एकूण 518 परिणाम
मार्च 12, 2019
तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (ता.११) सायंकाळी शिरगाव परिसरातील पवना नदी काठच्या तीन हातभट्टयांवर केलेल्या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये किंमतीचा ५ हजार लिटरपेक्षा अधिक कच्चामाल जप्त करून, चार महीलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. नव्यानेच रूजू...
मार्च 10, 2019
तळेगाव स्टेशन : पुणे-मुंबई महामार्गावरील केंद्रीय राखीव दलाच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडणाऱ्या सीआरपीएफच्या ट्रकला धडकून मागचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (ता.१०) सकाळी पावणेबाराच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे या तरुणाने हेल्मेट घातले होते....
मार्च 09, 2019
पुणे : वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत काल (ता.8) रात्री फ्लेवर्स हॉटेल साते येथे दोन गटांमध्ये जोरादार भांडण चालु असल्याचे वृत्त होते. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षक नितिन मोहीते यामध्ये जखमी झाले आहेत.  वङगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत ता. 8 मार्चला 11.45 वाजताचे सुमारास फ्लेवर्स हॉटेल...
फेब्रुवारी 22, 2019
तळेगाव दाभाडे  - येथील नगर परिषदेचा २०१९-२० या वर्षासाठीचा २११ कोटी ४० लाख २८ हजार पाचशे रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी मंजूर करण्यात आला. पंचवीस लाख ७० हजार ७८२ रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. आगामी काळात सुमारे...
फेब्रुवारी 18, 2019
परळी वैजनाथ - बंद ऑइल मिलमध्ये अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. स्फोटाचे कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. गोपाळ लक्ष्मण गणगे (वय 50, रा. अकोला) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. परळी-बीड राज्य रस्त्यावरील तळेगाव...
फेब्रुवारी 17, 2019
परळी वैजनाथ (जि. बीड) : तालुक्यातील तळेगाव येथील बंद ऑईलमील मध्ये स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला याबद्दल संदिग्धता आहे. येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी दिली. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना मिळालेला चांगला दर हे यंदाच्या...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - स्थळ : पुणे मनपा, वेळ : ६.४७ सायंकाळची... बस थांब्यावर तीन बसमध्ये बसू शकतील एवढे प्रवासी... मात्र बस कधी येईल याचे उत्तर कोणाकडेही नाही... प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्ती, महिला व विद्यार्थिनी... अंधार पडू लागतो, तसे प्रवासी अक्षरशः रडकुंडीला येतात अन्‌ बस नियंत्रक हतबल होतात....
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे...
फेब्रुवारी 13, 2019
तळेगाव स्टेशन - एल ॲण्ड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन कंपनीचे अधिकारी, आमदार संजय भेगडे आणि शिवक्रांती कामगार संघटनेचे नेते ॲड. विजय पाळेकर यांच्यात सोमवारी (ता. ११) रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर अखेर स्थगित करण्यात आले. तळेगाव एमआयडीसीतील एल...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड...
फेब्रुवारी 12, 2019
तळेगाव स्टेशन - ऊन-पावसाची तमा न बाळगता डोंगर व नदी-नाल्यांतून मार्ग काढत शाळेत जाणाऱ्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीच्या माध्यमातून मावळात तीन वर्षांपासून सायकलदानाची मोहीम राबविली जात आहे.  गरजू विद्यार्थ्यांसाठी...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी डच गुलाबाच्या विविध प्रकारच्या फुलांची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. त्यामुळे या फुलांच्या मागणीतही वाढ होऊ लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘व्हॅलेंटाइन डे’ या दिवशी प्रेमीयुगुलांकडून डच गुलाबाची मागणी वाढते. खेड शिवापूर,...
फेब्रुवारी 09, 2019
चाकण ः चाकण-तळेगाव राज्य मार्गावर चाकणजवळील खराबवाडी (ता. खेड) गावाच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरील दोघांवर भर रस्त्यात कोयता, गजाने हल्लेखोरांनी हल्ला केला. यात प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय 19, रा. चाकणचा राणूबाईमळा) याचा खून करण्यात आला. पीयूष शंकर धाडगे (वय...
फेब्रुवारी 04, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): आपला सहकारी शिक्षक बांधव आजाराच्या संकटात सापडल्याचे समजताच शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक बांधव एकवटले आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी मदतनिधी उभा करण्यास सुरवात झाली. अगदी अल्पकाळात आतापर्यंत सुमारे 5 लाख रूपये निधी संकलीत झाला आहे. आणखीही निधी संकलनाचे काम चालूच...
फेब्रुवारी 02, 2019
बीड : अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे व अव्वल कारकुन महादेव महाकुंडे या दोघांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्याची घटना नुकतीच घडली. पुरवठा विभागातील चौकशी अहवालावरील कारवाई टाळण्यासाठी ही लाच स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.  पुरवठा विभागातील अनियमिततेची चौकशी करुन हा अहवाल अप्पर...
जानेवारी 29, 2019
पुणे - माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने आयटी टॉवरला तीन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या सवलतीचा फायदा घेऊन बांधकाम व्यावसायिकांसह जागामालकांनी गेल्या तीन वर्षांत शंभर आयटी टॉवर उभारले. परंतु, या टॉवरमध्ये आयटी कंपन्याऐवजी हॉटेल आणि अन्य...
जानेवारी 06, 2019
ठाणे- ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड या उच्चभ्रू गृहसंकुलातील डॉक्‍टर तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नीट परीक्षेच्या ताणातून आत्महत्या केल्याचे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले. तिची...
जानेवारी 03, 2019
तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. रांजणगाव गणपती (...