एकूण 26 परिणाम
जून 11, 2019
हेल्थ वर्क आपल्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या उत्कट शक्तींशी संबंधित योगमार्ग अनुसरल्यास कमी अडथळे येतात. त्यामुळे ठेचाही कमी लागतात. अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनी ज्ञानयोग प्रमुख म्हणून धरावा. भावनाप्रधान व्यक्तींनी भक्तिमार्ग चोखाळावा. कर्ममार्ग सर्वांसाठीच आहे. हठयोगाचा उपयोगदेखील सर्वांनी करावा,...
जून 10, 2019
हेल्थ वर्क काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मनाचे ‘विकार’ होत. आपण या विकारांनी लिप्त आहोत हे समजणे ही मनःस्वास्थ्य नियोजनाची पहिली पायरी. या भावना मग विचारांना जन्म देतात. विचार कृतीला जन्म देतात आणि मग शरीर आणि अंतःकरणाचे स्वास्थ्य बिघडायला सुरवात होते. वरील भावनांचे अंतःकरण ग्रस्त आहे असे समजले...
जून 05, 2019
हेल्थ वर्क शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन...
जून 04, 2019
आरोग्यमंत्र शरीरस्वास्थ्यनियोजन हे पहिले समजा, कारण तुम्हाला या जगात शरीराच्याच आधारावर सर्व प्रकारचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला जशा प्रकारचे शरीर मिळाले आहे, ते आपल्या डोळ्यादेखत वृद्ध होत जात असतानादेखील अधिकाधिक कार्यक्षम ठेवायचे आहे. त्यामुळे आपले शरीर आहे तसे समजून घ्या. त्याच्या आकारमानाविषयी...
मे 29, 2019
हेल्थ वर्क सध्याचे युग नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे आहे. तुम्ही नीट व्यवस्थापन कराल, त्या गोष्टी वाढत जातील. पैशांचे नीट व्यवस्थापन करा ते वाढत जातील. व्यवसायाचे नीट व्यवस्थापन करा, तो वाढेल. त्याऐवजी एखाद्या विकाराचे व्यवस्थापन करीत बसाल, तर तो वाढत जाईल. म्हणजे मधुमेह झाला तेव्हा एकच गोळी खात होतो...
मे 28, 2019
हेल्थ वर्क आध्यात्मिक आरोग्याविषयी विचित्र समजुती आढळतात. समाजात अनेक लोक आध्यात्मिक प्रवचने देत असतात. प्रवचनाला जाऊन आध्यात्मिक आरोग्य मिळत असते, तर गोष्ट वेगळी होती. शरीर आणि मनाचे अद्वैत समजल्याशिवाय कामात कितीही सत्यवचने ओतली तरी काहीही फरक पडत नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे जोपर्यंत कळत नाही...
मे 27, 2019
हेल्थ वर्क मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची सामाजिक स्थिती...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 14, 2019
हेल्थ वर्क उन्हाळ्याच्या सुटीचा उपयोग कसा करावा, या विषयी मुलांचे मत घेणे अतिशय आवश्‍यक आहे. विशेषतः १० ते १२ या वयोगटातील मुलांना सुटीविषयी विचारणे आवश्‍यक आहे. हे वाचल्यावर ‘मुलांना काय विचारायचे त्यात? त्यांना काय कळते?’ असा मौलिक विचार कुणाच्याही मनात येणे शक्‍य आहे. मुलांना खूपच कळते आणि...
मे 13, 2019
आरोग्यमंत्र सामान्यपणे मुलांना सुटी लागताच आई-वडिलांच्या पोटात गोळा उठतो. आता आपली मुले कशी सांभाळायची आणि त्यांना कसे गुंतवून ठेवायचे, ही चिंता त्यांना त्रस्त करू लागते. ‘शाळा असते तेच बरे असते. निदान अडकलेली असतात,’ अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. त्यामुळे पालकांसाठी काही विशेष सूचना आवश्‍यक आहेत....
मे 07, 2019
हेल्थ वर्क  सामान्यपणे निसर्गतः उपलब्ध असलेले सर्व पदार्थ त्याच अवस्थेत खाल्ल्यास आरोग्यदायक असतात. उदाहरणार्थ मोड आलेले गहू, गव्हाची पोळी, बिस्कीट, नान आणि लोणीयुक्त नान हे सर्व पदार्थ गव्हापासून केले असले; तरी त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. लोणीयुक्त नान खाणे आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले नाही...
