एकूण 373 परिणाम
मार्च 22, 2019
मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची...
मार्च 20, 2019
जय गंगा मय्याकी! पुन्हा एकवार हा नश्‍वर देह पुनित जाहला आहे. पुन्हा एकवार पूर्वसंचित फळां आले आहे! मन कसे तृप्त जाहले आहे. तसे पाहू गेल्यास मी एक गुह्य नावाचा साधासुधा होडीवाला! परंतु तीन दिवसांपूर्वी नशीब फळफळले. देवलोकीचीच जणू अवतारमूर्त प्रकटली. आमच्या सर्वांच्या आवडत्या नेत्या प्रियंकादीदी...
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 14, 2019
आमच्या पार्टीचा सुजय असो! आदरणीय नमोजींच्या मार्गदर्शनाखाली औंदाच्या निवडणुकीत आमची पार्टी शतप्रतिशत सुजयी ठरेल, ह्याबद्दल आमच्या मनात संदेह उरला नाही. आपणही ठेवू नये, ही विनंती! कां की सुजयी सु-उमेदवारांनाच यंदाच्या सु-इलेक्‍शनमध्ये सुसंधी देण्याचा सुनिर्णय आमच्या सुपार्टीने घेतला आहे. त्यामुळे...
मार्च 13, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...
मार्च 09, 2019
बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (कामात व्यग्र) हं...हं! बेटा : (निरुत्साहाने) ‘हंहं’ काय? आयॅम बॅक हे माझं पोलिटिकल स्टेटमेंट आहे!! मम्मामॅडम  : (नव्या उमेदीने) आता स्टेटमेंटची नाही, ॲक्‍शनची गरज आहे!! साडेचार वर्षं ज्याची वाट पाहत होते, ते इलेक्‍शन...
मार्च 08, 2019
ब्रेड अँड रोझेस, बाई ब्रेड अँड रोझेस! घोषणा ऐकून पोरी अजून किती उत्साहित होतेस? शंभर वर्ष होऊन गेली अजूनही तुझे तेच! तेच कष्ट, तेच दु:ख तश्‍शीच लागते ठेच! तुझ्या आधीच्या काही जणी होत्या घास ‘‘नुसता घास नको, शेठ हवा गुलाबाचा सुवास!’’ पोटासाठी घास हवा, गंध! अन्यायाच्या कोठडीत नशीब आहे बंद! ब्रेड अँड...
मार्च 07, 2019
नमोजीभाई : (चिंतातूर अवस्थेत) जे श्री क्रष्ण! हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे!! मोटाभाई : (खांदे उडवत) शुं थयुं? नमोजीभाई : (आवाज खाली आणत) केम छो मोटाभाई? सब ठीक तो छे? मोटाभाई : बद्धा ठीक तो छे! इलेक्‍सननी तयारी मां छुं!! नमोजीभाई : (हताश होत्साते) इलेक्‍सन सोडून दुसरा काय गमते नाय के तुम्हाला...
मार्च 06, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी। झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!! ........................... ।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे....
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
मार्च 02, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान वेळ : आरामशीर! प्रसंग : मजेशीर! पात्रे : नेहमीचीच...राजाधिराजी उधोजीराजे आणि त्यांचा कडवा फर्जंद मिलिंदोजी! ........................... महालाच्या अंत:पुरात राजाधिराज उधोजीराजे आरामात बसले आहेत. त्यांना सगळ्याचाच कंटाळा आला आहे. कंटाळून ते मोटार ड्रायव्हिंगची...
मार्च 01, 2019
आमचे आध्यात्मिक तारणहार इम्रानखांसाहेब औलिया ह्यांची कदमबोसी करून, मत्था टेकूनच आम्ही येथे आलो आहो! नुकतीच आमची औलियासाहेबांशी मुलाकात झाली. तो एक दैवी अनुभव होता, येवढेच आम्ही तूर्त म्हणू. बाबा, औलिया आदी लोगांना गाठून त्यांचा अनुग्रह मिळवण्याचा आम्हाला जबर्दस्त शौक आहे. तसे आम्ही अनेक बाबालोग...
फेब्रुवारी 28, 2019
बेहोषीच्या जलशांना इथे चढे रोज रंग जो तो रमे आपुल्याच मौजमजेमध्ये दंग अशा वेळी काळीज गा माझे फाटुनिया जाय कुठे आणि कशी आता असेल ती वेडी माय? शाळेच्या त्या प्रांगणात अधीमधी दिसते ती उभी राही गोंधळून भांबावली सरसुती काय तिला बोलायाचे, सांगायाचे आहे तिला पुन्हा पुन्हा विचारिते ‘पोरा, तू गा कितवीला?’...
फेब्रुवारी 23, 2019
एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता...
फेब्रुवारी 22, 2019
ताई, तुम्हाला कुठली हवी? मोदी साडी की प्रियंका साडी? मार्केटमध्ये नवीन आहे ताई, पुन्हा येणार नाय अशी घडी! साडी दाखवू? बरं बरं! ‘‘अरे गुलाब, ते जुनं बंडल उघड बराच माल उरलाय, त्यातली एखादी चांगली घडी उलगड’’ ताई, ही बघा मोदी साडी आहे की नाही भारी? झगझगीत पॅटर्न, सुरतची प्रिंट रंगसंगती किती न्यारी?...
फेब्रुवारी 21, 2019
वझीर-ए-आजम-ए-हिंद जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसात आपली मुलाकात झाली नाही. बातचीत का रास्ता पुरा बंद झाल्याचे ध्यानात आल्यावर आखरी उपाय म्हणून मी ‘रेडिओ पाकिस्तान’वरून मेरी ‘दिल की बात’ आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्यासारखा ‘दिल की बात’ हा रेडिओ टॉक करण्याचे मी ठरवले होते,...
फेब्रुवारी 20, 2019
आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती आजचा वार : सुवर्णवार. आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..! ................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सकाळी उठलो तोच मुळी...
फेब्रुवारी 19, 2019
प्रि य सौभाग्यवती कमळाबाई ईस अनेकाअनेक इष्ट नमस्कार. माझे पत्र आल्याने तुजला आश्‍चर्य वाटले असेल. स्वत:स अनेकानेक चिमटे काढून पाहिले असशील! आम्हीही (पत्र लिहीत असताना) स्वत:स इतके चिमटे काढून पाहिले आहेत की हे पत्र लिहून पुरे होईतोवर आमच्या सर्वांगावर लालेलाल वळांची नक्षी उमटलेली असेल, असे वाटते....
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 14, 2019
निरंगी अंधारातील वाटचालीतच कुठल्यातरी अनवट पावलाशी तुला विचारला होता अनंगाचा अन्वयार्थ, तेव्हा सारी लकब पणाला लावून तू फक्‍त हसली होतीस आणि दाखवले होतेस बोट, अलांछन चंद्रबिंबाकडे बिनदिक्‍कत. अनाकार तिमिरघनासारखी उलगडत, मिटत निघून गेलीस, अदृश्‍य झालीस वळणावरती मी मात्र एकटा मोजतो आहे मागे पडणारे...