एकूण 2125 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
नोव्हेंबर 17, 2018
हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत जोडण्याचा उद्देश असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे कळमनुरी विधानसभा प्रभारी शिवशंकर घुगे यांनी सकाळशी बोलतांना दिली आहे.  याबाबत घुगे यांनी सांगितले...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई : रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या वासीम जाफरचा पुतण्या आणि हरहुन्नरी पृथ्वी शॉचा समवयीन सहकारी, परंतु 15 महिने मोठ्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागलेल्या अरमान जाफरने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दणकेबाज नाबाद त्रिशतक केले. सी. के. नायडू 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत...
नोव्हेंबर 16, 2018
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला...
नोव्हेंबर 14, 2018
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत एकदिवसीय सामन्यांच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना तिकीट दरातून शुल्कवाढीचा भार सहन करावा लागणार आहे. नागपूरच नव्हे तर मुंबई,...
नोव्हेंबर 14, 2018
नसरापूर - राज्यातील विविध भागांत अधिकारी म्हणून काम करणारे आणि मूळचे भोरवासीय असलेले अधिकारी व उच्चपदस्थ एकवटले आहेत. भोरच्या विकासासाठी दीपावलीच्या मुहूर्तावर एक सामाजिक संस्था स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. पहिल्या उपक्रमात मान्यवर व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. भोरमधील प्राथमिक शिक्षक...
नोव्हेंबर 11, 2018
बँक ऑफ महाराष्ट्रनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला नोटीस बजावून इशारा दिला आहे. ‘गहुंजे इथलं स्टेडियम बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यानं एमसीएचं खातं एनपीए झाल्यानं आम्ही गहुंजे स्टेडियमचा प्रातिनिधिक ताबा घेत आहोत,’ असं त्यात म्हटलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, त्याची कारणं काय आहेत,...
नोव्हेंबर 10, 2018
क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली- क्रिकेटच्या चाहत्यांना देश सोडून जाण्याच्या सल्ला देण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन सोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.   I guess trolling...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 07, 2018
नाशिक: एका बाजूला माझा देश होता, दुसरीकडे मी उभा केलेला इराणचा संघ होता. उपांत्य फेरीत चित्र स्पष्ट झाल्यापासून अस्वस्थ होते. पण अंतिम सामन्याच्या रात्री  रात्रभर झोप आली नाही. मी प्रशिक्षक असलेला इराणचा संघ जिंकला. तेव्हा सगळा संघ जल्लोषात बुडाला असतांना मी मात्र तेथून दूर निमूटपणे निघून गेले. काय...
नोव्हेंबर 07, 2018
सिल्हेट (बांगलादेश) : ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी पराभव केला. झिंबाब्वेचा गेल्या पाच वर्षांतील हा पहिला कसोटी विजय ठरला.  विजयासाठी 321 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
नोव्हेंबर 07, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकांनी सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. पोटनिवडणुकांमधील सातत्यपूर्ण अपयशामुळे मोदी सरकारचे संख्याबळ 282 वरून 272 वर येऊन ठेपले आहे, तर 44 या नीचांकी संख्येवर पोहोचलेल्या कॉंग्रेसचे संख्याबळ या विजयामुळे 49 झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिवाळी बोनस न दिल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामागचे कारण डुप्लिकेट रवी शास्त्रींच्या लोकलमधील व्हिडिओमुळे सध्या ते सोशल मीडियावर...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो. त्याचप्रकारे कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने 4-1 अशी कामगिरी करुन दाखवली. या निकालामुळे आघाडीचा उद्देश यशस्वी झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी मोठ्या आवेशात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे उभे केलेले क्रिकेट स्टेडियम आता संकटांच्या घेऱ्यात अडकले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चार बॅंकांनी अखेरचा उपाय म्हणून स्टेडियमचा ताबा घेण्याची नोटीस दिली आहे. ...
नोव्हेंबर 05, 2018
कल्याण - राज्यभरात सीएम चषक स्पर्धेची धूम सुरू असून कल्याण-डोंबिवली शहरातही या स्पर्धेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सुमारे तीस हजार विद्यार्थी आणि युवक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कल्याण जिल्ह्यातील सर्व...
नोव्हेंबर 04, 2018
हैदराबाद - अंबाती रायुडू याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तो आता केवळ झटपट क्रिकेट खेळेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याची कसोटी मालिकेसाठी निवड झाली, पण त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला वगळण्यात आले. आता झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान पक्के झाल्यामुळे...