एकूण 346 परिणाम
जुलै 12, 2019
जलालखेडा : मागील वर्षी नरखेड व काटोल तालुक्‍यात पाऊस कमी पडल्याने हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. पण फळउत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली मदत मिळाली नाही. तसेच पाण्याच्या अभावाने या तालुक्‍यातील संत्रा, मोसंबीच्या बागा मोठ्‌या प्रमाणात वाळल्या. कुठूनतरी पैसे आणून बागा...
जुलै 07, 2019
हट्टा (ता. वसमत, जि. हिंगोली) - मागील दोन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहेत. त्यातच यंदाही जुलैच्या पहिला आठवडा सरला तरी सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी कधी, याची विवंचना आहे. नाना प्रश्‍न, समस्यांची मालिका संपता संपत नसल्याने चौकटीबाहेर जाऊन...
जुलै 05, 2019
नागपूर : आठवडाभरापासून होत असलेल्या पावसानंतर खरीप हंगामातील पेरणीला गती आली आहे. आतापर्यंत 31.66 टक्के पूर्ण झाल्या. मागील वर्षी याकाळात जवळपास शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पेरणीला उशीर झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती आहे. जिल्ह्यात खरिपाचे एकूण 5 लाख 7 हजार...
जुलै 01, 2019
वरोरा (चंद्रपूर) : तालुक्‍यातील पांझुर्णी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. रवींद्र पंढरी ठाकरे (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पांझुर्णी येथे रवींद्र ठाकरे यांची शेती आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतात 25 बॅग...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 29, 2019
भोकर : मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यातही ऊन व उकाड्याने जनता हैराण झाली होती. बळीराजा ही चिंतेत होता. दोन नक्षत्र कोरडे गेल्याने सर्वाच्या नजरा आकाशाकडे लागून होते. शनिवारी (ता. 29) दुपारी दमदार पाऊस झाल्याने जीव भांड्यात पडला आहे. मागील पावसाळ्यात पोळ्याला चांगला पाऊस झाला...
जून 29, 2019
इगतपुरी - इगतपुरी तालुक्‍यात सलग तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्‍यात चौफेर जोरदार पाऊस बरसत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी सुखावले आहेत. गुरुवारपासून इगतपुरी तालुक्‍यात संततधार सुरू आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार राज्याचे कृषीमंत्री...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी सहायक निबंधक...
जून 22, 2019
नागपूर : जिल्ह्यातून पीकविम्यापोटी 208 कोटींचा प्रीमियम विमा कंपन्यांनी जमा केला. खरीप हंगामातील विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 46 हजार होती. अपुरा व अनियमित पाऊस झाला असतानाही फक्त सहा हजार शेतकऱ्यांना नऊ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. यामुळे पीकविमा कोणाच्या फायद्याचा असा...
जून 21, 2019
सावंतवाडी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले होते. परिणामी शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम रखडला. चक्रीवादळाचा प्रभाव कालपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे. आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर पडलेल्या ...
जून 19, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि अनकूल वातावरणाचा उपयोग करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सहा हजार 410 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस कमी झाला....
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 10, 2019
गेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्...
जून 05, 2019
बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी तालुक्‍यातील काही भागांत पावसाने...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
मे 13, 2019
जळगाव ः बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे एक जूनलाच बीटी बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापूर्वी "बीटी'ची विक्री करणारे विक्रेते व विकत घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली.    दोन वर्षांपूर्वी...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा तेरा तालुक्‍यांत दुष्काळ आहे. दुष्काळासाठी केंद्र शासनाचा निधीही जिल्ह्यात आला. तो जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वर्गही केला. मात्र, अनेक तालुक्‍यांतील बॅंकांनी दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलाच नाही. आसमानी संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना किमान शासकीय...
मे 11, 2019
हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे. हिंगणा तालुक्‍यात गुमगाव, हिंगणा...