एकूण 12 परिणाम
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
जानेवारी 18, 2018
जळगाव - मूळचे आसोदा (ता. जि. जळगाव) येथील असलेले नितीन चिंधू महाजन हे आपल्यासह कुटुंबाला भरीत खायला मिळावे म्हणून डलास (अमेरिका) येथे आपल्या निवासस्थानानजीक भरीताच्या वांगी पिकाची दरवर्षी लागवड करीत आहेत. त्याचे चांगले संगोपन करून बियांचे जतनही तेथे नितीन करीत असतात. ॲग्रोवनमध्ये शनिवारी (ता.१३)...
नोव्हेंबर 03, 2017
जळकोट - तालुक्‍यातील शेतकरी खरिपातील तूर पीक सांभाळत आंतरमशागत करून तणांचा नाश करण्यासाठी रोटरचा वापर करत असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात खरिपात सध्या मूग, उडीद, सोयाबीन काढल्यानंतर काही प्रमाणात संकरित ज्वारी वगळता तूर पीक उभे आहे. खरिपात सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे;...
ऑक्टोबर 30, 2017
काचुरवाही - नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. पाण्याची  थोडीफार व्यवस्था असलेल्यांनी धानपिकांची कशीबशी लागवड केली. पीक कापणीला आले असताना तुडतुडा किडीने आक्रमण केले. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून, हातात आलेले पीक जाणार की राहणार अशी चिंता त्यांना सतावत आहे. यंदा पाहिजे त्या...
ऑक्टोबर 29, 2017
बुलडाणा - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवण्यात यश अाले अाहे. यामुळे शिवारे पाणीदार झाली अाहेत.   जलयुक्त शिवार अभियानाने बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने चांगले बाळसे धरले आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३० गावे पहिल्या...
सप्टेंबर 26, 2017
सातारा हा आले, हळद यांच्याबरोबरच ऊस, भाजीपाला आदी पिकांसाठीही प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील काले (ता. कऱ्हाड) हे तसे बागायत गाव. त्यामुळेच गावात ऊस पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. गावातील विकास पांडूरंग पाटील हा तरुण शेतकरी. एम.ए बीएडपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. आई- वडिलांचा पेशा शिक्षकी...
सप्टेंबर 25, 2017
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित पाटील यांच्याकडे खरीप आणि रब्बीमध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून, तर उन्हाळ्यामध्ये स्वतंत्र पीक म्हणून फ्लॉवरची लागवड असते. त्यांच्या अनुभवानुसार केवळ ऊस लागवडीपेक्षा त्यात फ्लॉवरचे आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सध्या दीड एकर क्षेत्रातील फ्लॉवरची काढणी...