एकूण 516 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण...
सप्टेंबर 27, 2018
श्रीनगर : लष्कराचे मेजर सतीश दहिया यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लष्करे तैयबाच्या एका दहशतवाद्यासह दोघे दहशतवादी आज सोपोरमधील चकमकीत ठार झाले. अबू माझ असे या लष्करे तैयबाच्या दहशतवाद्याचे नाव असून, त्याच्यासह अब्दुल माजिद ऊर्फ समीर हा दहशतवादीही मारला गेला आहे.  जम्मू-काश्‍मिरातील...
ऑगस्ट 26, 2018
मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमधील भटवाडी येथील अविनाश पवार (वय ३०) याला अटक केली. स्फोटकांप्रकरणी तो संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून सीपीयू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली....
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद - नालासोपारा प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शहरातील निराला बाजार येथील एका तरुणाला मंगळवारी (ता. 14) ताब्यात घेऊन मुंबईला नेले होते. त्याची कसून चौकशी सुरू असून, तो यापूर्वी अटकेतील एका संशयिताचा मित्र असल्याचे सूत्रांनी सांगितले. नालासोपारा येथे...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - पुणे आणि नालासोपारा या ठिकाणी दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत घातक शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग आणि महत्त्वाचे साहित्य जप्त केले. ते स्वत:च शस्त्र बनवत होते. घरातच शस्त्रनिर्मितीचे छोटे-छोटे कारखाने सुरू असल्याचे उघड झाले आहे. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज अटक केली. वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर अशी त्यांची नावे आहेत. राऊत आणि कळसकरला मुंबईनजीकच्या नालासोपारा येथून; तर...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - राज्यातील काही भागांत घातपात घडवला जाण्याची शक्‍यता असल्याची माहिती मंगळवारी (ता. 7) एटीएसला मिळाली होती. पाच मोबाईल क्रमांकांचा माग काढून पोलिस वैभव राऊतपर्यंत पोहोचल्यावर हा कट उलगडला. मात्र, अटक केलेले तिघेही नवखे असून यामागे दुसराच सूत्रधार असण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी...
एप्रिल 03, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या आगोदर अमेरिकेने दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष मिल्ली मुस्लिम लीग पार्टी (एमएलएम) पक्षाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या हाफीज सईदवर...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यामध्ये आज (बुधवार) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान आणि दोन पोलिस जवान हुतात्मा झाले. या चकमकीत अन्य एक जवान जखमी झाला. या चकमकीत चार दहशतवादीही ठार झाले. कुपवाड्यामधील अरमपोरा भागात दहशतवाद्यांसाठी शोधमोहिम राबविली जात असताना...
मार्च 05, 2018
शोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले. रविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी...
फेब्रुवारी 13, 2018
नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान अखेर झुकले असून, पाकिस्तानकडून हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज (मंगळवार) पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी 'अँटी टेरेरिझम अॅक्ट' (दहशतवादविरोधी कायदा) संदर्भातील...
फेब्रुवारी 04, 2018
एखादी गोष्ट चांगली की वाईट हेही ठरवणं कठीण जातं. खरी की खोटी, हा सवाल तर दूरच राहिला. एखाद्या कहाणीतली पात्रं अस्सल वाटतात; पण संपूर्ण कहाणीच एक भ्रम वाटायला लागतो. अतिवास्तवाच्या पातळीचं काहीतरी सळसळत आजूबाजूनं जातं. पकडायला जावं तर हाती काहीच लागत नाही. सत्य घटनेवर आधारित  असलेला ‘इन द नेम ऑफ द...
जानेवारी 17, 2018
इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. शाहिद अब्बासी यांनी जिओ टीव्हीला...
डिसेंबर 30, 2017
इस्लामाबाद - लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्यासोबत एकाच मंचावर पॅलेस्टाईनचे राजदूत दिसल्याने भारताकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे, की याबाबतचे वृत्त...
नोव्हेंबर 30, 2017
नागपूर - आपण अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता; परंतु यापुढे त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. शहरातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
नोव्हेंबर 26, 2017
मुंबई : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे झाली आहेत. त्यानंतरही या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असलेले पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचे म्होरके अजूनही मोकाट आहेत. दहशतवादी हाफिज सईदची सुटका झाल्यामुळे तर या गुन्हेगारांना शिक्षा होणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.  सागरी...
नोव्हेंबर 18, 2017
श्रीनगर : काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात आज (शनिवार) अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय हवाई दलाच्या गरूड कमांडो फोर्सचे एक कमांडो शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.  चंदेरगीर खेड्यातील हजीन भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत पाच अतिरेकी मारले गेले आहेत. या भागात...
नोव्हेंबर 12, 2017
लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याला ठार मारण्याचा कट परदेशी गुप्तचर संस्थेने आखला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे सईदच्या सुरक्षेत वाढ करावी, असे पत्र सरकारने पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पाठविले आहे.  राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे, की...
नोव्हेंबर 11, 2017
श्रीनगर- येथील शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने आज(शनिवार) पासून शोध मोहीम हाती घेतली आहे. काही दहशतवाद्यांनी या जिल्ह्यांत घुसखोरी केल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचे येथील स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.  राष्ट्रीय रायफल्स्, राज्य पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबधित असलेल्याला एकाला आज पहाटे उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाने (यूपी एटीएस) सहार विमानतळावरून अटक केली. आबू जाहिद सल्लाउदीन शेख ऊर्फ आबू जैद असे त्याचे नाव आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेले जाणार आहे...