एकूण 46 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस करंडक सांघिक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. या संदर्भात होणारी भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यातील बैठक एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. ...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - आशिया-ओशियाना गट 1 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक लढत पाकिस्तानऐवजी अन्यत्र खेळविण्यात यावी, याविषयी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याची संधी भारताला आज मिळणार आहे. उद्या सोमवारी आयटीएफच्या पदाधिकाऱ्यांशी...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक टेनिस लढतीबाबत भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यात सोमवारी चर्चा होईल, पण त्यापूर्वी भारतीय टेनिस संघटनेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी नसल्याचे जणू स्पष्ट केले आहे. लढत त्रयस्थ ठिकाणी...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली / मुंबई : डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची लढत भारतास त्रयस्थ ठिकाणी हवी असेल, तर त्यासंदर्भातची विनंती करताना कारणेही स्पष्ट करावीत, असे पत्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस महासंघास लिहिले आहे. त्यावर भारताने त्रयस्थ ठिकाणच्या...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली : सद्यस्थितीत भारतीय टेनिसपटू पाकिस्तानात खेळूच शकत नाहीत हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने समजून घ्यायला हवे. त्यांना सर्व काही समजून सांगण्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे, असे भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी सांगितले. डेव्हिस करंडक टेनिस...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाशी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक चळवळीशी बांधील आहोत, असे सांगत भारतीय टेनिस संघटनेचे पदाधिकारी भारतीय संघ पाकिस्तानातील डेव्हिस करंडक लढत खेळणार असल्याचे सांगत होते, पण आता केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरबाबत घेतलेल्या...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली - एकेरी आणि दुहेरीतही खेळू शकणाऱ्या साकेत मयनेनीचे भारतीय डेव्हिस करंडक टेनिस संघात पुनरागमन झाले आहे. आशिया ओशियाना गट १च्या पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय टेनिस संघटनेने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली.  या लढतीसाठी भारतीय टेनिस संघटनेने अनुभवाला...
ऑगस्ट 03, 2019
पुणे : भारताच्या अर्जुन कढे-साकेत मायनेनी यांच्या जोडीने चीनमधील चेंगडू एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी कोरियाच्या नाम जी सुंग-सॉंग मीन क्‍यू यांच्यावर 6-3, 0-6, 10-6 अशी मात केली. अर्जुन-साकेतने भक्कम खेळ करताना सहापैकी तीन ब्रेकपॉइंट जिंकले. दुसरीकडे त्यांनी...
ऑगस्ट 01, 2019
लाहोर -  डेव्हिस करंडक लढतीसाठी भारतीय संघाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल असा विश्‍वास पाकिस्तान टेनिस महासंघाचे सचिव निवृत्त कर्नल रेहमान गुल यांनी व्यक्त केला आहे.  भारतीय संघाचा कर्णधार महेश भूपती याने खेळाडूंच्या सुरक्षेविषयी विचारणा केली होती. त्यानंतर गुल...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - टेनिस खेळण्याचा आनंद अजूनही घेत असल्यामुळे निवृत्तीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले.  मी आणखी किती खेळणार, या वर्षअखेरीस निवृत्त होणार का, यापैकी कुठल्याच प्रश्‍नाचे उत्तर माझ्याकडे नाही. हे वर्ष संपेल तेव्हा मी विचार करेन. अजून तरी...
एप्रिल 08, 2018
तियानजीन (चीन) - भारताने डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेत सलग पाचव्या वर्षी जागतिक गट पात्रता लढतीमधील स्थान निश्‍चित केले. लिअँडर पेसने दुहेरीत सर्वाधिक विजयांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांनी ‘...
एप्रिल 06, 2018
तिआनजीन (चीन) - जागतिक गटाच्या प्ले-ऑफ गटात प्रवेश करण्यासाठी डेव्हिस करंडक लढतीत उद्यापासून भारताची लढत चीनशी होईल. अनुभवी लिअँडर पेसला या लढतीत स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरीतील विजय मिळविण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर ४२ विजय आहेत....
एप्रिल 02, 2018
नवी दिल्ली - डेव्हिस करंडक संघातील दुहेरीचा राखीव खेळाडू दिवीज शरणने लढतीसाठी चीनला न जाण्याचे ठरवले आहे. संघाला अगदीच गरज भासली, तर आपण चीनला जाण्यास तयार आहोत, असे त्याने भारतीय टेनिस संघटनेला कळवले आहे. भारत आणि चीन यांच्यातील डेव्हिस करंडक लढत...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली - डेव्हिस करंडक जागतिक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील खेळाडू टूरवर एकत्र खेळत नसतील तर यश मिळणे कठीण असते, असे मत माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी व्यक्त केले. चीनविरुद्धच्या लढतीसाठी ‘आयटा’ने (अखिल भारतीय टेनिस संघटना) क्रमवारीनुसार अव्वल खेळाडू रोहन...
मार्च 12, 2018
नवी दिल्ली - भारताच्या सध्याच्या संघातील दुहेरीचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची चीनविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीसाठी केलेली विश्रांतीची विनंती भारतीय टेनिस निवड समितीने रविवारी फेटाळून लावली.त्याचबरोबर अनुभवी लिअँडर पेस याला भारतीय संघात पुन्हा स्थान दिले.  एकूणच निवड...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे  - ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक सत्येंद्र प्रकाश गोसावी (वय ८५) यांचे सोमवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा हिमांशू व एक मुलगी असा परिवार आहे. टेनिस प्रशिक्षकच असलेले हिमांशू यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वडील पपी गोसावी नावाने ओळखले जात. त्यांनी आधी डेक्कन जिमखाना...
जानेवारी 14, 2018
गेली २१ वर्षं चेन्नईत होत असलेली एटीपी टेनिस स्पर्धा यंदा ‘महाराष्ट्र ओपन’ नावानं नुकतीच पुण्यात झाली. पहिलंच वर्ष असूनही उत्तम संयोजनामुळं महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं. ‘केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धे’पाठोपाठ ‘महाराष्ट्र ओपन’मुळं पुण्याचीही वेगळी ओळख टेनिसच्या विश्‍वात निर्माण...
जानेवारी 04, 2018
पुणे - टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या एकेरीतील भारताच्या आशा संपुष्टात आल्या. युकी भांब्रीने फ्रान्सच्या पिएर-ह्युजेस हर्बर्ट याच्याविरुद्ध विजयाची संधी दवडली, तर रामकुमार रामनाथनने अग्रमानांकित मरिन चिलीच याच्याविरुद्ध दाखविलेली जिगर सकारात्मक ठरली. गतविजेत्या रॉबर्टो बॉटीस्टा आगुटला...
सप्टेंबर 19, 2017
अस्तना (कझाकस्तान) - डेव्हिस करंडक स्पर्धेतील गतविजेते अर्जेंटिनाला १५ वर्षांनी जागतिक गटातून बाहेर पडावे लागले आहे. त्यांना कझाकस्तानकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला.  परतीच्या एकेरीच्या लढतीत मिखाईल कुकुशकिन याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याचा पराभव करून...
सप्टेंबर 19, 2017
एडमाँटन (कॅनडा) - भारतीय टेनिस संघाला डेव्हिस करंडक लढतीत आशिया-ओशियाना गट १ मधून बाहेर पडण्यात पुन्हा अपयश आले. कॅनडाविरुद्धच्या लढतीत ३-२ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ जागतिक गटापासून दूरच राहिला. परतीच्या दोन्ही एकेरीच्या लढती भारताला जिंकण्यात अपयश आले....