एकूण 656 परिणाम
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-...
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 05, 2019
ठाणे - मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रांमुळे फेट्यांच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होण्याची शक्‍यता या व्यवसायातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. पारंपरिक वेशभूषेबरोबरच डोक्‍यावर भगवा फेटा परिधान करून, पाठीवर शेला मिरवत तरुणाई मोठ्या संख्येने...
एप्रिल 03, 2019
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील पत्रिपुलावर आज बुधवारी ता 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटाला एक अवजड वाहन बंद पडल्याने कल्याण शिळफाटा रोड, कल्याण वालधुनी पूल, स्टेशन परिसर मध्ये वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने कल्याण डोंबिवली कराना...
मार्च 27, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली करानो कुठलेही वाहन चालविताना नियम तोडताना जरा विचार करा. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरला नाही तरी त्याची नोंदणी वाहतूक पोलिसांकडे राहणार असून, आता कागदी पावती देणारे वाहतूक पोलिस ई चलन तुमच्या हाती देणार आहे. मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिस विभाग ही...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती...
मार्च 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता.14) पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महाआघाडीत सामील झाली असती तर त्यांना या दोनपैकी एक जागा...
मार्च 13, 2019
कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती...
मार्च 09, 2019
कल्याण - मुंबई प्रमाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि कल्याण डोंबिवली कराकडून सर्वात जास्त मालमत्ता कर. असे का? आम्हाला ही सवलत द्या नाही तर आगामी निवडणूकीमध्ये नागरीक उत्तर...
फेब्रुवारी 28, 2019
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.  कल्याण-डोंबिवली...
फेब्रुवारी 24, 2019
कल्याण डोंबिवली : पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी या आठवड्यात सरकारने पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी'' ,अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
फेब्रुवारी 21, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस रस्त्यावर प्रवाशांनी भरून जात असताना उपन्न कमी कसे? यावर केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी विशेष पथकामार्फत बसेस तपासणी सुरू केली. त्यापासून वाचण्यासाठी एका वाहकाने पँटमधील चैनजवळ एक विशेष खिसा बनवून पैसे लपवित असल्याचे...
फेब्रुवारी 21, 2019
कल्याण - रिक्षा भाडे दरवाढी बाबत प्रस्ताव शासन दरबारी असून त्याचा निर्णय होईपर्यंत या पूर्वी शासनाने मंजूर करून दिलेल्या रिक्षा भाडे दरवाढीनुसार रिक्षा चालकांनी प्रवाश्याकडून रिक्षा भाडे घ्यावे, मंजूर रिक्षा भाडे पेक्षा जास्त भाडे घेणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती कल्याण आरटीओ...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी समितीच्या...
फेब्रुवारी 20, 2019
ठाणे : ठाणे-मुंबईसह परराज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस फार्मासिष्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात पुन्हा काही औषध दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनी या टोळीचा छडा लावून सहा जणांना अटक केली होती. या बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटमध्ये आता आणखी सहा आरोपींना...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची...
फेब्रुवारी 15, 2019
‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात...
फेब्रुवारी 10, 2019
ठाणे : घरातली कामे लगबगीने आवरून धावतपळत स्टेशन गाठा. स्टेशनवर गर्दीचा लोंढा पाहून अर्धे अवसान तेथेच गळते. लोंबकळत कशीबशी लोकल पकडा. त्यातही अनेकदा लोकलच्या उशिरामुळे लेटमार्क. त्यामुळे कापला जाणारा पगार आणि चार शब्द ऐकावे लागणार हे वेगळेच... यापेक्षा राहणाऱ्या ठिकाणीच नोकरी करून चार पैसे कमी का...
फेब्रुवारी 06, 2019
डोंबिवली : सर्वात गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. धनश्री गोडवे आणि भावेश नकाते या दोघा डोंबिवलीकरांचा लोकलमधील गर्दीने यापूर्वी बळी घेतला होता. आता नवीन वर्षात ही हे मृत्यूचे सत्र सुरु असून, आज (बुधवार) पुन्हा लोकलमधील गर्दीमुळे आणखी एका...