मे 01, 2019
हेल्थ वर्क योगासने केल्याने मधुमेह बरा होतो, हा वेडगळ समज आहे. अमुक एखादे आसन केल्याने स्वादुपिंडाचे कार्य सुरळीत चालते, असे म्हणणाऱ्या योगाचार्यांना स्वादुपिंड कोठे आहे, हेदेखील माहिती नसते. त्यामुळेच असे छातीठोकपणे सांगणाऱ्याला व्यायामातील फारशी माहिती नाही, हे आपण लगेच ओळखावे. मात्र, योगासने...
एप्रिल 30, 2019
हेल्थ वर्क स्नायूंची ताकद वाढविण्याचा वजन उचलण्यासारखा व्यायाम केला जातो. आपल्या शरीरात इन्शुलिनसारखा एखादा पदार्थ स्नायूंमधून स्रवत असावा, असा संशोधकांचा अंदाज आहे. साहजिकच आपल्या शरीरात स्नायूंचे प्रमाण आणि स्नायू वापरण्याची क्षमता अधिक असल्यास हा इन्शुलिनसारखा पदार्थही अधिक प्रमाणात स्रवतो. या...
एप्रिल 24, 2019
हेल्थ वर्क अॅसिडिटी किंवा घशात, छातीत जळजळणे, पोटात दुखणे अशा विविध गोष्टी एकत्र करून आम्लपित्ताचा विकार असे नाव रुग्णांनीच दिलेले असते. त्याबाबत काही नवीन गोष्टी उजेडात आल्या आहेत. मनावर ताण असलेला माणूस आवश्‍यकतेपेक्षा खूपच जास्त वेळा तोंडात जमणारी किंवा न जमणारी लाळ गिळण्याची क्रिया करत राहतो....
एप्रिल 23, 2019
हेल्थ वर्क ‘सुसंस्कृत मानव म्हणजे काय,’ असा प्रश्‍न विचारला असता, ‘शरीराची हालचाल कमीत कमी करून केवळ मनाच्या हालचालीने अन्न मिळवितो तो सुसंस्कृत,’ अशी व्याख्या सहज करता येईल. संस्कृती जसजशी प्रगत होते; तितका शरीरावर घाव जोरात बसतो. शारीरिक कष्ट म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांचे काम अशी समजूत होते....
एप्रिल 22, 2019
हेल्थ वर्क लठ्ठ स्त्रियांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त त्रास होतो, पण त्या आधी ही लठ्ठपणाची सुरवात कुठून होते ते पाहूया. ‘प्राप्तेतु षोडषेवर्षे गर्दभ्यपि अप्सरा भवेत्‌!’ अशा सुंदर वयापासून आपण सुरवात करूयात. या वयात खरोखरीच सर्व मुली आटोपशीर शरीराच्या असतात. सुदृढ असतात असे मुळीच नाही....
एप्रिल 17, 2019
हेल्थ वर्क सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य...
एप्रिल 16, 2019
हेल्थ वर्क एखाद्या आडव्या बांबूला लोंबकळून आपल्याला चार-पाच वेळा शरीर उचलता येते का? तीन-चार डिप्स काढता येतात का? गाडी बंद पडली तर ढकलता येते का? पाचसहा किलोचे डम्बेल सरळ डोक्‍यावर किती वेळा उचलता येते? आपली ताकद किती कमी झाली आहे, हे त्यावरून कळेल. तुमचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, हे देखील पाहता...
एप्रिल 15, 2019
हेल्थ वर्कव्यायाम कसा करावा? आपल्याला अचानक उपरती होते, ‘आपलं वजन बेसुमार वाढले आहे, आणि काहीतरी करायला हवे!’ किंवा ‘एकंदरीतच तब्येत बरोबर वाटत नाही. काहीतरी व्यायाम करायला हवा!’ आता ‘काहीतरी’ करण्याआधी आपले शरीर कुठल्या पातळीपर्यंत पोचले आहे, याची कुणीच दखल घेत नाही. मग काहीतरी सल्ले मिळतात. कुणी...
एप्रिल 10, 2019
हेल्थ वर्क आपल्याला आनंद देणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी घडतात, त्या घडतात पण घडवता येत नाहीत. आपल्याला भूक लागते, पोट साफ होते, आपण प्रेमात पडतो या सर्व गोष्टी होतात, पण करता येत नाहीत. त्याचप्रमाणे झोप लागते पण ‘लागवता’ येत नाही. आपल्याला झोप यावी यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. खोलीत अंधार करू शकतो...