एकूण 879 परिणाम
ऑक्टोबर 28, 2016
पेंग्विन हे एक सत्य आहे,  बाकी सारे आहे मिथ्या.  तसे पाहू गेल्यास  डार्विनसाहेबांच्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज'  ह्या (बोगस) ग्रंथानुसार, पेंग्विन  हा एक निव्वळ निष्पक्ष पक्षी आहे.  एरवी कालसागराच्या खडकांवर  आपली जमात वाढवणारी,  कलकलाटाने किनारे भरून टाकणारी,  काळ्याशार लाटांध खडकांवर  शिटून शिटून...
ऑक्टोबर 27, 2016
मुश्‍किलातली मुश्‍किल समस्याही लीलया सोडविण्याच्या कामात राजमान्य राजेश्री चुलतराज ह्यांचा हात कोणीही धरणे केवळ अशक्‍य आहे. देशासमोरील असंख्य अक्राळविक्राळ समस्या त्यांनी बसल्या बैठकीला यूं सोडवून दिल्या आहेत. राजियांचे मोठेपण हे की कधीही त्याबद्दल चकार शब्द मुखातून निघत नाही. ‘कसे काय बोआ तुम्हाला...
ऑक्टोबर 25, 2016
दादू : (फोनमध्ये कुजबुजत्या आवाजात) हलोऽऽऽ...कोण उलैतां मरे?  सदू : (अर्धवट झोपेत अनवधानाने) हांव सदूबाब...आपलं ते हे...मी सदू!  दादू : (खुशीत) द्येव बरे करो तुजें! हांव दादूबाब रेऽऽ...  सदू : (प्रसिद्ध खर्जात) आता कोकणीत बोलायला लागलात का आपण...आनंद आहे!  दादू : (टिपिकल गोंयकार स्टाइलीत) ऍक......
ऑक्टोबर 21, 2016
'पप्याजीऽऽऽ...‘‘ कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्ल्यातील निजघरातून आलेल्या राजियांच्या जबर्दस्त हाकेने दाराबाहेर स्टुलावर बसून डुलक्‍या घेणारा पप्याजी फर्जंद साफ कोलमडला. उठून देहाचा पाठीमागचा परिसर चोळत, झटकत तो राजियांच्या शयनगृहाकडे धावला. धावता धावता मांडचोळण्यात पाय अडकून धडपडला. धडपडून त्याने नजीकचा...
ऑक्टोबर 08, 2016
बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा आयॅम बॅक...फायनली!!  मम्मामॅडम : (मायेने) बरं झालं...खूप हिंडलास त्या यूपीत!  बेटा : (कॉन्फिडण्टली...) तिथे विरोधकांची खाट टाकून आलो! हाहाहा!! ‘एक खाट, एक व्होट‘ अशी स्लोगनच होती आमची!! आज यूपी के घर घर में मेरे नाम की खाट होगी!!  मम्मामॅडम...
सप्टेंबर 30, 2016
(एक पत्रापत्री) उपऱ्यांचे कर्दनकाळ महाराष्ट्रधर्माचे तारणहार श्रीमान चुलतराजसाहेब ह्यांसी बालके अमेयाजी खो नामे कडवट मनसैनिकाचे लाख लाख दंडवत, विनंती विशेष. साहेबकाम तडीस नेले, मोहीम फते जाहली, ह्याचा संतोष वाटोन घ्यावा, ह्या इराद्याने हा नाचीज बंदा खतलिखाईची मुजोरी करितो आहे. मुआफी चाहतो. आपणांस...
सप्टेंबर 29, 2016
कधी तरी असे होते,  मनात सारे थिजून जाते...  कोरडेठाक आतले शिवार  एका सरीत भिजून जाते...    तुझी माझी पहिली भेट  कधी घडली आठवत नाही  बाकी सगळे थिजून गेले,  तेवढे मात्र स्मरत नाही    संध्याकाळी हातपाय धुऊन  देव्हाऱ्याशी उभे राहून  हात जोडून डोळे मिटून  कधी म्हटला होता पर्वचा?    कधी म्हटले होते पाढे...
सप्टेंबर 27, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, भाद्रपद कृष्ण द्वादशी.आजचा वार : तलवार!आजचा सुविचार : धीर्धरा धीर्धरा तकवा...हडबडूं गडबडूं नका!! नमो नम: नमो नम: नमो नम: (आज 1111 वेळा लिहिणार आहे...) मन उदास आहे. सकाळी उठलो. दात घासावेसेसुद्धा वाटत नव्हते. तरीसुद्धा घासले. नाश्‍ता करावासा वाटत नव्हता...
सप्टेंबर 27, 2016
आपण नेमकी कधी कूस बदलली हे इतिहासास नेमके ठाऊक नाही. कोणाला ठाऊक असते? कूस बदलणे सोडा, आम्ही तर खाटेवरोन खाली पडलो, तरी आम्हास काही कळत नाही. खुर्चीवर बसोन "आ‘ वासोन डुलकी काढता काढता लुढकलो, तरीदेखील काही "आ‘कळत नाही. गुदस्तसाली आम्ही खुर्चीवरोन लुढकल्यामुळे शेजारील खुर्चीवरील एक श्रोता प्राणांतिक...
सप्टेंबर 23, 2016
वाचकहो, खोटे कशाला सांगा? आम्ही राहतो, त्या लॉर्ड फॉकलंड आळीचे नाव बदलावे, यासाठी आम्ही अनेक वर्षे जंग जंग पछाडले. पण व्यर्थ!! नावे ठेवण्यात माहीर असलेल्या जालीम दुनियेने एक नही सुनी!! आम्ही मुंबईतील फॉकलंड रोडवर राहतो, असा कुणाचा गैरसमज झाला असेल, तर तो कृपया काढून टाकावा. आमची आळी वेगळी आहे!...
