एकूण 74 परिणाम
एप्रिल 06, 2018
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्यामुळे अपुरा पाऊस, पावसाचे दिवस कमी होणे, मान्सूनचे उशिरा होणारे आगमन अशा विविध समस्यांशी शेतकऱ्यांना दोनहात करावे लागत आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असल्याने शेतकरी स्वत:ला संपविण्यासारखे पाऊल उचलत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी...
मार्च 25, 2018
जळगाव ः शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढेल या हेतूने जिल्ह्यात बारा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. आतापर्यंत अनेक शेतकरी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून देण्यास सुरवात केली आहे. काही कंपन्यांनी खते, बियाणे, शेती...
मार्च 21, 2018
खामगाव : कृषी विभागासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. आयुक्तालयाने केलेल्या सादरीकरणात या वर्षी विभागाचा सुमारे 75 टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना गती...
फेब्रुवारी 25, 2018
समुद्रपूर (जि. वर्धा) - मुगल काळापासून परंपरागत पद्धतीने जपलेले वाण. इतर हळदींपेक्षा तिप्पट औषधी गुण. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने घेतलेले पीक आणि शासनाकडून भौगोलिक मानांकन प्राप्त वायगावच्या हळदीची बातच न्यारी आहे. कुठल्याही हळदीत वायगावच्या हळदीचे नाव पुरेसे असून...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिकः तंत्रज्ञान आत्मसात करुन प्रयोगशीलता सिद्ध करणाऱ्या प्रगल्भ शेतकऱ्यांनी नाशिकचे ओळख सातासमुद्रापलिकडे पोचवलीय. आता मात्र कारखानदारी अथवा नोकरी चे युग राहणार नसून शेतकऱ्यांचे शतक होणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना "रेडी टू इट' अन्‌ प्रक्रिया उद्योगाकडे वळवावे, असे प्रतिपादन विभागीय...
फेब्रुवारी 18, 2018
तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अतोनात मेहनत करत जालना जिल्ह्यातले काही शेतकरी शेतीचं नंदनवन करू पाहत आहेत. ही किमया घडत आहे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात. या जिल्ह्यातल्या जिरडगावच्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गटशेतीला आकार दिला असून, पाणीटंचाईवर मात करून शेती फुलवता येते, याचं कृतिशील दर्शन...
जानेवारी 02, 2018
चिपळूण - वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात पहारा देण्याचे चित्र आज फारसे दिसत नाही. अशावेळी शेतीच्या कामांना दिवस पुरत नाही म्हणून मध्यरात्रीपर्यंत शेतात राबतो, असे कोणी सांगितले तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र कळवंडे सात्वीणवाडीतील एक-दोन नव्हे, तर पन्नास शेतकरी...
डिसेंबर 31, 2017
पुणे - सकाळ माध्यम समूहाकडून दिला जाणारा मानाचा 'ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार' यंदा सांगली जिल्ह्यातील आष्टा गावचे संशोधक शेतकरी संजीव माने यांना दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊस शेतीत शास्त्रज्ञांच्या तोडीचे क्रांतिकारक प्रयोग करणाऱ्या संजीव माने यांनी हजारो...
नोव्हेंबर 15, 2017
येवला (नाशिक) : अनेक योजनांच्या जाहिरातीत होय मि लाभार्थी असे ठराविक लोक घेऊन सरकार आपले कौतुक मिरवत आहे पण अशाच अनेक योजनांमधील अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा करून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्याचे काय असा सवालही या जाहिरातीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. कांद्याचे आगार असलेल्या येवल्यात यावर्षी...
नोव्हेंबर 07, 2017
कापूस, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध मराठवाड्याला आज दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकऱ्याला रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण,...
सप्टेंबर 28, 2017
माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे.  गणेशोत्सवापाठोपाठा...
सप्टेंबर 22, 2017
पुणे - राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान निवडक गटांना देण्यासाठी नव्या धोरणावर शासनाने काम सुरू केले आहे. या धोरणातील कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तांकडून लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गटशेतीच्या धोरणावर निश्चित कामकाज कसे करावे...
सप्टेंबर 16, 2017
विटा - खानापूर तालुक्‍यातील पानसेमळा परिसरातील दीडशे एकर क्षेत्रातील ढबू मिरचीवर अज्ञात व्हायरसने हल्ला केला आहे. प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांची संकटातून सुटका करण्यासाठी ‘व्हायरस’ उद्‌भवाच्या कारणांचा शोध कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लावावा, उपाय...
सप्टेंबर 13, 2017
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देऊन सबलीकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतलाय. पथदर्शी योजनेची सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन्ही वित्तीय वर्षांत अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली....
सप्टेंबर 02, 2017
मिरज - "पंचायत समितीच्या मासिक सभेला विभाग प्रमुख दांडी मारतात; सामान्य कर्मचाऱ्याला बदली म्हणून पाठवतात. यामुळे आमची कामे होत नाहीत. तुमच्याप्रमाणेच सभेसाठी बदली म्हणून आमच्या पतीला पाठवू काय ?' असा उद्विग्न करणारा सवाल महिला सदस्यांनी विचारला. अधिकाऱ्यांच्या टाईमपासवर त्या भलत्याच कडाडल्या....
जुलै 13, 2017
सुमारे तेराशे लोकसंख्या असलेल्या देवगावचे शिवार (ता. वडवणी, जि. बीड) हलक्या, मध्यम आणि उच्च अशा विविध प्रतिचे आहे. बाजूला तलावही असल्याने सिंचनाची बऱ्यापैकी सोय आहे. मात्र, देवगावला एकेकाळी जणू कसली नजर लागली. गावातील काही जण व्यसनात बुडून गेले. संसाराची घडी विस्कटण्याएवढी परिस्थिती काहीवेळा...
जुलै 05, 2017
परभणी जिल्ह्यातील वर्णा येथील वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्यूसर शेतकरी कंपनीच्या सभासदांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याचे विविध फायदे त्यांना मिळत आहेत. बियाणे बचत करण्याबरोबर मूलस्थानी जलसंधारण होऊन जमिनीची धूप कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता टिकली आहे. व्यवस्थापन सुधारल्याने...
जून 15, 2017
परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात कोरटेक गाव वसले आहे. पूर्वी बोरना नदीकाठी वसलेल्या या गावचे १९९१ मध्ये गंगाखेड-सोनपेठ रस्त्यावर पुनर्वसन झाले आहे. सुमारे साडेसहाशे लोकसंख्या आणि ११३ उंबऱ्यांचे हे गाव आहे. बिनविरोध निवडीची परंपरा  सुरवातीच्या काळात कोरटेक-मव्हळा या दोन गावांची गट ग्रामपंचायत होती....
जून 13, 2017
शेतकऱ्यांच्या संघटनाचा ऐतिहासिक विजय, या शब्दांत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील फलनिष्पत्तीचे स्वागत करावे लागेल. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केलेलाच आहे. चर्चेच्या टप्प्यात सारी सूत्रे मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे असली आणि...
जून 06, 2017
भंडारा जिल्ह्यात सुमारे एक लाख ८६ हजार हेक्‍टर खरीप लागवड क्षेत्र आहे. त्यातील सुमारे एक लाख ७२ हजार हेक्‍टरवर भाताची म्हणजेच धानाची लागवड होते. धान हीच या जिल्ह्याची मुख्य पीकपध्दती आहे. जिल्ह्यातील माडगी येथील कवडू शांतलवार यांची सुमारे साडेसतरा एकर शेती आहे.  धान हे त्यांचे मुख्य पीक आहेच. शिवाय...