एकूण 373 परिणाम
जुलै 24, 2019
सोलापूर - मराठी शाळा टिकाव्यात, गुणवत्ता वाढावी अन्‌ मुलांची संख्याही वाढावी, याकरिता शासनाने पुढाकार घेतला. मात्र, महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या देगाव व डोणगाव केंद्रातील आठ शाळा मागील ४० वर्षांपासून दान दिलेल्या जागांमध्येच भरतात. पावसाळ्यात या शाळांचे छत गळत असल्याने त्याला लागडी टेकण...
जुलै 20, 2019
पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ग. दि. माडगूळकर, वसंत बापट या कवींनी लिहिलेल्या शाहिरी काव्यांच्या सादरीकरणाने साहित्यपंढरी दुमदुमली. निमित्त होते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने...
जुलै 20, 2019
सौंदर्यपूर्ण व नाट्यमय हालचालींनी पुरेपूर अशा तंजावुर शैलीतील भरतनाट्यम्‌ प्रकारातील नृत्यरचना नर्तिका साकार करत होत्या. काव्यालंकारयुक्त पदांवर आधारित प्रस्तुती या वेळी भावविभोर करून गेली... सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तंजावुर येथील सरफोजी राजे भोसले यांनी नृत्यासाठी केलेल्या पदरचनांना या अनोख्या...
जुलै 19, 2019
सांगली - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विजपुरवठा, थकबाकी, वीज कनेक्‍शनची स्थिती याची सविस्तर माहिती राज्य शासनाने मागवली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक शाळांत थकबाकीमुळे वीजपुरवठा बंद असून थकबाकीची रक्कम काही लाखांच्या घरात आहे. त्याची माहिती एकत्र करण्याचे काम...
जुलै 18, 2019
पुणे - ‘शंकर रामायण, अयोध्याकाण्ड’ म्हणजे मराठी सारस्वतांचा अलंकार असून, वाल्मीकी रामायणावरील अशी व्यापक ओवीबद्ध टीका संत एकनाथांनंतर मराठी भाषेत प्रथमच सिद्ध होत आहे,’ असे प्रशंसोद्‌गार वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी काढले.  डॉ. शंकर अभ्यंकरलिखित ‘शंकर रामायण, अयोध्याकाण्ड’ या ग्रंथाचे...
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा...
जुलै 12, 2019
गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या वेळी तापमानात घट आली असून, सध्याचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सापेक्ष आर्द्रतासुद्धा ८०-९० टक्के किंवा काही ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसते. या वेळी जमिनीत मातीच्या कणामध्ये पूर्णपणे पाणी जमा...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : 'यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट भी लेकर चराग जलता है,' या उर्दू शायरीच्या पंक्तींद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कार्यपद्धतीची झलक काल (शुक्रवार) अर्थसंकल्पीय भाषणाच्या निमित्ताने संसदेत सादर केली. मात्र अर्थमंत्री या नात्याने त्यांचे पहिलेच भाषण तब्बल...
जुलै 04, 2019
"बालभारती'च्या दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संख्यावाचनाची नवी पद्धत "बालभारती'ने आणल्यावरून मोठा वाद उसळला. तो तेवढ्यापुरता न राहता मराठी भाषेची महाराष्ट्रातच उपेक्षा होत असल्याचा मुद्दाच प्रकर्षाने समोर आला. मूळ विषयाबरोबरच "मराठी'चे हे दुखणे मांडणारी, त्यावर उपाय सुचविणारी पत्रे अभ्यासक,...
जुलै 04, 2019
"मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्‍त करण्यासाठी, शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्‍त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...मी पुन्हा येईन, माझ्या युवामित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी, माझ्या बळिराजाचे हात बळकट करण्यासाठी... मी पुन्हा येईन, ह्याच निर्धारात, ह्याच...
जुलै 03, 2019
मॅक्‌मिलन कंपनीने १९२० मध्ये कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकाचे इंग्रजीत रूपांतर करून संस्कृताशी अनभिज्ञ असलेल्या आंग्ल समाजासाठी प्रसिद्ध केले. नंतर त्याची पुनर्मुद्रणे १९३७, १९४४ आणि १९४५ मध्ये आली. कोलकत्याच्या नॅशनल कॉलेजमधील पेंढरकर (की पेंढारकर) नावाच्या मराठी मुलीचे हस्ताक्षर असलेली या...
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले....
जुलै 01, 2019
जळगाव - औद्योगिक वसाहत परिसरातील जी-सेक्‍टर येथील रवी इंडस्ट्रीज कंपनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कंपनीतील केमिकल रिॲक्‍टरचा स्फोट होण्यापूर्वी आतील आठ- दहा कामगारांनी पळ काढून स्वत:चा जीव वाचविला. औद्योगिक वसाहतीत रवी इंडस्ट्रीज (जी-सेक्‍टर ४५) ही रवींद्र पाटील...
जुलै 01, 2019
मालवण - कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या गोपाळ देसाई (वय 28) या विवाहितेचा खून केल्याप्रकरणी संशयित पती गोपाळ देसाई (वय30) याला अटक केली. त्याला कुडाळ येथील न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या गोपाळ देसाई ही नवविवाहिता बुधवारी रात्री जेवण आटोपून झोपी गेल्यानंतर...
जून 23, 2019
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं...
जून 16, 2019
ईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये "सप्तभगिनी' या संबोधनानं ओळखली जातात. निसर्गसौंदर्य, राहणीमान, जीवनशैली आदी बाबतींत ही राज्ये आपलं वेगळेपण जसं टिकवून आहेत, तसंच ते त्यांनी खाद्यसंस्कृतीबाबतही...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 04, 2019
हिरमुसलेल्या इतिहासपुरुषाने मलूलपणाने पाहिले. शेजारीच लेखणी धारातीर्थी पडली होती. बखरीचा कागद भेंडोळावस्थेत गतप्राण पडला होता. आता काय लिहायचे? कसे लिहायचे? कधी लिहायचे?...मुळात कां लिहायचे? होत्याचे नव्हते झाले. इतिहास घडता घडता एकदम काहीच्या काहीच होऊन बसले. इतिहासपुरुषाच्या नजरेत नोकरी...