एकूण 482 परिणाम
एप्रिल 03, 2019
मडगाव : मागच्या विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र गोमंतक (मगो) चे नावेलीचे उमेदवार व नावेली मतदारसंघ समितीचे अध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी घरवापसी करताना आज आपल्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.  मडगाव येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गोव्याचे...
एप्रिल 03, 2019
मडगाव : महाराष्ट्र गोमंतक (मगो) पक्षात फूट पडून दोन आमदारांनी भाजपात केलेला प्रवेश व त्यानंतर मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले. मात्र, तरिही मगोने भाजपप्रणित युती सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनीच ही माहिती मडगावात पत्रकार परिषदेत...
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...
मार्च 28, 2019
पणजी - गोव्यात मंगळवारी उत्तररात्री महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या विधिमंडळ गटात फूट पडून तीनपैकी मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे आज ‘मगो’चे आमदार असलेले उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे...
मार्च 27, 2019
पणजी : उत्तररात्री झालेल्या राजकीय घडामोडींत गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला खिंडार पडले आहे. मगोच्या तीन पैकी दोन अामदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी नंतर भाजपमध्ये हा गट विलीन केला. याला प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना...
मार्च 20, 2019
पणजी : गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरी यानिमित्ताने सरकारला पाठिंबा देण्यावरून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फूट पडल्याचे दिसून आले. पक्षाचे आमदार दीपक पाऊसकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी परस्परविरोधी माहिती देत या सारेकाही...
मार्च 19, 2019
पणजी : गोव्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) पहाटे दोनच्या सुमारास शपथ घेतली. राजभवनावर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर आणि "गोवा फॉरवर्ड'चे नेते विजय सरदेसाई...
मार्च 18, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (ता. 17) त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. मागील वर्षभर ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली व 'मनोहर भाई अमर रहें'च्या घोषणांनी...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 14, 2019
पुणे - तब्बल ६५ वर्षे संविधानिक हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आणि आदिवासी कोळी व अनुसूचित जमातींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘क्रांतिकारी जयहिंद सेना’ या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी समाज...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - आगामी अर्थसंकल्पात वकिलांसाठी विकासात्मक योजना राबवण्याची मागणी करत मंगळवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुंबईसह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने विविध...
फेब्रुवारी 08, 2019
गोवा : गोव्लोयातील कसभा निवडणुकीचा आढावा तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे उद्या 9 फेब्रुवारीला गोवा भेटीवर येत आहेत. यानिमित्त भाजपा गोवातर्फे अटल बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन कुजिरा -...
जानेवारी 29, 2019
पणजी : गोव्यात कॉंग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकमेकाचे प्रतिस्पर्धी असले तरी भाजपविरोधात या दोन्ही पक्षांची हातमिळवणी झाली आहे. मांद्रेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला तर शिरोड्यात मगोच्या उमेदवाराला या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंतर्गत मदत करतील असे ठरवण्यात आल्याची...
जानेवारी 28, 2019
पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या संपर्कात किमान पाच आमदार असून ते विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले, तर सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दुजोरा...
जानेवारी 28, 2019
पणजी : सी-फूडचा आनंद आणि एकदम सर्वसामान्य नागरिकांसाठी मौजमजा हे दुसरे कोणी नसून रविवारी गोव्याच्या किनाऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे निवांत क्षणाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या रविवारी गोव्यात सहलीसाठी गेले होते. दक्षिण गोव्यातील...
जानेवारी 16, 2019
पणजी : गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी ' घाटी ' या शब्द उच्चाराचे समर्थन केले आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा शब्द अपमानास्पद असल्याचे दोन वर्षांपूर्वीच्या निवाडयात म्हटले आहे. जर कोणी सामाजिक संस्था किंवा विरोधी पक्षाने आजगावकर यांच्या समर्थनास हरकत घेतली तर त्यांना ते अडचणीचे ठरू...
जानेवारी 15, 2019
मडगाव : फाॅर्मेलीन प्रकरणी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा काॅंग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का असा सवाल गोव्याचे नगर नियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.  मडगावच्या किरकोळ मासळी मार्केटात सफाई यंत्राचे अनावरण केल्यानंतर ते...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे कागदोपत्री टार्गेट पुर्ण होते. प्रत्यक्षात मात्र झाडे जगत नाहीत. त्यावर नियंत्रण आणुन आता 50 कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच वृक्ष...
डिसेंबर 11, 2018
नागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...