एकूण 310 परिणाम
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 14, 2019
नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण वाढल्याने...
एप्रिल 29, 2019
कलापुरातील गुजरी आणि गंगावेश परिसरात आजवरचं सारं आयुष्य गेलं. शहराचा हा तसा जुना भाग आणि त्यामुळेच लहानपणापासून सांस्कृतिक वातावरणातच घडत गेले. पुढे अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 28, 2019
"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात...
एप्रिल 28, 2019
कोपऱ्यावर एका चहाच्या दुकानावर चौकशी करण्याकरिता मी आत शिरलो, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला माधवसारखा मनुष्य दिसला; पण कपडे मात्र मळकट, शर्ट आत न खोचलेला. मी आनंदानं हाक मारली ः 'विजय, ए विजय...'' तो मनुष्य मात्र थांबायला तयार नव्हता. आता मात्र मी पळत जाऊन त्याला थांबवलं. क्षणभर आम्ही एकमेकांकडं...
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे...
एप्रिल 26, 2019
नागपूर - बॉम्बस्फोटांची मालिका घडवून १९९३ साली संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्यांपैकी एक प्रमुख आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क याचा आज नागपुरात मृत्यू झाला. सेंच्यूरी बाजार येथे बॉम्ब ठेवणारा गनी २०१२ पासून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त होता. टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती....
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 24, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाला अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहापर्यंत प्रचार संपवावा लागणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या रेषांनीच या निवडणुकीत बाजी...
एप्रिल 20, 2019
आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग...
एप्रिल 18, 2019
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम परिसरात राहायला. साहजिकच संपूर्ण बालपण सरले ते पेठेच्या वातावरणात. त्यामुळे रांगडेपणा, कट्टा, मंडळामंडळातील कुरघोड्या हे सगळे अत्यंत जवळचे आणि जिव्हाळ्याचे विषय. आजवर अनेक मालिका, चित्रपट, मराठी-हिंदी नाटकं केली. पण, पेठेने नसानसांत भिनवलेली तालेवार खवय्यैगिरी मात्र अगदी...
एप्रिल 14, 2019
जळगाव ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांना नवा लुक देऊन बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर "बसपोर्ट' साकारण्याची संकल्पना आणली होती. मात्र महामंडळाची ही संकल्पना केवळ कागदावरच राहिली असून, जळगावसह राज्यातील तेरा बसपोर्ट साकारण्याचा विषय बारगळला आहे. अर्थात बसपोर्टच्या माध्यमातून...
एप्रिल 10, 2019
पुणे : गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ हा  चित्रपट ५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा मोठा फटका बसला असून निवडणूक आयोगाने चित्रपट थिएटर मध्ये दाखविण्यास, चित्रपटाचे पोस्टर लावण्यास आणि इलेक्ट्रोनिक मिडीयात सुरु असलेले चित्रपटाचे...
एप्रिल 09, 2019
पंचवीसेक वर्षे झाली कोल्हापुरातून मुंबईला येऊन. पण, आजही कोल्हापूर सोडताना पुढे पुढे ढकललेला एकेक दिवस आठवतो. मुंबईत आल्यानंतर काही काळ संघर्ष जरूर होता. मात्र, ती सुद्धा एक घडण्याची प्रक्रियाच होती. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी आणि सिनेमांतूनही आजवर भरपूर काही केले. पुढंही बरेच काही करायचे आहे....
मार्च 31, 2019
कोल्हापूर - उद्योगासाठी महावितरणने सप्टेंबरपासून सातत्याने वीज दरवाढ केली आहे. दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, या दरवाढीविरोधात उद्योजकांत तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. ही अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी; अन्यथा लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेण्याबरोबरच आचारसंहिता संपल्यानंतर...
मार्च 27, 2019
पिंपरी - ‘एक तरी अंगी असू दे कला। नाहीतर काय फुका जन्मला...।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे अनेक जण जगत आहेत. त्यांनी कलेला महत्त्व दिले आहे. कुणी चित्रकार आहे, तर कुणी गायन, वादन आत्मसात केले आहे. कुणी नृत्य, तर कुणी अभिनय करीत आहे. या कला सादर करण्याचे व्यासपीठ म्हणजे रंगभूमी. या...
मार्च 25, 2019
पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बालरंगभूमी अजूनही ‘प्रायोगिक’ अवस्थेत आहे. शाळा पातळीवर अनास्था आणि सरकारकडून होणाऱ्या उपेक्षेबरोबर या रंगभूमीला खडतर प्रवास करावा लागतो आहे. विश्‍व बालरंगभूमी दिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम झाले; पण खरंच रंगभूमी उमलली का, असा...