एकूण 1005 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : ‘रात्रीस खेळ चाले’...नंतरची. प्रसंग : भयंकर उत्सुकतेचा. पात्रे : महाराष्ट्राचे तारणहार मा. उधोजीमहाराज           आणि सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई महाराज. ............................ उधोजीराजे : (बंद दाराकडे पाहून खाकरत)  अह...अह...खक...खक! कमळाबाई : (बंद...
सप्टेंबर 21, 2019
दुपारची जेवणाची वेळ होती. (जेवण नव्हते तरी) मैदान फुलून गेले होते. माणसे खुर्च्यांवर आणि जमिनीवर उपासपोटी बसून होती. भव्य मांडवात चर्चा होती ‘कधी येणार? कधी येणार?’ थोड्या वेळात आभाळात हेलिकॉप्टर घरघरू लागले. ‘आले आले!’ अशी हाकाटी झाली. हेलिकॉप्टर लांब कुठंतरी अदृश्‍य झाले. याच हेलिकॉप्टरात...
सप्टेंबर 20, 2019
सर्व पक्ष सहकारी- सांगावयास अत्यंत आनंद होतो, की आपल्या अजिंक्‍य, अजेय अशा पक्षाचे भविष्य उज्ज्वल असून देशभर मंदीचे सावट असताना आपला पक्ष मात्र तेजीत आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या पक्षात प्रचंड प्रमाणात ‘इन कमिंग’ झाले. अनेकांनी आपला मोबाइल नंबर तोच ठेवून जुन्या सर्व्हिस प्रोवायडरला ‘बाय बाय’...
सप्टेंबर 19, 2019
नेमके सांगावयाचे तर भाद्रपदातली ती येक भिजरी सकाळ होती. ढगांनी आभाळात उगीच आर्डाओरड चालवली होती. पण गरजेल तो बरसेल काय? पर्जन्याविना अवघे शिवाजी पार्काड निम्मेशिम्मे कोरडेच होते. पार्काडाच्या मधुमध उभा उत्तुंग, बेलाग कृष्णकुंजगडाचा कडा! मान वर करोन पाहो जाल, तर मागल्या मागे तुटोन पडावयाची!! पण...
सप्टेंबर 18, 2019
स्थळ : मुंबईलगतचे निबीड आरेवन. वेळ : अरण्यात घड्याळ चालत नाही! प्रसंग : मचाणावरचा.पात्रे : निसर्गतज्ज्ञ व विख्यात निसर्ग छायाचित्रकार मि. यूडी थॅकरे व त्यांचे पुत्रवत शिष्य किंवा शिष्यवत पुत्र मास्टर ॲडी! यूडी : (डोळ्याला दुर्बीण लावून कुजबुजत) आह..! ओह!! एहे!! अयाया..!! ॲडी : (उत्सुकतेनं कुजबुजत)...
सप्टेंबर 17, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर भाद्रपद कृ. तृतीया. आजचा वार : हॅप्पीबर्थडे! आजचा सुविचार : तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सिद्धमंत्राचा जप लिहून लक्ष केव्हाच पुरा झाला. आजच्या पवित्र दिनी जपाच्या वह्या समुद्रार्पण करावयाची वेळ आली आहे. याच...
सप्टेंबर 16, 2019
एका गहन प्रश्‍नाला हात घालण्यापूर्वी (आमची) थोडीशी पार्श्‍वभूमी दाखवणे (पक्षी : सांगणे) गरजेचे आहे. येथे आम्ही भाषिक प्रश्‍नाला हात घालतो आहो. जो अत्यंत ज्वलंत (पक्षी : जाळपोळप्रोत्साहक) आहे. ॲक्‍चुअली, आम्हाला इतक्‍या भाषा येतात, की आमची मातृभाषा नेमकी कुठली हेच आम्हाला समजेनासे झाले आहे. आम्ही...
सप्टेंबर 14, 2019
स्थळ - मातोश्री रिसॉर्ट, वांद्रेवन. (बफर झोन) वेळ - रात्रीची. प्रसंग : रातकिड्यांची किरकिर. पात्रे - नेहमीचीच! चि. विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणात घुसमटल्यागत) नोप!  विक्रमादित्य : (बॅटरीचा झोत टाकत) झोपलात इतक्‍यात? उधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावरून...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : चारशे मीटर शर्यतीतील ज्युनिअर विश्‍वविजेती आणि सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेली हिमा दास येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा (कतार) येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीचे दुखणे चिघळले असल्याने ती भाग घेऊ शकणार नाही. ...
सप्टेंबर 12, 2019
ही एक अत्यंत जीवनावश्‍यक वस्तू असून ती हरेकाने खरीदलीच पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण माणसे मोटारी खरेदी करतात, त्यायोगे देशाचे अर्थकारण चालते. मोटार आली की रस्ते आले. पाठोपाठ टोलनाका आला. विविध प्रकारचे कर आले. ट्राफिक पोलिस आला. पीयुसीवाला, पंपवाला, आणि पंक्‍चरवाला अशी एक मोठीच व्यवस्था एका...
सप्टेंबर 11, 2019
सर्व मंत्रिमंडळ सहकारी, महाराष्ट्रातील ऐतिहासिक (क्‍लास २) गड-किल्ले भाड्याने देण्याची कल्पना सध्या रद्द करण्यात आली असून, मंत्र्यांचे बंगले भाड्याने देण्याची योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. अधिकृत घोषणा यथावकाश होईल. एकप्रकारे हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला स्टार्ट अप आहे. गड-किल्ल्यांवरील...
