एकूण 847 परिणाम
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र...
डिसेंबर 11, 2018
बारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह संपूर्ण राज्याने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला. नवरीला तिची लहानपणी हरवलेली बहीण थेट विवाहाच्या मंडपात भेटली, तो क्षण अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणून पाहिला...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : "स्कुबा डायविंग' हा "अंडरवॉटर डायविंग'चा एक प्रकार. जेथे डायव्हर एक अंतर्निहित अंडरवॉटर श्‍वास उपकरण (स्कुबा) वापरून पाण्याखाली स्थिर राहण्यासाठी पृष्ठभागापर्यंत पोहोचत असतो. यात पाण्याचा दबाव नियंत्रित करणे महत्त्वाचे असून, हा कठीण "स्कुबा डायविंग'चा खेळ अंदमान 35 मीटर पाण्याखाली जाऊन...
डिसेंबर 03, 2018
आळंदी - चुकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांना दूर होण्यासाठी, तसेच सुरक्षाविषयक सूचना देण्यासाठी आळंदी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा आणि ध्वनिक्षेपकामुळे चांगला परिणाम झाला. रस्त्यावरील हातगाड्यांचे अतिक्रमण कमी झाले आणि चुकलेल्या चोवीस व्यक्तींना त्यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे. त्याउलट धार्मिक स्थळे आणि मॉलमध्ये काटेकोर सुरक्षा ठेवली जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. चर्चगेट स्थानक वगळता मुंबईतील एकही स्थानक...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी...
नोव्हेंबर 25, 2018
नवी दिल्ली- येत्या डिसेंबर महिन्यात टीव्हीसह इतर घरगुती उपकरणे महागणार असल्याचे संकेत आहेत. अशा उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती 7 ते 8 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा विचार करीत आहेत. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया तसेच, सीमा शुल्कात झालेल्या वाढीमुळे कंपन्यांच्या...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे/गोकूळनगर - येवलेवाडी येथील श्री गणेश ज्वेलर्सच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी भरदिवसा एका कर्मचाऱ्यावर पिस्तुलातून जवळून गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने येवलेवाडीत खळबळ उडाली. अमृत परिहार (वय २७, रा. मूळ राजस्थान) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.  येवलेवाडी येथील जिल्हा...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 17, 2018
उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व या घटनेतील आरोपींना चार दिवसानंतरही अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश याच्या निषेधार्थ उरुळी कांचन व परिसरातील व्यापाऱ्यांच्या वतीने शनिवारी (ता. 17) दिवसभर...
नोव्हेंबर 16, 2018
गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या गडबडीत राजकारण आणि समाजकारणाकडे अंमळ दुर्लक्ष झाले; परंतु या पुढे आम्ही यथास्थित लक्ष देऊ. गेले काही महिने सदर मंगलकार्याचे आम्हाला प्रचंड टेन्शन होते....
नोव्हेंबर 14, 2018
नागपूर - शाळकरी विद्यार्थ्याने घरी कुणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना महाल परिसरात उघडकीस आली आहे. मोबाईल व व्हिडिओ गेमच्या नादातून त्याने हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे.  क्रिश लुनावत (१४) रा. मुंशी गल्ली, महाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सातव्या वर्गात...
नोव्हेंबर 14, 2018
बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते "सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. "बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - वाहतूक शाखा डिजिटल होत असताना तांत्रिक त्रुटीतही वाढ होत आहे. नियमभंग करणारे वाहन व चालक एक आणि नोटीस दुसऱ्याला दिल्याचा प्रकार उजेडात आला. असे प्रकार यापूर्वीही घडले असून, यातून ज्यांची चूक नाही अशा वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओॲसिस चौक, एमआयडीसी...
नोव्हेंबर 13, 2018
बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं!  बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या!  मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!!  बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांवरून टाकण्यात आलेले धोकादायक केबल काढण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आठ दिवस मोहीम राबविण्यात आली. मात्र, अद्याप अनेक रस्त्यांवर धोकादायक केबल कायम असून, मोहीम अर्धवट थांबविण्यात आल्याने नागरिकांच्या जिवाला धोका कायम आहे. पथदिव्यांसाठी...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...