सप्टेंबर 06, 2016
प्रिय नानासाहेब फडणवीस,  सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र... विनंती विशेष. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. यंदाही आपण ‘वर्षा’ बंगल्यावर गणेशाची प्रतिष्ठापना केली असेल व एव्हाना पंधरावीस उकडीचे मोदक उदरात गेलेही असतील. मागल्या खेपेस आपण आमच्या घरी जेवायला आला होता, त्याची आठवण अजून ताजी आहे....
सप्टेंबर 05, 2016
तसा मी पाणीदार श्रद्धाळू नाही, आणि आगीनबाज अंधश्रद्धही नाही हे गणित कसे जुळावे? उदाहरणार्थ, माझ्या (ही) सुशिक्षित मध्यमवर्गीय मनाला खटकत राहतात, बातम्यांमधून दिसणारे देवस्थानांचे बेहिसाब खजिने आणि अतिश्रीमंत देवतांच्या मस्तकावर झळाळणारे स्मगलिंगच्या सुवर्णाचे किरीट, आणि तितकेच सलत राहाते भोळ्या-...
ऑगस्ट 18, 2016
सामांपाऽऽतु सरस्वती भगवती! प्राचीन चोपड्यांचे आलोडन करोन इतिहासाचा धांडोळा घेण्याचा आमचा ऐतिहासिक पिंड उभ्या महाराष्ट्रभूमीला ठाऊक आहे. पट्टीचे इतिहासतज्ज्ञ अशी आमची राजकारण्यांमध्ये ख्याती असोन इतिहासतज्ञे मात्र आम्हांस कुत्सितपणाने भट्टीचे राजकारणी म्हणताती. सांगावयास दुख होत्ये, की असे असले तरी...
ऑगस्ट 17, 2016
बेटा : (नेहमीच्या बालसुलभ उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा आयॅम बॅक! मम्मामॅडम : (खुर्चीत बसल्या बसल्याच) आलाससुद्धा इतक्‍यात? आलाच आहेस तर लग्गेच- बेटा : (पाय आपटत) नाय नो नेव्हर! मी पुन्हा आंघोळ, दाढी, ब्रेकफास्ट करणार नाही! मम्मामॅडम : (समजूत घालत) बेटा, पण- बेटा : (संतापाने) नो म्हंजे...
ऑगस्ट 16, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, श्रावण शुद्ध द्‌वादशी.आजचा वार : स्वातंत्र्यवार!आजचा सुविचार : कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।। नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) सकाळी उठलो तेव्हापासून अंगात वीज सळसळल्यासारखे होत आहे. मधूनच उजव्या हाताची मूठ आपोआप वळते आणि हात वर जातो....
ऑगस्ट 13, 2016
हे जे नानासाहेब फडणवीस आहेत, त्यांना छगनबाप्पांचे अनेकानेक इष्ट शुभाशीर्वाद. त्यांनाच कशाला? सगळ्यांनाच खूप खूप शुभाशीर्वाद. मोठ्यांना नमस्कार आणि त्याहूनही मोठ्ठ्यांना (म्हंजे कोणाला, हे ओळखलेत ना?) लाख लाख दंडवत. तूर्त माझे (भायखळ्यात) मज्जेत चालले आहे. इतरांचे माहीत नाही; पण माझे मात्र अच्छे दिन...
ऑगस्ट 12, 2016
या क्षणापासून आम्ही मोबाइल फोनशी घटस्फोट घेतला, घेतला, घेतला! फेसबुकादी नतद्रष्ट, तमोगुणी व हराम गोष्टींपासून तलाक घेतला, घेतला, घेतला!! सोसंल मीडियाशी काडीमोड घेतला, घेतला, घेतला!!! यापुढे आम्ही शतप्रतिशत व्रतस्थ राहणार आहो. मोबाइल फोनपासून चार हात दूर राहा, असा आदेश आम्हाला (श्रावण महिन्याच्या...
ऑगस्ट 11, 2016
"रिओत जा. सेल्ही काढा. हात हलवत अरत या...शी: काय हा वेळ आणि ऐश्‍यांचा अपव्यय?‘‘ सर्वच्या सर्व ओष्ठ्य उच्चारांना पहिल्याच फेरीत गारद करत ख्यातनाम स्तंभलेखिका म्याडम वाभा डे यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली, आणि आम्ही जागच्या जागी दिङमूढ झालो. प्रतिसादाखातर आम्ही फक्‍त "चुकचुक‘ असे केले.  "ऑलिंइकला...
ऑगस्ट 10, 2016
अत्यंत गहन आणि गुंतागुंतीच्या विषयाला हात घालतो आहे. दिल्लीचे पंतप्रधान श्रीमान स्वामी अरविंद ह्यांना कोर्टाने ‘ठुल्ला‘ ह्या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यास फर्माविले आहे. आम आदमीस साह्य करणे, हे आमचे परमकर्तव्यच होय. काही महिन्यांपूर्वी स्वामी अरविंद ह्यांनी दिल्लीच्या पोलिसदादांस उद्देशून ‘ठुल्ला...
ऑगस्ट 10, 2016
जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा।  मिथ्या भवार्णवा। दमलो होतो।।    दोन कवळांसाठी। किती यातायात।  वीत दीड वीत। पोटासाठी।।    जल्मता जल्मता। चालू पायपीट।  तुझ्या पायीं वीट। निरंतर।।    जळो ते शिवार। जगणे भिकार।  नको येरझार। दयार्णवा।।    सोसता सोसेना । संसाराचा ताप।  लागलीया धाप। धावूं धावूं।।    राजाने...