एकूण 218 परिणाम
डिसेंबर 14, 2018
पर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे रोखले होते. अपेक्षेपेक्षा पर्थची खेळपट्टी पहिले तीन तास खूप चांगली राहिली ज्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मार्कस हॅरीसच्या 70...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : राजकीय पटलावरील आपल्या डावपेचांचा भल्याभल्यांना अंदाज येऊ न देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजी करीत, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना चकविले. विशेष म्हणजे, पवार यांनी टाकलेले दोनपैकी एकही चेंडू चव्हाण...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी : कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले. शिमरॉन हेटमेयरच्या शतकाने वेस्ट इंडीजला भारतापुढे मोठे आव्हान ठेवता आले. भारताचा कर्णधार विराट कोहलीने...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
सप्टेंबर 29, 2018
दुबई : चिवट प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशला अखेर तीन विकेट राखून आणि शेवटच्या चेंडूवर चकवित भारताने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर सातव्यांदा नाव कोरले. बांगलादेशच्या 223 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजांनी धैर्याने फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी भारताकडून...
सप्टेंबर 27, 2018
अबु धाबी : मुशफिकूर रहिमची 99 धावांची खेळी आणि मुस्तफिजूर रेहमानची कमाल गोलंदाजी यामुळे बांगलादेश पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. आता शुक्रवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडकासाठी लढत होणार आहे. आशिया करंडक...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 20, 2018
दुबई : भुवनेश्‍वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत बुधवारी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.  भारताविरुद्ध सामना जिंकून हिरो बनायला निघालेल्या...
सप्टेंबर 19, 2018
दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करतानाच अचानक कोसळला आणि त्याला चक्क स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (बुधवार) सामना होत आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात विजय...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : ऍलिस्टर कुक आणि ज्यो रूटने दमदार शतके झळकावीत 259 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताविरुद्ध पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील यजमान इंग्लंडची पकड अजून मजबूत झाली. या दोघा दादा फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. चौथ्या दिवशी चहापानास इंग्लंडने 6 बाद 364 धावा केल्या होत्या....
सप्टेंबर 09, 2018
लंडन- मालिका यापूर्वीच गमावलेल्या भारतीय संघासाठी इंग्लंडचे शेपूट पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही डोकेदुखी ठरले. 7 बाद 198 वरून इंग्लंडने दुसऱ्या दिवशी तब्बल 134 धावांची भर घातली. 332 धावांपर्यंत मजल मारत यजमानांनी भारताचे "डेड रबर' जिंकण्याचे मनसुबे निम्मे तरी निकालात काढले. वेगवान गोलंदाज...
सप्टेंबर 02, 2018
साउदम्पटन : कर्णधार रूटच्या 48 धावांच्या खंबीर खेळीमुळे इंग्लंड संघाची दुसऱ्या डावातील आघाडीची मुळे थोडीशी रुजायला मदत झाली. बाकी इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीला बिचकून तोंड देत असताना रूटने चांगली फलंदाजी करून दुसऱ्या डावातील आघाडीची संख्या 125 वर नेली. रूट धावबाद झाला तरीही तिसऱ्या दिवशी...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
ऑगस्ट 18, 2018
कोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत डावऱ्या, चपण्या) मंडळींसाठी आहे. दैनंदिन कामात डाव्या हाताचा प्राधान्याने वापर करणारी ही मंडळी आहेत. व्यवहारात उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ९०...
ऑगस्ट 11, 2018
गुरुवारचा पहिला दिवस पावसाने धुतला गेल्यावर लॉर्डस कसोटी सामन्याला दुसर्‍या दिवशी एकदम वेळेवर सुरुवात झाली. ज्यो रूटने सलग दुसर्‍यांदा नाणेफेक जिंकली. फरक इतकाच होता, की पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेल्या ज्यो रूटने लॉर्डस कसोटीत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला....
ऑगस्ट 07, 2018
बर्मिंगहॅम - भारताच्या इतर फलंदाज दडपणाखाली असून, याचे विराट कोहलीवर दडपण येईल, अशी शाब्दिक खेळी इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हल बेलिस यांनी केली आहे. लॉर्डसवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडने विराटला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात...