एकूण 51 परिणाम
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "...
मे 30, 2019
मुंबई - चक्कर आल्याचे कारण झाले आणि चार दिवसांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात ओंकार लुबडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदान केले आणि आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जणांना जीवनदान दिले. ओंकारचा बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला; त्याच दिवशी...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 22, 2019
मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.  पालिका रुग्णालयांतील वाढती...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील श्रावणी चव्हाण (वय १४) हिचा होरपळून मृत्यू झाला. घराला कुलूप लावून तिचे आई-वडील...
मे 09, 2019
मुंबई - परळमधील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेने सुरू केलेले रुग्ण समुपदेशन केंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ते बंद करावे लागल्याचे समजते. महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील...
एप्रिल 11, 2019
मुंबई -  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील गुरूप्रसाद बेडेकर यांची  जेमतेम आर्थिक परिस्थिती बेताची , आपल्या आठ महिन्यांच्या सुयशला वाचवायला ते सध्या परळच्या केईएम रुग्णालयात आले आहेत.  यशला जन्मापासून ऐकू येत नसल्याने कॉक्लिअर इम्प्लाण्ट शस्त्रक्रिया करावी लागणार...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
मार्च 05, 2019
पुणे: हातावचे पोट, रहायला स्वःताचे घर नाही. काम केले तरच संसाराचा गाडा चालतो. मोठा मुलगा पाचवीत तर छोटा पहिलीत शिक्षण घेत आहे. सर्व काही सुरळीत चालले असताना कर्ता व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजते अन् कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळते. रमेश किसन जैद (वय 40) यांची आर्थिक...
मार्च 05, 2019
शिरपूर ः मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी, असे कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी जिवंतपणीच त्या तोडीचे सत्कार्य करून ठेवणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण तर अगदी विरळा! पण बोळे (ता. पारोळा) येथील अल्पशिक्षित मंगलबाई रतनसिंह गिरासे यांनी मात्र मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून आपली...
मार्च 04, 2019
शिरपूर - मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी, असे कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी जिवंतपणीच त्या तोडीचे सत्कार्य करून ठेवणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण तर अगदी विरळा! पण बोळे (ता. पारोळा) येथील अल्पशिक्षित मंगलबाई रतनसिंह गिरासे यांनी मात्र मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून आपली...
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच असून,...
जानेवारी 17, 2019
मुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून...
जानेवारी 15, 2019
मुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन महिन्यांनी एखादा तरुण हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारासाठी दाखल होत आहे. यातील बहुतांश जण धूम्रपान करत असल्याचे आढळले आहे.  ठाण्यात १६...
जानेवारी 02, 2019
नालासोपारा - प्रेम प्रकरणाच्या संशयातून जन्मदात्या पित्यानेच 16 वर्षीय मुलीला जिवंत जाळल्याचा प्रकार विरार पूर्वेतील गोचरपाडा येथे सोमवारी (ता. 31) घडला. यात मुलगी 70 टक्के भाजल्याने तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद मूर्तिजा मंसूरी असे आरोपी बापाचे नाव असून, याप्रकरणी...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्‍यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. वरळीतील औषध प्रयोगशाळेला...
डिसेंबर 28, 2018
दाभोळ - दापोली खेड मार्गावरील नारगोली येथे सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर व मॅक्सिमो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या...