सप्टेंबर 10, 2019
जीवश्‍च कंठश्‍च प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. राहवेना, म्हणून पत्र लिहीत आहे. कारण विचारा? कारण, माझी किनई ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ अशी अवस्था झाली आहे. समोर असता, तर प्रेमाने किमान एक तरी गालगुच्चा घेतला असता.  परवा मेट्रो शुभारंभाच्या कार्यक्रमात थेट मा. नमोजींच्या...
सप्टेंबर 07, 2019
चंदुदादा कोल्हापूरकर : (ऐसपैसपणे) या, या! तुमचीच वाट पाहात होतो! सुभाषाजी देसाई : (सर्द होत) अहो, आमच्याच घरात आमचं स्वागत कसं करता? गिरीशभाऊ महाजन : (वाद न वाढवण्याच्या प्रयत्नात) तुमचं आणि आमचं काही वेगळं आहे का?.. शिवाय आमचे मोदीजी म्हणतात वसुधैव कुटुंबकम! म्हंजे अवघं विश्‍व हे एकच कुटुंब आहे!!...
सप्टेंबर 06, 2019
शालेय जीवनात अनेक अडथळे येऊनही आमची गुरूवरील श्रद्धा कधी तसूभरदेखील ढळली नाही. दर गुरुपौर्णिमेस व शिक्षकदिनांस आम्ही आमच्या गुरूचे चरण धरून आशीर्वाद घेतोच घेतो. आशीर्वाद घेतल्याशिवाय (चरणकमळ) सोडतच नाही मुळी. अखेर नाइलाज होऊन गुरुजन आम्हाला आशीर्वाद देतात. त्याच आशीर्वादाच्या पुंजीवर आमचा गुजारा...
सप्टेंबर 05, 2019
आमचें येथील सुप्रसिद्ध श्रीगणेश हे नवसास पावणारे दैवत म्हणून सातासमुद्रापार ख्यात पावलेले आहे. या पेटीतील पत्रे वांचून श्रीगणेश पुढील कार्यवाही करून संबंधित भक्‍ताची इच्छा, स्वप्न, आकांक्षा आदी गोष्टींची पूर्तता करतात असे म्हटले जाते. (त्याची प्रचीती खुद्द प्रस्तुत लेखकासदेखील आलेली आहे.) सदरील...
सप्टेंबर 04, 2019
प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत मुजरा. गणपती बाप्पा मोरया! आमचे (मुंबईतील) घरी श्रींचे आगमन झाले असून मन कसे प्रसन्न झाले आहे. या पत्रासोबत तीन पेढे (खुलासा : साइज मोठा आहे. काळजी नसावी.) पाठवत असून कृपया स्वीकार व्हावा. आमच्या यात्रेच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतच असतील. परवा सोलापुरात...
सप्टेंबर 03, 2019
(साक्षात महामॅडम चिंतामग्न अवस्थेत खुर्चीत बसून आहेत. अस्वस्थपणे अधूनमधून सुस्कारा सोडत आहेत. बाजूच्या खुर्चीत नवभारताचे आशास्थान ऊर्फ चि. बेटा बसलेले आहेत, आणि त्यांच्या पुढ्यात थोर अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनजी...तिघांपुढे गहन प्रश्‍न पडला आहे,- या देशाचे कसे होणार?)  बेटा : (हात उडवून) मम्मा, डोण्ट...
सप्टेंबर 02, 2019
शेकडो कॅमेऱ्यांच्या चकचकाटात ध्वनियंत्रणेतून विस्फोटणाऱ्या ढोल-ताशांच्या दणदणाटात चकाचौंध उजळलेल्या मांडवात उसळलेल्या उत्फुल्ल गर्दीत दोन्ही हात उभारून त्याने केला (कसाबसा) नमस्कार. अंगावर कोसळणाऱ्या अखंड भक्‍तीचा लोंढा जेमतेम रोखत तो ओरडला : गणपती बाप्पा मोऽऽरया... त्याने मारलेली आर्त हांक विरून...
ऑगस्ट 31, 2019
‘माणसाने कसं फिट्ट असलं पाहिजे!’’ दंडातली बेटकुळी दाखवून ते म्हणाले. आम्ही मान्य केले. नाही म्हटले तरी बेटकुळी चांगली मोठ्या साइजची होती.  ‘‘तब्बेत सलामत तो पगडी पचास...काय?’’ दुसऱ्या दंडातली बेटकुळी हलवून ते म्हणाले. आम्ही तेदेखील ताबडतोब मान्य केले. वास्तविक तुमची म्हण चुकतेय, हे आम्हाला सांगायचे...
ऑगस्ट 30, 2019
सर्व जय्यत तयारीनिशी बसलो आहो! मोबाइल फोनची ग्यालरी साफसूफ करुन ठेविली असून मेमरी कार्डदेखील काढून सदऱ्यावर घासून पुन्हा लावून ठेविले आहे. राहत्या निवासस्थानातील बरीचशी अडगळ कमी करून येणाऱ्या पुष्पगुच्छांसाठी नव्याने जागा करून ठेविली आहे. मिठाईची बॉक्‍से कुठे ठेवावीत, त्याचीही योजना झाली असून...