एकूण 1911 परिणाम
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार...
मार्च 22, 2019
मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या घराच्या अंगणात सिमेंट काँक्रीटचा रस्ता केवळ छिनी हातोड्याचा वापर करत तोडून शोषखड्डा तयार केला. पाणी फाउंडेशनच्या कामला हातभार लावताना आपणही...
मार्च 21, 2019
औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या...
मार्च 20, 2019
विवाह न जमणाऱ्यांच्या जुळविणार रेशीमगाठी!  जळगाव : मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळविताना आई-वडिलांना फिरफिर करावी लागते. यात मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत. योग्य वधू-वरांची शोधाशोध करताना वयाची तीस वर्षे पूर्ण होऊन जातात आणि विवाह...
मार्च 20, 2019
जिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग  जळगाव :  जिल्ह्यातील सातबारा उतारा तयार करणारे संगणकीय सर्व्हर बंद पडल्याने  शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना 7/12 उतारे मिळत नाही. यामुळे सातबारा उताऱ्याशिवाय अनेक कामे प्रलंबित आहेत. आतापर्यंत सर्व्हर अतिशय स्लो होते. मात्र तेही आता बंद पडल्याने...
मार्च 20, 2019
मतदार संघात एक आदर्श, एक  महिला मतदान केंद्राची निमिर्ती  जळगावः विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श, एक महिला मतदान केंद्र तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी सेल्फी पॉइंट ठेवले...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत...
मार्च 19, 2019
जळगाव - जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली...
मार्च 19, 2019
जळगाव - महेलखेडी (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा- दहा रुपये जमा करून मासांहार जेवण दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रवींद्र सूर्यभान पाटील यांनी शिक्षण समिती सभेत मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करून मुख्याध्यापकावर योग्य ती कारवाई करण्याचे...
मार्च 18, 2019
जळगाव : शहरातील ट्रॅफिन गार्डन परिसरातील तरुणाने प्रेमप्रकरणातून शहरातीलच एका भागातील तरुणीला घेऊन पलायन केले होते. या दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, दहा ते पंधरा दिवसांनंतर प्रेमीयुगुल शहरात परतले. हा वाद पोलिस ठाण्यात...
मार्च 18, 2019
जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ...
मार्च 18, 2019
जळगाव - शहरासह जिल्ह्यातील तापमानात आता दिवसागणिक वाढ होत असून, सकाळपासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यंदा मार्चमध्येच तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने आगामी काळात जळगावकरांना झळा सोसाव्या लागणार की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच दुपारी रस्त्यांवर...
मार्च 17, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील. या पुलाच्या कामामुळे शिवाजीनगरात राहणाऱ्या नागरिकांसह इतर ग्रामीण भागातील सुमारे अडीच ते तीन लाख नागरिकांना जळगावला येण्यासाठी किमान...
मार्च 17, 2019
जळगाव ः महिला व बाल कल्याण विभागांतर्गत मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी मुलींच्या नावाने प्रोत्साहन म्हणून "माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया मोफत असून, अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेणारे दलाल सक्रिय झाले आहेत. यातून...
मार्च 17, 2019
जळगाव : रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही माजी खासदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने दोन्ही उमेदवारांत टक्कर होणार असल्याचे...
मार्च 17, 2019
जळगाव : लोकसभेचा रावेर मतदारसंघ मिळण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. आमचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी चर्चा करीत आहेत. तो आम्हाला मिळेलच, याची शंभर टक्के खात्री असून, निश्‍चित आमचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी व्यक्त केला. "सकाळ संवाद'...
मार्च 16, 2019
जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असे पहा कि चांगल्या चांगल्याची झोप उडाली पाहिजे. जसे की मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा सगळ्यांचीच झोप उडाली होती असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे. भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात...