एकूण 197 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेशिस्तीचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शिक्षकांच्या अधिवेशनामुळे तर त्याचा कहर झाला आहे. तब्बल पाच हजार ६४३ शिक्षक, ३९ केंद्रप्रमुख रजा मंजूर नसतानाही गोव्यातील अधिवेशनाला गेले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांची व्यवस्था...
फेब्रुवारी 03, 2019
सातारा : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबतची पोस्ट फेसबुक पेजवरून टाकणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा येथे ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार (रा. मालगांव, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सातारा एलसीबीचे पथक कुंभारला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 03, 2019
सातारा : खंडाळा (जि. सातारा) येथे कार्यक्रमासाठी येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्यासंदर्भातील पोस्ट एकाने फेसबुकवर टाकल्याने खळबळ उडाली आहे.  हा मेसेज फेसबुकवरून व्हायरल झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 'अजितदादा बच गया, अब सातारा मे सीएम मरेगा,’ अशा...
जानेवारी 13, 2019
खंडाळाखंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत...
डिसेंबर 29, 2018
सातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक गती मिळत आहे. या जीवनवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी ‘त्रिसूत्री’ निश्‍चित केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०७ गावांकडून जिल्हा परिषदेने...
डिसेंबर 28, 2018
सातारा - दुष्काळी तालुक्‍यात सध्या टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, टॅंकरच्या खेपा वाढवून दाखवण्यासाठी टॅंकरची जीपीएस यंत्रणा दुचाकीला बसविल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला होता. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी होण्याची शक्‍यता आहे....
डिसेंबर 27, 2018
लोणावळा - सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास लोणावळेकर सज्ज झाले आहेत.  नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी; तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ...
डिसेंबर 24, 2018
सातारा - मराठा आरक्षणाचा निर्णय व राज्यात केलेल्या कामांमुळे लोक पाठीशी उभे राहतील, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, छत्रपतींच्या शुभेच्छा व लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर आगामी निवडणुकीत नक्कीच बाजी मारू, असा विश्‍वास...
डिसेंबर 22, 2018
खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी कुप्रसिध्द असलेल्या 'एस' आकाराच्या वळणावर मोटारसायकल घेऊन भरधाव वेगात जात असताना समोरील अज्ञात वाहनास पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात सुरुर (ता.वाई) येथील दोघे तरुण जागेवरच ठार झाले. मोटारसायकल...
डिसेंबर 12, 2018
वाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने येथील बाजार समितीत झालेल्या मोफत कृत्रिम पाय (जयपूर फूट) व पोलिओ कॅलिपर्स शिबिरात ७५ अपंगांच्या पायाची मापे घेण्यात आली. आता त्यांना जानेवारीच्या...
डिसेंबर 06, 2018
सातारा - खंडाळा टप्पा तीनसाठी 70 लाख रुपये हेक्‍टरी दर जमीन संपादनासाठी औद्योगिक विकास महामंडळ देत आहे. मात्र, सातारा आणि अतिरिक्त साताऱ्यासाठी जागाच उपलब्ध नाही. एकाच ठिकाणी किमान 400 एकर जागा उपलब्ध होणे कठीण असल्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला खो बसत आहे. जागा उपलब्ध नसल्याने...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी...
नोव्हेंबर 28, 2018
सातारा - दुष्काळाची झळ माणसांबरोबर आता प्राणी, पशुपक्ष्यांनाही सोसावी लागत आहे. अपुऱ्या पावसामुळे चारा उत्पादन न झाल्याने माण, खटावमधील तब्बल चार लाख पशुधनांवर चारासंकट कोसळले आहे. पश्‍चिमेकडील भाग वगळता माण, खटावमध्ये अनुक्रमे महिना, दोन महिने पुरेल इतकाच चारा सध्या उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने...
नोव्हेंबर 28, 2018
काशीळ - जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दर वर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुक्‍यात लागवड झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. शेतीला पूरक...
नोव्हेंबर 23, 2018
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (ता.२३)  बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. गुरुनानक जयंती आणि शनिवार, रविवार सलग सुट्ट्या यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने त्यांच्या वाहनांची भर पडली आहे. दरम्यान, वडगाव-मावळजवळ दोन वाहनांचा...
नोव्हेंबर 23, 2018
काशीळ - सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह सहकारी बॅंकांनी ऑक्‍टोबरअखेर केवळ पाच टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात "आयडीबीआय'ने सर्वाधिक 12 कोटी 33 लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या 25 टक्के कर्जाचे वितरण केले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
नोव्हेंबर 22, 2018
कर्जत - तालुक्यातील खंडाळा येथे कुप्रसिद्ध गुन्हेगार राहुल गोयकर (वय ३२रा खंडाळा, ता. कर्जत) याच्या डोक्यात लाकडी दंडक्याचा घाव घालून खून करण्यात आला. रात्री उशिरा ही घटना घडली आली. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एका संशियाताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख...
नोव्हेंबर 12, 2018
लोणावळा - लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सण सरल्याने दिवाळीच्या सुट्यांमुळे लोणावळा व खंडाळा पर्यटकांनी गजबजला आहे. येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती...
ऑक्टोबर 18, 2018
सातारा -  जिल्ह्यात महाबळेश्‍वर, सातारा तालुका वगळता सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, भूजल पातळी खालावल्यामुळे यंदा 110 गावांत पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता वाढणार आहे. पूर्व भागात पावसाळ्यापासूनच काही गावांना...