एकूण 32 परिणाम
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - गानसरस्वती पुरस्कार समितीतर्फे दिला जाणार ‘गानसरस्वती पुरस्कार’ मेवाती घराण्याचे गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किशोरीताईंचे ज्येष्ठ शिष्य डॉ....
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गानसरस्वती पुरस्कार यंदा मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 09, 2018
संगीताचा अभ्यास ही एक अविरत चालणारी गोष्ट आहे. त्याच वाटेवर मी चालते आहे. एक गोष्ट मात्र अगदी नक्की...हा सगळा प्रवास अत्यंत आनंददायी आहे. अभ्यास करताना सतत नवनवीन गोष्टी सापडतात. सुरांची, रागांची रोज नव्यानं ओळख होते. रोज नवीन कसोटीवर स्वतःला पारखून घेता येतं. त्यातूनच पुढं जाण्याचा मार्गही सूरच...
जुलै 29, 2018
सोलो तबलावादन, गायन, वादन, नृत्याची संगत, तसंच फ्युजन म्युझिक या सगळ्या प्रकारांमध्ये मी काम करत आहे. अजून खूप जमायचं बाकी आहे, याची नक्कीच जाणीव आहे. हे सगळं करत असतानाच ‘मी संपूर्ण व्यक्त होण्यासाठी अजून उरलो आहे,’ असं वाटतं. हीच अपूर्णता किंवा मनातली हुरहूर नवीन वाटा शोधायला प्रवृत्त करते......
जून 24, 2018
संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं...
मे 20, 2018
गाणारा कलाकार जेव्हा मैफलीत गायला बसतो, तेव्हा तो अनेक कारणांनी रुपयाचा (सोळा आणे) बारा आणे झालेला असतो! याच वेळी गाणं ऐकायला आलेले रसिक-श्रोते मात्र अपेक्षेनं रुपयाचा सव्वा रुपया बनलेले असतात..."बारा आणे ते सव्वा रुपया' हे फरकाचं अंतर जो कलाकार सुवर्णमध्य साधून भरून काढू शकतो त्या कलाकाराची मैफल...
मे 06, 2018
एका बुजुर्ग गायकाचा मी मुलगा असल्यानं गाण्याची भीती व दडपण माझ्यावर अगदी लहानपणापासून कधी आलं नाही; परंतु त्याच वेळी माझ्यावर जबाबदारी अधिक असल्याचं मला जाणवतं. अर्थात ही जबाबदारी मी आव्हान म्हणून नम्रपणे स्वीकारली आहे. काळ कोणताही असो, बुजुर्ग कलाकाराची नक्कल करणारा कोणताही शिष्य मोठा कलाकार कधीच...
एप्रिल 04, 2018
कल्याण - गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रमलखुण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्यावतीने त्यांना सांगितिक आदरांजली वाहण्यात येणार आहे. सात एप्रिल रोजी सुभेदार वाडा शाळेत संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किशोरीताईंचे ...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
फेब्रुवारी 25, 2018
'कलापरंपरा लाभलेले ज्येष्ठ तबलावादक पंडित चंद्रकांत कामत (भाऊ) यांचा मुलगा,' अशी ओळख मला जन्मत:च मिळाली. पंडित भीमसेन जोशी (अण्णा) यांना किंवा अन्य मान्यवर गायकांना रियाजाच्या वेळी भाऊ तबल्याची साथसंगत करत असताना कित्येकदा मी भाऊंच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत ऐकत झोपून जात असे. परिणामी, संगीताचे...
फेब्रुवारी 18, 2018
गाणं शिकावं, असं माझ्या मनात खरंतर कधीच नव्हतं. मात्र, योगायोग माणसाला वेगळ्या वाटेवरून घेऊन जात असतात. 'गुरुगृही 12 वर्षं राहून गुरूची सेवा करायची' एवढंच माझ्या मनात त्या वेळी, म्हणजे तरुणपणी, होतं. माझा जन्म वेदशास्त्रसंपन्न घराण्यातला. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर हे माझे वडील, तर वेदशास्त्रसंपन्न...
जानेवारी 31, 2018
प्रश्‍न : टाळवादनात ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अनुभवाबद्दल सांगा.  माऊली : मी वारकरी. आजी-आजोबा, आई-वडील वारकरी असल्यानं तेच बाळकडू मिळालं. आठ-नऊ वर्षांचा असल्यापासून वारकऱ्यांबरोबर गाऊ-वाजवू लागलो. माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास 10 वर्षे टाळवादन शिकत होतो. पखवाजवादनही शिकलो, पण खरा रमत गेलो...
जानेवारी 28, 2018
माझ्या घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण नव्हतं. माझ्यामधली शास्त्रीय संगीताची - हार्मोनिअमची - आवड ओळखून माझ्या आई-वडिलांनी मला वयाच्या सहाव्या वर्षी रंजना गोडसे यांच्या ‘गोडसे वाद्यवादन विद्यालया’त दाखल केलं. स्वतःला आवड नसतानाही मला शास्त्रीय संगीत (हार्मोनिअम, कंठसंगीत) शिकण्यासाठी, व्यासंग...
जानेवारी 13, 2018
कऱ्हाड - येथील कऱ्हाड जिमखानातर्फे ता. २५ व ता. २६ जानेवारीला प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली.  एकांडे म्हणाले, ‘‘संस्थेने १८ वर्षांपूर्वी उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रीतिसंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात सुरवात...
डिसेंबर 17, 2017
कोणत्याही ललितकलेच्या संदर्भातल्या अजून एका समानधर्मी गोष्टीचा इथं उल्लेख करता येईल. तो म्हणजे ‘कल्पिता’च्या, अज्ञाताच्या प्रदेशाची ओढ.  निर्मिक, कलावंत त्या कलेच्या संदर्भात किती आसुसलेला आहे, त्याला त्या कलेच्या पूर्वसुरी, वर्तमानातल्या रूपांचं किती ज्ञान, भान, आहे नि त्याच्या ठायी ‘कल्पिता’च्या...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त होणाऱ्या पुलोत्सवामध्ये यंदा गिरीजा देवी, विंदा करंदीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, शिरीष पै यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये होणाऱ्या पुलोत्सवाचे...
सप्टेंबर 27, 2017
मुंबई - राज्य सरकारतर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही घोषणा केली. शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य...
सप्टेंबर 24, 2017
पुणे : नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि.२७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान...