एकूण 8954 परिणाम
मे 27, 2019
पुणे - आपल्या सर्वांच्या घरातील स्वच्छतागृह आणि बाथरूममधून दररोज बाहेर पडणारे 347 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे (एमपीसीबी) पुणे महापालिकेला दररोज 34 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा दंड मंडळाने वसूल केला आहे...
मे 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणूक आटोपताच शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या काळात हेल्मेटबाबत सबुरीने कारवाई करा, असा पोलिसांना सल्ला देणारे पालकमंत्री गिरीश बापट आता दिल्लीला पोचल्यामुळे पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली आहे. त्यामुळे वाहतूक...
मे 27, 2019
नागपूर - प्रेयसीच्या नातेवाइकांनी प्रेमाला विरोध दर्शवीत खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. सोबतच प्रेयसीच्या हातून राखी बांधून घेण्यास भाग पाडले. याचा विपरीत परिणाम होऊन प्रियकराने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी प्रेयसीची बहीण आणि तिच्या मामा, मामीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा...
मे 26, 2019
सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथे तलवारीने दहशत माजवणाऱ्या एकास ‘गुंडा’विरोधी पथकाने गजाआड केले. उमेश जयपाल घस्ते (वय २५, साठेनगर, आष्टा) असे त्याचे नाव आहे. आष्टा येथील रत्नराज हॉटेलजवळ पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.  अधिक माहिती अशी, की अवैध हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश...
मे 26, 2019
हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद...
मे 26, 2019
शेगाव : शहरातील चारमोरी पुलाजवळ राजस्थानमधील महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी २५ जूनच्या उशिरा रात्री पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी एका महिलेला तिघांनी मंदिर परिसरातून ज्युस पाजण्याच्या बहाण्याने चारमोरी पुलाकडे नेले आणि त्या भागात सामूहिक बलात्कार...
मे 26, 2019
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं. "सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलं,'' जोशी म्हणाले...
मे 25, 2019
पुणे : पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री गुंडांनी नागरीकांच्या घरांवर अक्षरशः पावसाप्रमाणे दगडफेक करत, 8-10 रिक्षांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी...
मे 25, 2019
पुणे : कधी एलियन (परग्रहवासी) दिसले म्हणून तर, कधी थेट चंद्रावर जमीन खरेदी करण्यासारख्या प्रकरणामध्ये पुणेकर आघाडीवर आहेत. त्यातच आता पहाटेच्यावेळी कोंबडा आरवल्यामुळे दररोज झोपमोड होते, म्हणून एका महिलेने चक्क कोंबडयाविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. हा प्रकार पुण्यातील सोमवार पेठेतील...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे एसआरपीएफची अतिरिक्त...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 23, 2019
निघोज (जि. नगर) - किराणा मालाच्या गोदामावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या चक्क एक पोलिसच असल्याचे समोर आले आहे. पोलिस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो पुणे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजले. या गुन्ह्याचा ठपका ठेवत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गायकवाड...
मे 23, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) - पहिल्या दोन मुली असताना, तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याच्या रागातून निमोण येथील एकाने पत्नीला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याबाबत तालुका पोलिसांनी वसंत कारभारी घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत आरोपी वसंत याची पत्नी विमल घुगे यांनी फिर्याद दिली. निमोण...
मे 22, 2019
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय...
मे 22, 2019
हिंगोली : तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे धुऱ्याच्या कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा खून करणाऱ्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 22) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.  हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे शंकर लक्ष्मण डोरले...
मे 22, 2019
नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा...
मे 22, 2019
लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना...
मे 22, 2019
औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. कामासाठी ठेवलेले पैसे दाखवा...
मे 22, 2019
औसा -  बुधोडा (ता. औसा) शिवारातील ‘ओमेक्‍स ॲग्रो फर्टिलायझर्स’ या कंपनीतील स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर कारखान्याचा मालक दिनेश पपरुनीया याच्याविरुद्ध आज औसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.  या कारखान्यत लिंबोळी, करंजपासून पेंड व तेल काढण्याचे काम चालते. त्याशिवाय जुने टायर जाळून...