एकूण 345 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद: सुरवातीला कमी झालेल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगामही कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होऊन खरीप हंगामात तब्बल 93.98 टक्के पेरणी झाली. रब्बी हंगामासाठी शेतकरी जोमाने कामाला लागला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद)  : लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडीसह (ता.गंगापूर) परिसरात आठवडाभरापासून महिलांसह पुरुष मजूर मिळेनासे झाले आहेत. सध्या खरीप हंगामातील मिरची पीक सर्वत्र चांगले आले असून, तोडणीचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या दरम्यान ठिबक व पुरेसे पाणी असलेल्या शेतात कापसाची...
ऑक्टोबर 12, 2019
नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.  पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड...
ऑक्टोबर 10, 2019
लोहारा (जि. उस्मानाबाद) ः तालुक्‍यातील अनेक भागांत गुरुवारी (ता. 10) पहाटे तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अवघ्या तीन तासांत सरासरी 20.66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्‍यात अधूनमधून पाऊस होत आहे. सुरवातीच्या काळात तब्बल एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाची...
ऑक्टोबर 10, 2019
मनमाड : सध्या खरिपाची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपाची काढणी आणि रब्बीची लागण एकाच वेळी सुरू असल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. त्यातच निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने उमेदवारही कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भेटीला उमेदवाराला थेट शेताच्या...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली...
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीला 52 दिवसांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राटही दिले; मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानंतरही मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला नाही. त्यामुळे खरिपाच्या...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 26, 2019
गेवराई, (जि. बीड) : तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे काही भागांतील जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे; परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे.  पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर तालुक्‍यात समाधानकारक पावसाने हजेरी...
सप्टेंबर 26, 2019
लातूर ः  जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत आहे. यात बुधवारी (ता. 25) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील 15 महसूल मंडळांत 25 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इतर महसूल मंडळांतही पाऊस झाला आहे. हा पाऊस वाळत चाललेल्या खरीप...
सप्टेंबर 26, 2019
बीड  : मागच्या वर्षीचा तीव्र दुष्काळ आणि यंदाच्या हंगामातही अनेक दिवस उघडीप दिलेल्या पावसाने तीन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आता कुठे पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. बुधवारी (ता. 25) सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. माजलगाव, धारुर, शिरूर कसार,...
सप्टेंबर 25, 2019
उमरगा (जि.उस्मानाबाद) ः शहरासह परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेबाराच्या सुमारास एक तास दमदार पाऊस झाल्याने उमरगा महसूल मंडळात 88, तर दाळिंब मंडळात सर्वाधिक 108 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. एकूण पाच महसूल मंडळांपैकी उमरगा व दाळिंब महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शहरात झालेल्या...
सप्टेंबर 24, 2019
कऱ्हाड ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुरातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दीड महिने उलटूनही...
सप्टेंबर 21, 2019
सोलापूर - राज्यातील २५ जिल्ह्यांमधील तब्बल चार लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या तीन लाख ७९ हजार हेक्‍टरवरील पिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने दोन हेक्‍टरपर्यंत पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, तीनवेळा स्मरणपत्रे देऊनही आतापर्यंत केवळ सात जिल्ह्यांनीच पंचनामे पूर्ण...
सप्टेंबर 21, 2019
जालना -  मागील दिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता.20) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24.78 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.  यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला जिल्ह्यात अल्प पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकेही धोक्‍यात...
सप्टेंबर 19, 2019
करमाळा (सोलापूर) : तालुक्यात बुधवारी महिनाभराच्या विश्रांतीनंतर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये हिंगणी (ता. करमाळा) येथील एका शेतकर्याचा गोठा पडून गायीचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय बाबर यांची ही गाय आहे. बुधवारी रात्री पावसामुळे त्यांनी तीन गाई गोठ्यात बांधल्या होत्या. त्यातील एका...
सप्टेंबर 19, 2019
अमरावती : विभागात खरिपातील पिकांची स्थिती गत दहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत चांगली आहे. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा अपवादवगळता इतर जिल्ह्यांमध्ये जर आता सतत पाऊस पडला, तर तो पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता आहे. या...
सप्टेंबर 19, 2019
उस्मानाबाद ः पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात पावसाने बुधवारी (ता. 18) जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात मोठा पाऊस झालेला नाही. आता पावसाळा संपण्यासाठी जेमतेम 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तरीही...
सप्टेंबर 17, 2019
गेल्या काही महिन्यांपासून सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची कमतरता आहे. परिणामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आवक आणि मागणी यांच्यातील तफावत वाढल्याने हिरव्या मिरचीचा बाजार चांगलाच कडक राहिला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून मिरचीचा सर्वाधिक दर ५५ ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस...