एकूण 297 परिणाम
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे....
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 13, 2019
दोडामार्ग - तालुक्‍यातील वझरे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर एका युवकाने चाकूने सपासप वार केले. त्या युवकाने स्वतःही आत्महत्या केली. हल्ला झालेली मुलगी अत्यवस्थ आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गोवा बांबोळी येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. मृत युवकाचे नाव गोकुळदास...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 02, 2019
मुंबई - मूळव्याधीच्या जागी औषध लावण्यासाठी वापरलेला आठ इंचाचा स्क्रू ड्रायव्हर सुतारकाम करणाऱ्या कारागीराच्या गुदद्वारात अकडला. लाजेखातर तो दोन दिवसांनंतर रुग्णालयात गेला. परळ येथील ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी एण्डोस्कोपी पद्धतीने १० मिनिटांत स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढला. ...
एप्रिल 18, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे अफलातून ‘मे फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बच्चेकंपनीला दोन दिवस विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानीच मिळणार आहे. ४ आणि ५ मे रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागते आणि प्रत्येक पालकाला...
एप्रिल 15, 2019
पुणे : वाढलेल्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामाचे चटके आता पुण्यालाही बसू लागले आहेत. दिवसागणिक ढासळणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आणि "ग्लोबल वार्मिंग'चे आव्हान थोपविण्याची जबाबदारी पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी घ्यावी, असे आवाहन खासदार वंदना चव्हाण यांनी रविवारी केले. "गेल्या पाच...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक...
मार्च 29, 2019
चिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ते 15 वर्षे जलसंधणारणाच्या कामात सक्रिय आहेत.  चिपळूण शहरातील नाले, वहाळ पालिकेने ताब्यात घेऊन मिनी केरळ उभारता येईल ही संकल्पना त्यांनी...
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक’ या रिअल...
मार्च 26, 2019
बीजिंग: अरुणाचल प्रदेश आणि तैवान हा चीनचा भाग न दाखविल्याने तेथे प्रसिद्ध झालेले जगाचे 30 हजार नकाशे नष्ट केल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचाच भूभाग असल्याचा दावा चीनचा आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत व अविभाज्य भाग...
मार्च 25, 2019
बुद्धीची निर्यात म्हणजे "ब्रेन ड्रेन'. या विषयाबद्दल अधूनमधून भारतातील विचारवंत आपले विचार मांडत असतात. विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात; पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग बाहेरील देशांना होतो, असा आक्षेप घेतला जातो. यातील पुष्कळशी मंडळी आपल्या मिळकतीचा काही हिस्सा कुटुंबीयांसाठी मायदेशी पाठवतात....
मार्च 24, 2019
जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय...
मार्च 23, 2019
भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल...
मार्च 22, 2019
पुणे - विविध गाण्यांच्या तालावर रंग व फुलांची उधळण करून दिव्यांग आणि वंचित मुलांनी एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला. धूलिवंदनानिमित्त भोई प्रतिष्ठानने विशेष मुलांसाठी रंग बरसे कार्यक्रम आयोजिला होता. एकलव्य न्यास, स्वाधार संस्था, लुई ब्रेल अंध अपंग संस्था, महावीर निवासी मतिमंद संस्था, दीप ...
मार्च 19, 2019
खामगाव : म्हातारवयात विविध आजार जडत असतात. त्यावर उपचार म्हणून वेगवेगळ्या डॉक्टर कडून विविध प्रकारची औषधे दिल्या जातात. औषधे घेण्याचे प्रमाण वाढते. औषधांचा अतिरेक वृद्ध रुग्णासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे डॉक्टरांनी 'डी प्रिस्कीपशन' म्हणजेच कमी औषधे देण्याची पद्धत उपयोगात आणावी, असे मार्गदर्शन...
मार्च 19, 2019
उत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी सुरू केलेला जलमार्गावरील प्रचार लक्षवेधी, आगळावेगळा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही दोन घ्या, तुम्ही सात घ्या; असा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ...
मार्च 18, 2019
नांदेड : यशवंत महाविद्यालयात एमएस्सीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नेहा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीस आज दुपारी सोमवारी (ता. 18) बाराच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने चक्कर येऊन पडल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. ईतवारा परीसरात राहणारी नेहा चव्हाण यशवंत महाविद्यालय शिकत आहे....
मार्च 14, 2019
मुंबई - रक्तगट जुळत नसतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. या मुलाला वर्षभरापासून कोणताही संसर्ग झालेला नाही. त्याच्या शरीराने नवे मूत्रपिंड स्वीकारले असून, वर्षभरात वजनात १० किलोने वाढ झाली आहे.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात वर्षभरापूर्वी आठ...
मार्च 13, 2019
करकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने विकसीत केलेली 'क्यूआर कोड' पद्धत 2015 पासून क्रमिक पुस्तकांमध्ये वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या त्याचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू...