एकूण 591 परिणाम
डिसेंबर 11, 2018
तिरुअनंतपुरम : शबलीमलाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने सोमवारी सचिवालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्या वेळी पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याच मुद्द्यावरून कॉंग्रेसप्रणीत यूडीएफने विधानसभेवर मोर्चा काढला होता. भाजप आणि...
डिसेंबर 10, 2018
धुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या...
डिसेंबर 06, 2018
बाळापूर(अकोला): धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना आज (ता.06) उघडकीस आली. ही घटना पारस फाट्यावर घडली असून, यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी...
डिसेंबर 05, 2018
बुलंदशहर : गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेला हिंसाचार आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अनधिकृत वृत्तानुसार चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. बुलंदशहरची स्थिती पूर्वपदावर येत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक आनंद...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : प्ररप्रांतियांना महाराष्ट्राबाहेर हाकलण्यावरुन राज्यभरातील ठिकठिकाणी आंदोलने, बसवर दगडफेक करण्यात आली होती. प्रकरणात बदनापूर (जि. जालना) पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के...
नोव्हेंबर 28, 2018
लोणावळा - पवना धरणाजवळील ब्राह्मणोली येथे जमिनीच्या वादातून १० ते १२ वाहनांची तोडफोड व महिलांना मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रकार झाला. सोमवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अनिकेत कांताराम काळे (वय २१), हनुमंत रामू काळे (वय ४२), सागर...
नोव्हेंबर 27, 2018
एसटीने विद्यार्थिनीला चिरडले नागपूर : भरधाव एसटीने दुचाकीस्वार विद्यार्थिनी खुशी ऊर्फ रागिणी पांडुरंग खोत (12, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) हिला जबर धडक दिली. अपघातात ती ठार झाली तर मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, आरोपी चालक मनीष सखाराम सोनटक्‍के (27, रा. वर्धमाननगर...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - हलबा समाजातील तरुणांकडून बस फोडण्याचा क्रम आजही सुरूच राहिला. मंगळवारी रात्री रेशीमबाग, पारडी येथे परिसरात दगडफेक करीत दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या. सोमवारी रात्रीसुद्धा वैशालीनगरात एक बस फोडण्यात आली. दरम्यान, उपोषणकर्ते कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळली. अजूनही शासनाकडून...
नोव्हेंबर 20, 2018
हलबा आंदोलनाला हिंसक वळण   नागपूर, ता. 19 : हलबा समाजाला आरक्षणाचा घटनादत्त अधिकार मिळण्यासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने 15 नोव्हेंबरपासून अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. शहरात दोन...
नोव्हेंबर 19, 2018
पिंपरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी स्टेशनलगत असणाऱ्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना, त्याला शनिवारी (ता. 17) दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करत अचानक झाड पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या दंगलीत दाखल गुन्ह्यांपैकी तेवीस गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाकडून शासनाला शिफारस करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती गुरुवारी...
नोव्हेंबर 16, 2018
फलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली. त्यात चार पोलिस जखमी झाले. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात 20 ते 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली...
नोव्हेंबर 10, 2018
आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर...
नोव्हेंबर 03, 2018
हिंगोली : हिंगोली मध्ये एम् आय एम् चे पदाधिकारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान मारहाणीची घटना शनिवारी (ता. 3) घडली आहे.  या हाणामारीत दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  हिंगोली शहरालगत गारमाळ भागात एम. आय. एम. चे जिल्हाध्यक्ष शेख  बुरहान पहेलवान व...
नोव्हेंबर 01, 2018
जम्मू : जम्मू काश्मीरच्या बडगाव जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ही चकमक आज (गुरुवार) झगू अरिझल परिसरात घडली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. बडगाव...
ऑक्टोबर 28, 2018
नवी दिल्ली : काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. बांगलादेशच्या निर्मितीमुळे पाकिस्तान भारताशी बदला घेत असेल, तर भारतीय जवान पाकिस्तानचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे आज भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानने छुप्या युद्धाची रणनीती सुरू ठेवली, तर भारताकडे...
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - सायंकाळी साडेसहापर्यंत लोडशेडिंग झालेल्या भागाला विद्युत पुरवठा सुरू होताच बिघाड झाल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांना पाचारण करून चार तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. हा...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली/अमृतसर : जोडा फाटक रावणदहनादरम्यान घडलेल्या रेल्वेदुर्घटनेने ठप्प झालेली रेल्वेसेवा आज चाळीस तासांनंतर सुरू झाली. रविवारी दुपारी साडेबारानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. मनवाला ते अमृतसरदरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मालगाडी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान...
ऑक्टोबर 22, 2018
महाराष्ट्रातील विजयादशमी राजकीय फटाक्‍यांनी दणाणून गेली असतानाच, तिकडे दूरवर पंजाबात शुक्रवारी "रावणदहना'च्या निमित्ताने कडाडलेल्या दारूगोळ्यांच्या दणदणाटात रेल्वे गाडीच्या शिट्या ऐकूच न आल्यामुळे त्या गाडीखाली चिरडून किमान 61 लोक प्राणास मुकले. अंगावर शहारे आणणारी अशीच ही घटना असून, त्याबद्दल...