एकूण 228 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : गणेशोत्सवातील मुसळधार पाऊस किंवा देशातील आर्थिक मंदीचा कुठलाही परिणाम लालबागच्या राजाच्या खजिन्यावर दिसत नाही. यंदा भाविकांनी लालबागचा राजाचरणी रोख रक्कम, सोने, चांदी, असे भरभरुन दान टाकले आहे. आतापर्यंत पहिल्या 9 दिवसाची रक्कम मोजली असून 5 कोटी 5 लाख 30 हजार रोख रुपये जमले आहेत. तर 3किलो...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - तरुणाईचा जल्लोष, आकर्षक देखावे, बॅंडचे सुरेल वादन, ढोल-ताशांच्या निनादात शहरातील विसर्जन मिरवणुकीचा शुक्रवारी सकाळी जल्लोषात समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांमध्ये पुणेकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. वरुणराजाच्या हजेरीमुळे...
सप्टेंबर 14, 2019
‘मोरया मोरया’चा अखंड जयघोष पिंपरी - भंडारा - फुलांची मुक्तहस्ते उधळण... ढोल-ताशांच्या गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत चिंचवडमधील ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. लाडक्‍या गणरायाला निरोप...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - गर्दीने खचाखच भरलेले रस्ते... पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... ढोलताशांचा गजर... सर्वत्र मंगलमय वातावरण अन्‌ त्यातच गणेशभक्तांना टीव्हीवर दिसणारे कलाकार ढोलताशा वाजवताना झालेल्या दर्शनाची पर्वणी मिळाल्याने आनंदोत्सवात आणखीनच भर पडली. मानाच्या पहिल्या कसबा गणपती...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : मुंबई/ पुणे - पावसाच्या सरींना अंगावर घेत राज्यभरातील लाखो भक्तांनी बुधवारी ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असा आर्त सूर आळवत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. नेहमीप्रमाणे यंदाही विविध शहरांतील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका २० ते २२ तासांपेक्षाही अधिक काळ चालल्या. गणेश...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - ‘आम्ही पहिल्यांदाच गणेशोत्सवाला भेट दिली आहे. मिरवणुकीत वाजविण्यात आलेले पारंपरिक ढोल-ताशा मनाला भावणारे आहेत. सामूहिकरीत्या होणारे ढोल-ताशांचे वादन विलक्षण आहे, अशी प्रतिक्रिया जर्मनीहून आलेल्या रॉबर्ट यांनी दिली. जर्मनीतील मागदेबर्ग येथील रहिवासी असलेले रॉबर्ट...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्या वतीने आणि रोटरी क्‍लब ऑफ शनिवारवाडा यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील प्रमुख पाच विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्यसंकलन मोहीम राबविण्यात आली. मुठा नदीवरील सिद्धेश्वर-वृद्धेश्वर घाट, भिडे पूल,...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्यादिवशी दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळी साडेपाचनंतर अधून-मधून सुरू झालेल्या पावसातही पुण्यातील अलका टॉकीज चौकात गणेशभक्तांच्या गर्दीचा महापूर आला होता. मात्र, पावसाच्या हलक्‍या सरींनंतर काहीशी कमी झालेली गर्दी रात्री साडेदहानंतर...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला झाली. दिमाखदार विसर्जन मिरवणुका काढून गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकरच येण्याचे निमंत्रण देत गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या विसर्जनाच्या...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : कोथरूड - सकाळी ढोल - ताशांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. सायंकाळी विविध गाण्यांच्या तालावर थिरकत तरुणाईने आपल्या लाडक्‍या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. तब्बल चौदा तासांनंतर रात्री दोन वाजता मंगलमय...
सप्टेंबर 14, 2019
देहू - फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलपथकांच्या निनादात देहू आणि देहूरोड परिसरातील गणेशोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. स्वच्छतेला प्राधान्य देत अनेक सार्वजनिक मंडळांनी निर्माल्य इंद्रायणी नदीत टाकले नाही. देहू ग्रामपंचायत, रोटरी क्‍लब देहू आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे कार्यकर्ते निर्माल्य संकलित...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पिंपरी - गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी शहरातील अनेक संस्था, संघटनांचा गणेशोत्सवातील सक्रिय सहभाग दिवसेंदिवस वाढत असल्याचे यंदा विशेषत्वाने पाहायला मिळाले. अनेकदा वाहून न गेल्यामुळे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नदीपात्रात पडून असल्याचे दृश्‍...
सप्टेंबर 14, 2019
लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय...
सप्टेंबर 13, 2019
पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशाला मोठ्या उत्साहात व वाजतगाजत निरोप.
सप्टेंबर 13, 2019
पुणे - लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी जाणाऱ्या मानाच्या पाच गणेश मंडळांसह अन्य मंडळांनी दिमाखदार मिरवणुकीची परंपरा कायम राखली. मंडळांनी केवळ पारंपरिक वाद्यांचे वादन करीत बाप्पांना निरोप दिला.
सप्टेंबर 13, 2019
पुणे : टिळक रस्त्यावर डिजेच्या धुंदीनंतर मात्र मिरवणूकीत पारंपरिक हलगी वादन केले.
सप्टेंबर 13, 2019
पुणे -  गेले दहा दिवस पुणे शहरांमध्ये विसर्जन घाटावर तसेच रस्त्यावर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी काम करत असतात. या सर्वांना आपण धन्यवाद द्यायला हवे.
सप्टेंबर 13, 2019
पुणे : वैभवशाली परंपरा असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी तब्बल तीन तास लवकर संपली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झालेली मिरवणूक नऊच्या सुमारास मंदावली होती. मात्र पोलिसांनी स्पीकर बंद केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : पुण्याचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा दगडुशेठ हलवाई गणपतीला सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी निरोप देण्यात आला. यावर्षी दगडुशेठ गणपतीचे मनमोहक रूप विकटविनायक रथात विराजमान होते. असंख्य रंगांनी या रथाला विद्युतरोषणाई करण्यात आली होती.