एकूण 55 परिणाम
ऑक्टोबर 10, 2017
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी 28 सप्टेंबरला अनपेक्षितपणे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. अबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला दोनतृतीयांश बहुमत असताना चौदा महिने आधीच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ब्रिटनमध्ये...
सप्टेंबर 15, 2017
परस्परपूरक विचार आणि हिताचे समान मुद्दे यामुळे जशी दोन देशांतील मैत्री घट्ट होते, तेवढीच समान आव्हानामुळेही होते. भारत व जपान यांच्यातील वाढत्या सहकार्याला या दोन्ही घटकांची पार्श्‍वभूमी आहे. उभय देशांतील मैत्रीची ही "बुलेट ट्रेन' पुढील काळात सुसाट धावेल, असे आशादायक चित्र पंतप्रधान...
सप्टेंबर 05, 2017
उत्तर कोरिया सातत्याने आगीशी खेळ करून जगाला भंडावून सोडत असला, तरी त्याला अटकाव करण्याचे प्रयत्न परिणामकारक ठरलेले नाहीत. या  राजनैतिक अपयशाची कारणे शोधून व्यूहरचना बदलावी लागेल.  उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन सातत्याने आपल्या डरकाळ्या फुकाच्या नाहीत, याचीच जाणीव जगाला करून देत आहे. काही...
ऑगस्ट 09, 2017
सोळा जून 2017 च्या कुमुहूर्तावर भारतासाठी चीनबरोबर एका नवीन आघाडीचे सूतोवाच झाले. 1962चे युद्ध लडाख आणि नेफामधील तवांग व वलॉंग आघाड्यांवर घडले. 1967च्या ऑक्‍टोबरमध्ये सिक्कीमच्या प्रसिद्ध नथूला खिंडीत त्याआधी आणि नंतरही कित्येक वर्षे डोळ्यास डोळा भिडवून समोरासमोर मोर्चेबंदीत वावरणाऱ्या भारतीय आणि...
जून 12, 2017
गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका झाल्या. याच वर्षीच्या सप्टेंबरमध्ये जर्मनीत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. अमेरिका, फ्रान्समध्येही नुकत्याच निवडणुका झाल्या. चार महत्त्वाच्या युरो-अटलांटिक देशांमध्ये कोणते वारे वाहत आहेत, याचा अंदाज त्यानिमित्ताने घेता येऊ शकतो. या...
एप्रिल 04, 2017
वस्तुनिर्मिती क्षेत्रातील उच्च दर्जाच्या कंपन्या असल्याशिवाय कुठलाही देश प्रगतीचा मोठा पल्ला गाठू शकत नाही. भारताला ती संधी आहे आणि त्यासाठीच अभियंत्यांना मूळ अभियांत्रिकीकडे वळवणे गरजेचे आहे. प्रतिकूल परिस्थिती किंवा संकटाकडे संधी म्हणून पाहायला हवे. स्थलांतरितांबद्दल, विशेष करून ‘एच १ बी व्हिसा’...
मार्च 21, 2017
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी अलीकडेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा केलेला दौरा आर्थिक आणि राजकीय दृष्टीने महत्त्वाचा होता. जपान आणि चीनसोबत अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. मलेशिया, इंडोनेशिया,...
फेब्रुवारी 21, 2017
आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करताना परस्परांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यावर मेक्‍सिकोचा विश्‍वास आहे. अमेरिकेबरोबरच्या आर्थिक-व्यापारी संबंधांचे स्वरूप लक्षात घेतले, तर त्याचा फायदा उभयपक्षी होतो आहे, हे लक्षात येईल. अमेरिका व मेक्‍सिको यांच्या सीमेवर भिंत बांधण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...
फेब्रुवारी 14, 2017
सगळ्या जागतिक राजकीय संबंधांची आपण नव्याने मांडामांड करू, अशा कितीही वल्गना केल्या आणि आपली कोरी पाटी हेच आपले बलस्थान असा पवित्रा घेतला तरी सत्तास्थानी येऊन प्रत्यक्ष वास्तवाला भिडायची वेळ आली, की जमिनीवर उतरावेच लागते; एवढेच नव्हे तर पूर्वसुरींनी आखलेल्या धोरणाचाही मागोवा घ्यावा लागतो....
जानेवारी 02, 2017
पूर्वेकडच्या जपान व ऑस्ट्रेलियापासून पश्‍चिमेकडील एकेक देश काल क्रमाने नव्या वर्षाचे स्वागत करत गेला. आकाश व्यापणारी रंगीबेरंगी आतषबाजी, स्वागत सोहळे, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम, युवावर्गाचं नाचगाणं-जल्लोष हे दरवर्षीसारखंच होतं. सिडनी हार्बर, बुर्ज खलिफा अशा जगभरातल्या नामांकित...
जानेवारी 01, 2017
‘कोट्यधीश’ पुण्यातली तरुणाई असेल तरी कशी? त्यांच्या ॲस्पिरेशन्स काय असतील? त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकरी-धंदा-व्यवसायाच्या कल्पना काय असतील? ही भविष्यातली महानगरीय तरुणाई आपल्या मुळांशी घट्ट जोडलेली असेल की तुटलेली? अशा अनेक प्रश्नांचा घेतलेला धांडोळा. मुंबई, दिल्ली, कोलकाता ही नावं घेताच...
डिसेंबर 28, 2016
हिंदी महासागराच्या भागातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, अशा अनेक संधी आहेत. पण, या प्रदेशाची काही आव्हाने आहेत, त्यावर योग्यप्रकारे काम केले, तर देशाच्या आर्थिक बळकटीसाठी हा प्रदेश मोलाचे योगदान देऊ शकतो.   ‘बॅराकुडा’ या भारतीय टेहळणी जहाजाचे मॉरिशसमध्ये गेल्या वर्षी हस्तांतर झाले, त्या...
नोव्हेंबर 16, 2016
जपानबरोबरचा अणुकरार झाल्यामुळे अणुभट्ट्या आणि त्याचे तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अमेरिकेबरोबरचा अणुकरारही पूर्णत्वाला जाण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा नुकताच पार पडला. सत्तेवर आल्यानंतरचा हा दुसरा दौरा. त्यात झालेला अणुसहकार्य करार हा...
नोव्हेंबर 14, 2016
आण्विक क्षेत्रात जपानचे सहकार्य मिळावे, यासाठी भारत गेली काही वर्षे कसून प्रयत्न करीत होता. त्या प्रयत्नांतील एक मोठा अडथळा भारत व जपान यांच्यातील अणुकरारामुळे दूर झाला आहे. परिस्थितीचा रेटा जेव्हा तयार होतो आणि बिकट आव्हाने पुढ्यात येऊन ठाकतात, तेव्हा पारंपरिक आणि पूर्वनिश्‍चित...
नोव्हेंबर 14, 2016
अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानाची ही गोष्ट ! त्या वेळी मदनलाल खुराणा हे संसदीय कामकाजमंत्री होते. त्यांना प्रसिद्धी आणि पत्रकार परिषदांची विलक्षण हौस होती. अनेकदा ते काहीतरी वादग्रस्त विधान करून जात आणि मग त्याच्यासाठी खुलाशासाठी पुन्हा पत्रकार परिषद होत असे. "पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी असेल...