एकूण 628 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तनला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. मुजोर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भाग  म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. आर्थिक किंवा व्यापारी पातळीवर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोस्ट फेव्हर्ड...
फेब्रुवारी 14, 2019
नांद्रा (ता. जळगाव) - शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, तर दुसरीकडे त्याला ऐनवेळी आलेली संकटे, दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत अडकत आहे. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढून त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव - कापसाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. कापसाला आठ दिवसांपूर्वी क्विंटलला 5 हजार 600 रुपये भाव होता. तो आता 5 हजार 400 रुपयांवर आला आहे. फेब्रुवारी महिना निम्म्यावर आला, तरी अद्यापही शेतकरी कापसाला अधिक भाव मिळेल, अशी आशा बाळगून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या...
फेब्रुवारी 09, 2019
माजलगाव (बीड) : शहरा पासून जवळच असलेल्या फुले पिंपळगाव जवळील मॅनकॉट जिनींगमध्ये आज सकाळी  उषा गणेश ढवळे (रा.शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा) या महिलेचा पतीने संशयाच्या कारणावरून गळा दाबून खून केल्याची घटना (ता. 9) शनिवारी घडली असून आरोपी  गणेश ढवळे यास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे.  शहरातील...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी सप, बसप यांच्यासारख्या समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्‍यात आहे, यातून प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. सरकार विरोधात बोललं की...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - परदेशी चलन भारतीय चलनामध्ये रूपांतरीत करून देण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली. मुथाय इसाह (वय ४५, रा. नैरोबी, केनिया) असे संशयिताचे नाव आहे.   व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला....
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
जानेवारी 04, 2019
औरंगाबाद - ‘एवढा दुस्काळ...तरी तयहाताच्या फोडापरमाणं तूर जपली. अळ्या पडू नये म्हणून काळजी घेतली; पण पोटऱ्यात येऊनबी शेंगाच न्हाई लागल्या. आता तूर वाळली. म्हंजी मेहनतीचं सरपणच झालं बघा!’, सत्तरीतील प्रयागाबाई पाचारे हताशपणे सांगत होत्या. पैठणखेडा (ता. पैठण) रस्त्याच्या कडेलाच एक वृद्घ जोडपे शेतात...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव कसा मिळेल, यासाठी...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 26, 2018
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच घायकुतीला आलेला...
डिसेंबर 23, 2018
जळगाव ः कापसाच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी दराबाबत धास्तावले आहेत. गेल्या आठवड्यात पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर होता. तो आता पाच हजार पाचशे ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. दर वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी मात्र दरातील घसरणीने धास्तावले आहेत. आंतरराष्ट्रीय...
डिसेंबर 23, 2018
अमरावती : खुल्या बाजारात मिळणारा भाव व नगदी चुकारे यामुळे सोयाबीन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सरकारला ही दोन्ही पिके मिळणार नसली; तरी त्याचा लाभ होत आहे. गोदामांची अपुरी व्यवस्था व चुकाऱ्यांची अंगावर येणारी स्थिती यातून सुटका झाली आहे. मूग व उडदाचे...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
डिसेंबर 18, 2018
परभणी - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरेदी हंगामात शनिवार (ता. १५) पर्यंत भारतीय कापूस महामंडळ आणि खासगी मिळून एकूण ३ लाख २ हजार ३१३ क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली. कापूस उत्पादक...
डिसेंबर 17, 2018
देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर...
डिसेंबर 14, 2018
सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.कॅाम.बीपीएड.पर्यंत झाले आहे. पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु, पुढे शेतीतच मुख्य करिअर करण्याचे व त्यातून आर्थिक...