एकूण 1778 परिणाम
मार्च 25, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील किरकोळ ते सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये दरोडा, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए), बेकायदा दारू विक्री, महाराष्ट्र संघटित...
मार्च 24, 2019
नागपूर - नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास शहरात सर्वाधिक गुन्हे होतात. शंभरावर गुन्हेगारांच्या टोळ्याही सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. गुन्हेगारीवृत्तीचे लोक मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहेत. पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून हे स्पष्ट होते. शहरात गुन्हे करणारे हे ग्रामीण...
मार्च 24, 2019
अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो...
मार्च 22, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे...
मार्च 20, 2019
पुणे : बिबवेवाडीतील दोन सराईत गुन्हेगारांना परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी 2 वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला. दोन्ही गुन्हेगारांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे किरकोळ व गंभीर गुन्हे दाखल आहेत. सनी शंकर जाधव (वय 21,रा. चैत्रबन वसाहत बिबवेवाडी...
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या बाराशे गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या...
मार्च 17, 2019
नांदेड : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा, तसेच आदर्श आचार संहिता पाळा असे आवाहन करत कायदाव व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. यावेळी एसपी संजय जाधव हे उपस्थित होते.  विशेष...
मार्च 16, 2019
येरवडा: ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सुधारण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून संगीतोपचाराचा वेगळा प्रयोग राबविला जात आहे. आतापर्यंत प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुरेश वाडकर, जगप्रसिद्ध ड्रमवादक व तालयोगी...
मार्च 15, 2019
सासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या...
मार्च 15, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात सोळा हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित आहे. निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे. नागरिकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होईल, धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरवली जाईल अशा प्रकारचे संदेश सोशल...
मार्च 15, 2019
पिंपरी - स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत अनेकांनी पोलिस आयुक्‍तांकडे पिस्तूल परवाना मागितला. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यातील २६ जणांना थेट मंत्रालयातून पिस्तूल परवाना दिला असून, त्यात शहरातील गुंठामंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. २६ जणांपैकी १५ जण हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत...
मार्च 14, 2019
सांगली -  जिल्हा पोलिस दलातर्फे काल रात्री जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑल आऊट ऑपरेशन करण्यात आले. त्यात 160 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दल सर्तक झाला असून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी व्यापक...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 14, 2019
मुंबई - परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने तहकूब केली. विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात मल्ल्याने उच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे....
मार्च 14, 2019
जळगाव ः निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जळगाव जिल्हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 555 व्यक्तींकडून शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे छाननी समितीची बैठक...
मार्च 14, 2019
मुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाच्या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आव्हान दिले आहे. सीबीआयने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, जोसेफ...
मार्च 13, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...