एकूण 25585 परिणाम
जानेवारी 05, 2017
पुणे - सकाळ विद्या आणि एसआरएम विद्यापीठ, चेन्नई तर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 7) कोथरूड येथील पुण्याई सभागृहात हे चर्चासत्र होईल. इंजिनिअर होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा कमालीची महत्त्वाची ठरणार आहे...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे काळा पैसा व भ्रष्टाचार संपेल असे भ्रामक स्वप्न सामान्य लोकांना दाखवण्याची खेळी नरेंद्र मोदी सरकार खेळत आहे, असा आरोप भारिप-रिपब्लिकन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. नोटाबंदीच्या चुकीच्या अंमलबजावणीच्या विरोधात आपला पक्ष उद्यापासून (ता. 5...
जानेवारी 04, 2017
महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पुणे शहर भाजपमध्ये अंतर्गत खदखद सुरु आहे. आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची खात्री असतानाच पक्षांतर्गत वादामुळे पक्षाच्या यशाला काही प्रमाणात गालबोट लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकीकडे आपणच सर्वेसर्वा असल्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे...
जानेवारी 04, 2017
नाशिक - नांदगाव औरगाबाद मार्गावरील तळवाडे घाटातील इनोव्हा गाडीचा अपघात होउन, दोघे ठार झाले. रात्री झालेल्या अपघातातील सर्व जण नाशिकचे आहेत. मृत दोघात नाशिकचे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ऍड नीलेश कुलकर्णी तसेच डॉ. संदीप येवलेकर यांचा मृत्यू समावेश आहे. नांदगाव औरंगाबाद मार्गावर रात्री साडे...
जानेवारी 04, 2017
मुंबई - राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, यंदाचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्‍याम जोशी...
जानेवारी 04, 2017
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसरा संशयित वीरेंद्र तावडेला सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करण्याचे आदेश आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपास यंत्रणेला दिले. या प्रकरणातील तीन व चार क्रमांकाचे संशयित विनय पवार आणि सारंग अकोळकरच्या शोधासाठी प्राप्त अधिकाराचा...
जानेवारी 04, 2017
पुणे  - शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजूर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे; तर विकास आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे नगरविकास खात्यातील प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी "सकाळ'ला सांगितले. त्यामुळे...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
जानेवारी 04, 2017
पुणे - "मुठा नदीच्या पात्रातून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाने तूर्तास स्थगिती दिली असली तरीही, हा मार्ग नदीच्या पूररेषेतून जात असल्यामुळे नदीच्या वहनक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोसाठी पर्यायी रस्ता शोधावा,' असे महापालिकेच्या तांत्रिक समितीने...
जानेवारी 04, 2017
कोल्हापूर - शहरातील खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारावर निश्‍चित करून काही रस्त्यांवर खडी विस्कटल्याचा बनावही आता शहरवासीयांसमोर येत आहे. शहरातील अनेक वर्दळीचे रस्ते आजही खड्डयातच आहेत. सर्वाधिक वाहतूक असणारा टेंबेरोड, राजारामपुरी बसरोड, बागल चौक जयराज पेट्रोल पंप ते शाहू मिल आणि जनता बझार ते...
जानेवारी 04, 2017
पुणे - लेखक-कलावंताचे पुतळे आता पुन्हा उभारू नका, म्हणजे पुन्हा कोणाची बदनामी होणार नाही. लेखक-कलावंत हे पुतळे उभारल्याने जिवंत राहत नाहीत. ते आपल्या कलाकृतींतूनच अजरामर होत असतात, अशा भावना व्यक्त करून नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचा लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन मंगळवारी निषेध...
जानेवारी 04, 2017
लोणंद - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव हे त्यांच्या महान कार्यामुळे जगाच्या नकाशावर आले आहे. आजवर नायगावचा विविध अंगाने विकास साधला गेला. यापुढेही या पवित्र भूमीचा विकास सुरू ठेवू. विशेष विकास आराखडा आखून या गावाचा परिपूर्ण विकास साधू. नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत कृषी व पर्यटन...
जानेवारी 04, 2017
उस्मानाबाद - नोटाबंदीनंतर गेल्या पावणेदोन महिन्यांपासून पैसे काढण्यासाठी बॅंक आणि एटीएमसमोरील रांगा अद्यापही कायम आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतीमाल असूनही विक्रीनंतर एकरकमी पैसा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  डिसेंबरमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी...
जानेवारी 04, 2017
पुणे - "सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जयघोष...त्यांच्या कार्यकर्तृत्वावर सादर केले जाणारे पोवाडे, गीते...फुले यांच्या अखंडाचे सामूहिक गायन  आणि व्याख्यानांद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. विशेषतः शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या सावित्रीच्या...
जानेवारी 04, 2017
यादव घराण्यातील सत्तासंघर्षामुळे समाजवादी पक्षात फूट पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. घराण्यांतर्गत का असेना, सत्तेवरील पकड ढिली होत असेल तर प्रस्थापित नेता किती कासावीस होतो, हे मुलायमसिंहांच्या वर्तनावरून दिसते आहे. उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात सुरू झालेल्या ‘दंगली’ने आता...
जानेवारी 04, 2017
सावंतवाडी - माणसाला यशस्वी होण्यासाठी महत्त्वाकांक्षा बाळगण्यास हरकत नाही. भविष्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनायची माझी इच्छा आहे, अशी भावना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केली. नुसते मेसेज पाठविण्यासाठी मोबाइलचा उपयोग नको तर तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण...
जानेवारी 04, 2017
उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. तीन) आदर्श महाविद्यालयात आमदार बसवराज पाटील यांनी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमरगा-लोहारा तालुक्‍यांतून जवळपास अडीशे इच्छुक उमेदवार, दोन हजार कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  उमरगा-लोहारा तालुक्‍...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...
जानेवारी 04, 2017
चिपळूण - कोकणात पावसाचे मोठे प्रमाण असताना उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवते. विविध पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी अडवून त्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून नद्यांबरोबरच कोकणच्या पुनरुज्जीवनासाठी लोकसहभागातून विविध प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे मत जलपुरुष...