एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
ओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ...
ऑक्टोबर 18, 2018
कास - जागतिक वारसास्थळ आणि पुष्प पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराचा यावर्षीचा हंगाम समाप्त केला असल्याची माहिती कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली. दोन सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरवात करणाऱ्या समितीने या वर्षी चांगले...
सप्टेंबर 29, 2018
सातारा - गडद पिवळ्या रंगाची आणि त्यावर दोन लाल ठिपके असलेली स्मितीया (कावळा) व गुलाबी तेरडा या दोन रंगांच्या फुलांनी सध्या कास पठार आच्छादले आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण काटे असल्याचे भासणारी नाजूक कुमुदिनीच्या (पानभोपळी) फुलांनी कास...
सप्टेंबर 25, 2018
कास - जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास पठारावर सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देवून विविधरंगी फुलांचा नजराणा अनुभवला.  सध्या पावसाने उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आहे. अनेक...
सप्टेंबर 17, 2018
तारळे - तारळे व पाटणपासून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य सडावाघापूर पठारावर निळ्या रंगाची सीतेची आसव, पिवळी सोनकी व मिकी माउस आदी प्रकारातील फुले फुलली आहेत. पिवळ्या मिकी माउसच्या, तर निळ्या रंगाच्या सीतेची आसव फुलांमुळे पठारावर पिवळा व निळा सडा पडल्याचा भास होत आहे. ही रंगांची उधळण...
सप्टेंबर 12, 2018
परळी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळ्यात विविधरंगी फुलांचा बहर सुरू झाला आहे. कासपाठोपाठच आता चाळकेवाडीचे पठारही फुलांनी भरून गेले आहे. विविध रंगांच्या फुलांनी चाळकेवाडी पठारावर उधळणच केली आहे. मुळातच तांबड्या मातीमुळे उठून दिसणारे हे पठार आता पिवळा, गुलाबी आणि पांढऱ्या...
सप्टेंबर 10, 2018
कास - साताऱ्याचा स्वर्ग असलेल्या कास पठारावर फुलांचा गालिचा पसरला आहे. निळ्या, जांभळ्या फुलांबरोबरच पांढऱ्या रंगाची एरिए कॉलन फुले बहरली आहेत. निसर्गाच्या या रंगपंचमीच्या रंगात निसर्गप्रेमी रंगून जात आहेत. (प्रमोद इंगळे - सकाळ छायाचित्रसेवा)
ऑगस्ट 31, 2018
सातारा : ""कास पठाराचे चलन- वलन नैसर्गिकरीत्या चालू देणे हेच पठाराचे रक्षण आणि त्यातूनच संवर्धन आहे. पठाराची जैवविविधता जपली तरच पर्यटन राहील,'' असे मत मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले.  "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू असलेल्या कास स्वच्छता...
ऑगस्ट 25, 2018
सातारा - रंगांची उधळण पाहण्या व अनुभवण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांचे पाय लागणाऱ्या कास पठारावर सध्या हलका पाऊस सुरू आहे. पावसाची पुरेशी उघडीप मिळत नसल्याने अलौकिक रानफुलांच्या दर्शनासाठी निसर्गभाविकांना थोडं थांबावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूस व्यवस्थापनाने पूर्वतयारी सुरू केली असून,...
ऑगस्ट 23, 2018
राजापूर - श्रावण सरींची पावसात सुरू असलेली भुरभूर, त्याच्या जोडीने डोंगर रांगांमधून दाटून येणारे दाट धुके, त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन...अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागांतील कातळ परिसर विविधांगी रंगबीरंगी फुलांनी खुलला आहे. कोरीनॲ...
ऑगस्ट 23, 2018
सातारा - सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून खाण्याचा प्रताप कास पठारावर झाला. त्यामुळे बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीची चौकशी लागली. समितीचा अहवाल सहा महिने झाला प्रतीक्षेतच आहे. त्यामुळे आर्थिक गडबडी करूनही दोषी पदाधिकारी मोकाट आहेत. या...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच...
जुलै 06, 2018
सातारा - निसर्गरम्य कासच्या फुलांचा हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गुजरात, तसेच मुंबई- पुणे बाजूकडून कासला येणाऱ्या पर्यटकांना आता सातारा शहरातील वाहतुकीच्या कटकटीला तोंड द्यावे लागणार नाही. महामार्गावरून पर्यटकांची वाहने पाचवड-कुडाळ-मेढा-कुसुंबीमार्गे जावळी तालुक्‍यातील निसर्ग सौंदर्य...
जून 27, 2018
सातारा - प्लॅस्टिकमुक्‍त काससाठी "सकाळ'ने मोहीम हाती घेतली अन्‌ पाच महिन्यांत हजारो नागरिकांनी काही हजार टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला. हा कचरा नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे तलावामध्ये वाहून जाण्यापासून वाचवता आलेला आहे. बहुतांश तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त झाला असला तरी त्याठिकाणी नव्याने कचरा पडणार...
जून 12, 2018
पुणे : रिमझिम पाऊसधारा अन्‌ ती ओली पायवाट...मग तरुणाईला ओढ लागते ती पावसाळी भटकंतीची. गडकिल्ल्यांसह वेगवेगळ्या डेस्टिनेशनला फिरायला जाण्याचे तरुण-तरुणींचे नियोजन असून, विविध ट्रेकिंग ग्रुपने आयोजिलेल्या वर्षासहलींना तरुणाईची पसंती मिळत आहे. राज माचीपासून लोहगडपर्यंत...लोणावळ्यापासून कोकणपर्यंत...
मे 24, 2018
सातारा - वर्षभरापूर्वी कास रस्त्यावरील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालविण्याची जिल्हा प्रशासनाची वल्गना हवेतच विरून गेली आहे. उलट इशारा नोटिसांचे नाचलेले घोडे व पंचनाम्यांचा शो झाल्यानंतर कास रस्त्याला धनदांडग्यांनी दुप्पट वेगाने बांधकामे सुरू केली. बेकायदा...
मे 12, 2018
सातारा - सातारा ते कास या सुमारे २५ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या स्वच्छतेसाठी सातारकर सज्ज झाले आहेत. त्यासाठी ४०० हून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या महाअभियानाला रविवारी सकाळी सहा वाजता सुरवात होऊन साडेनऊ वाजेपर्यंत हे अभियान चालणार आहे.  ‘युनेस्को’चे जागतिक...
एप्रिल 17, 2018
सातारा - दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कास पठारावर फेब्रुवारी महिन्यात लावण्यात आलेल्या वणव्यात काही हेक्‍टर क्षेत्र जळून खाक झाले होते. या वणव्यामुळे त्या क्षेत्रात पुन्हा पुष्पवनस्पती येतील का? अशी शंका होती. प्रतिकूल परिस्थितीत सुप्त पडून राहून अनुकूलता मिळाल्यानंतर पुन्हा उभारी...
एप्रिल 06, 2018
कासकास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या आवाजाने कास तलावाचा परिसर भरून गेला आहे.  सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाची उंची वाढवल्यानंतर सध्यापेक्षा पाच पट पाणीसाठा वाढेल. आता जुन्या भिंतीवरून तलावाची...
मार्च 18, 2018
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत...