एकूण 396 परिणाम
एप्रिल 17, 2019
पिंपरी - वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १५ जुलैऐवजी १५ जूनपर्यंतच पाणी पुरेल अशी स्थिती आहे. तसेच पाण्याची काटकसर, पुनर्वापर, गळती याकडे नागरिकांकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने पुढील महिन्यात आणखी पाणीकपात होण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 01, 2019
नागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली. मात्र, पाण्याच्या बचतीसंदर्भात महापालिकेकडून कुठलीही जनजागृती नसल्याने एका व्यक्तीला १३५ लिटर पाण्याची गरज असताना अडीचशे लिटर पाण्याची उधळण होत असल्याची...
मार्च 29, 2019
चिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ते 15 वर्षे जलसंधणारणाच्या कामात सक्रिय आहेत.  चिपळूण शहरातील नाले, वहाळ पालिकेने ताब्यात घेऊन मिनी केरळ उभारता येईल ही संकल्पना...
मार्च 28, 2019
पिंपरी -  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. केवळ १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा बुधवारी  (ता. २७) धरणात शिल्लक होता.  परिणामी, उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणीही वाढल्याचा विचार करून जलसंपदा विभाग व महापालिकेच्या...
मार्च 27, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी केवळ २.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दर वर्षीनुसार उन्हाळी पिकांसाठी सुमारे पाच टीएमसीऐवजी आता निम्मेच पाणी मिळणार असल्यामुळे उन्हाळी पिकांना फटका बसणार...
मार्च 25, 2019
चिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे पुन्हा कोयना धरणात आणून त्यातून वीजनिर्मिती करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार...
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती समितीचे सदस्य व निवृत्त...
मार्च 15, 2019
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी द्यावे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करणारी याचिका इंदापूर तालुका खडकवासला प्रकल्प लाभधारक...
मार्च 13, 2019
पिंपरी - शहरातील पाणीपुरवठ्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत असून, ती दहा टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात येणार आहे. पवना धरणाच्या जलाशयात आज पुरेसा पाणीसाठा असून, तो जुलैच्या मध्यापर्यंत पुरण्याची शक्‍यता आहे. उन्हाळ्यात होणारे बाष्पिभवन, तसेच पावसाळा लांबल्यास सध्याचा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत वापरता...
मार्च 02, 2019
भंडारा : नागपूर येथे कार्यरत असलेल्या व्यक्तीचा स्वाइन फ्लूच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिशिर वाडीभस्मे (वय 44) असे मृताचे नाव आहे. शिशिर वाडीभस्मे नागपूर येथे जलसंपदा विभागात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. परंतु,...
मार्च 01, 2019
पिंपरी -  शहरातील पाणीपुरवठा एका भागात आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता. १) करण्यात येणार आहे. शहराचे सात भाग करण्यात आले असून, पाणीपुरवठा बंद राहण्याचे दिवस निश्‍चित झाले आहेत. पवना धरणात असलेला कमी पाणीसाठा आणि उन्हाळा या...
फेब्रुवारी 28, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : राज्य विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात वरखेडे-लोंढे बँरेज प्रकल्पासाठी जलसंपदा विभागातर्फे 22.94 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून 80 कोटी असा एकूण 102.94 कोटीचा निधी या प्रकल्पाच्या कामाला उपलब्ध होणार आहे. आमदार उन्मेष पाटील...
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - सिंचन प्रकल्पावरून आघाडी सरकारची कोंडी करून प्रत्यक्ष सिंचन वाढल्याचा दावा करणाऱ्या युती सरकारमधेही पंतप्रधान कृषी सिंचन योजना रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत केंद्र सरकारने राज्यातील २६ प्रकल्पांना मान्यता दिली होती. हे प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण...
फेब्रुवारी 15, 2019
जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात...
फेब्रुवारी 12, 2019
राज्यात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त खर्च झालेले १५० प्रकल्प पूर्ण होणार मुंबई - राज्यातील महत्त्वपूर्ण अशा गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, महानदी आणि पश्‍चिम वाहिनी नद्या या खोऱ्यांच्या एकात्मिक जल आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली. राज्य जल परिषदेने व जलसंपदा...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे. मंत्री महाजन...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्याहून कमी म्हणजे ४९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. आणखी सहा महिने जुलैअखेर हे पाणी पुरवावे लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या प्रकल्पात पाणीसाठा पाच अब्ज घनफूटने (टीएमसी) कमी असूनही पाण्याचा वापर पूर्वीसारखाच सुरू आहे. त्यामुळे...
जानेवारी 31, 2019
आटपाडी - तालुक्यातील अंशतः आणि पूर्णतः वगळलेल्या वंचित गावांना समन्यायी प्रकल्पामुळे पाणी देण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार अनिल बाबर व अन्य लोकप्रतिनिधी दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. आमदार आणि इतर नेतेमंडळीनी वंचित गावावरून दिशाभूल...
जानेवारी 23, 2019
अमरावती : राज्यातील सिंचन प्रकल्पांवर जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे. दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने खासगीकरणाच्या माध्यमातून बीओटीवर प्रकल्पांच्या उभारणीच्या धोरणालाही धक्का बसू लागला आहे. राज्यात 733 मेगावॉट...