एकूण 4960 परिणाम
मार्च 19, 2019
माजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकरा वाजता घडली. माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या...
मार्च 19, 2019
घोटी : धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने शाळेसमोर असलेल्या झाडाला दोर लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. खडकेद येथील दहावीचा विद्यार्थी शरद भाऊ उघडे धामणगाव येथील माध्यमिक निवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. त्याने पहाटे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर तब्बल 98 जिवंत काडतुसे आढळून आली. दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणेसह प्रशासनात खळबळ उडवून दिली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट...
मार्च 18, 2019
पणजी : काँग्रेसच्या आमदारांनी आज दुपारी राजभवनावर जात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसने गेल्या वर्षभरात असा दावा सहाव्यांदा केला आहे.  काँग्रेसने शनिवारी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री त्यांनी राज्यपालांची भेट मागितली होती...
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत,...
मार्च 16, 2019
मालवण - गव्याच्या हल्ल्यात नांदोस गावकरवाडा येथील एक शेतकरी ठार झाला. सूर्यकांत अनंत कोरगावकर (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडली.  नांदोस गावकरवाडा येथील सूर्यकांत कोरगावकर शेती करतात. यावर त्यांची उपजीविका आहे. ते दुपारी काजूच्या रोपांना...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हा पूल कोसळल्यानंतर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात मोठी...
मार्च 15, 2019
हिवरखेड (अकोला) : अकोल्यातील तेल्हारा तालूक्यातील हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर शाळेत एक रानडुक्कर घुसले आहे. शिक्षकाच्या समयसुचकतेनं शाळेतील विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत. सध्या त्या रानडुक्करला शाळेतील एका खोलीत कैद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती अकोट वनविभागाला देताच, त्यांनी...
मार्च 15, 2019
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चच्या दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात एक महिला तर तीन  पुरुषांचा समावेश आहे.  ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून, ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. अशी...
मार्च 15, 2019
वेलिंग्टनः न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोर गोळीबार करत असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरलं आहे....
मार्च 15, 2019
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली. तसेच संघातील सर्व खेळाडू सुखरूप आहेत...
मार्च 15, 2019
रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले. काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी येथील द्वारका पारकर हे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये खवल्या मांजर दिसले. त्यांनी तातडीने...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत....
मार्च 15, 2019
वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघ थोडक्यात बचावला आहे.  दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी हल्लेखोराने...
मार्च 15, 2019
पिंपरी (पुणे) - भंगार आणि लाकडाच्या गोदामाला लागलेली आग सात तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली कुदळवाडी परिसरात गुरूवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कुदळवाडी चिखली परिसरात भंगार...
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत आता जबाबदारी झटकण्याचा...
मार्च 14, 2019
सातारा - जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्‍यक भासणारी रक्तघटक स्वतंत्र करण्याची यंत्रणा गेल्या साडेचार वर्षांपासून लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. आधी इमारती व आता यंत्रणेअभावी काम रेंगाळल्याने सामान्य नागरिकांना खासगी पेढ्यांमधून रक्तघटक घेण्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. रक्तामध्ये लाल...
मार्च 13, 2019
रियाध (सौदी अरब) : सौदी अरबमधील एका अजब घटनेमुळे उड्डान केलेले विमान तातडीने पुन्हा विमानतळावर उतरवावे लागले.   आपल्या तान्ह्या बाळाला आई विमानतळावरच विसरून विमानात येऊन बसली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्याने अस्वस्थ झालेल्या आईने वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरविण्याची विनंती केली.  फ्लाईट...