रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी (ता. दोन) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. ट्रॅक्‍टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. येथील...
जानेवारी 02, 2019
भवानीनगर - काझड (ता. इंदापूर) येथील मनोहर जाधव या शेतकऱ्याला कांद्याच्या दराने रडवले असतानाच आडत्यानेही हिसका दाखवला. चार टन कांद्याची १४ हजारांची पट्टीच त्याने दिली नाही. धनादेशही बनावट दिल्याने सदर शेतकरी घायकुतीला आला आहे.  जाधव यांनी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मार्केटमध्ये २६ ऑक्‍टोबर रोजी...
डिसेंबर 29, 2018
नाशिक - उन्हाळ कांद्यापाठोपाठ नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे...