एकूण 773 परिणाम
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 23, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) - पहिल्या दोन मुली असताना, तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याच्या रागातून निमोण येथील एकाने पत्नीला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याबाबत तालुका पोलिसांनी वसंत कारभारी घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत आरोपी वसंत याची पत्नी विमल घुगे यांनी फिर्याद दिली. निमोण...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे...
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मे 15, 2019
पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ करमाळा...
मे 12, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) : उत्तर नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरणांचे एकुण १९.३५९ टी.एम.सी. इतके पाणी फक्त भंडारदरा धरणांतर्गतच्या सुमारे ७५ हजार एकर लाभक्षेत्रास दिले जात आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे सरासरी फक्त १५ ते २० टक्के इतकीच पूर्ण झालेली असल्याने मंजुर लाभक्षेत्रास...
मे 11, 2019
तळेगाव स्टेशन -  आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानंतर गुरुवारी...
मे 08, 2019
बामणी - भोकणी (ता. देवणी) मध्यम प्रकल्पामुळं गावांचं पुनर्वसन झालं, दुसरीकडं संसारबी थाटला; पण घोटभर पाण्यासाठी रोज अख्खं गावं हिंडुलालंय. गावांचं झालं, आता एकदाचं जगण्याचं पुनर्वसन हुईल का? अशी भावना बालाजी पाटील यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरवरून देवणीकडे जाताना बामणीचे बालाजी हे...
मे 08, 2019
तळेगाव स्टेशन - येथील गावतळ्याच्या सुशोभीकरणासाठी गाळ काढताना करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान पुरातन विहीर आढळली आहे.  तांबड्या मातीच्या बारीक विटांचे चुन्यातील बांधकाम आणि त्याखाली साधारणतः सात फूट खोल खोदाई आहे. पाणी शेंदण्यासाठी पोहरा तसेच मोट हाकण्यासाठी दगडांची व्यवस्था केलेली...
मे 06, 2019
टाकवे बुद्रुक : भावाच्या लग्नावरून माघारी घरी जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, दिवसभर लग्नात मिरवणाऱ्या भावाचा मृत्यू झालेल्याने, दिवसभर आनंदात असणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी (ता. 5) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. संदीप अर्जुन...
मे 04, 2019
पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन तिचा...
एप्रिल 28, 2019
कोरेगाव भीमा : शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना संवेदनशील अशा काेरेगाव भीमा, सणसवाडी मतदान केंद्रावर निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह सीआरपीएफची तुकडी बंदाेबस्तासाठी नेमण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने कोरेगाव सणसवाडीत संचलनही केले. शिरुर...
एप्रिल 26, 2019
नागपूर - रामबाग परिसरातील गुंड बादल गजभिये याच्या खून प्रकरणाचा इमामवाडा पोलिसांनी १२ तासांच्या आत छडा लावला. भावाची पत्नी आणि सासूला मानसिक त्रास देत असल्याने भावाच्या साळ्यानेच अन्य मित्रांच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची बाब समोर आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती...
एप्रिल 26, 2019
तळेगाव दाभाडे -  ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत. आगामी काळात...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून, घटना घडल्याची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत ते घटनास्थळी पोचेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. एकूण साडेतीन हजार पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असा तगडा पोलिस बंदोबस्त मतदानाच्या दिवशी असणार आहे...