एकूण 117 परिणाम
December 02, 2020
सांगली ः नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून गेल्या चार ते पाच वर्षांत क्रश सॅंड (दगडांपासून बनवलेल्या कृत्रिम वाळू) आणि आता वॉश सॅंडने (दगडापासून धूळविरहित धुतलेली वाळू) जागा घेतल्याचे चित्र आहे. आज शहर व परिसरातील 95 टक्के बांधकामे याच वाळूपासून होत आहेत. त्यामुळे आता नैसर्गिक वाळू म्हणजे श्रीमंताची...
December 01, 2020
कोरेगाव (सातारा)  : येथे आज (मंगळवारी) सायंकाळच्या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विवाहपूर्व धामधुमीतही वधू असलेल्या कोरेगावच्या सभापतींच्या मुलीने वडील व दोघा भावंडांसह कोरेगाव येथील केंद्रावर जाऊन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला. कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे...
November 30, 2020
अहमदनगर (अहमदनगर) : महाविकासआघाडी सरकारला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे पक्ष कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत आणि पेढे भरवीत आनंद साजरा केला.  शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, की...
November 30, 2020
बोरंगाव : बदलेल्या हवामानामुळे हलक्‍या सरीमुळे बोरंगाव, निंबळक, राजापूर, लिंब, तुरची, आळते या भागातील शेतकरी दोन-तीन दिवसांच्या ढगाळ वातावरनामुळे हैराण झाला आहे. तीन - चार दिवसांपासून बोरंगाव परिसरात ढगाळ वातावरण झाल्याने द्राक्षबागावर दाऊनी, भुरी रोगांचा पादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे...
November 28, 2020
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा अजितदादा...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 27, 2020
निमगूळ (नंदुरबार) : दोंडाईचा शहरात धाडसी चोऱ्यांसह दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यास पोलिसांना अपयश येत आहे. पोलिस निरीक्षकपद टिकाऊ नसल्याने शहरावर अनेक वर्षांपासून पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक आले, की लागलीच जाण्याच्या तयारीत असतात. त्‍यामुळे...
November 24, 2020
मुरगूड (कोल्हापूर) : येथील वेदगंगा नदीला लागून असलेल्या दत्तमंदिराजवळील जवळपास तीस एकरांतील उसाला आग लागली. यात शेतकऱ्यांचे चाळीस लाखांचे नुकसान झाले. सूरज मधुकर मोरबाळे यांच्या सात एकर उसासह ठिबक सिंचनची लाखो रुपयांची पाईप खाक झाली. दरम्यान, ऊस जळाला असताना नगरपरिषदेने वेगवेगळी कारणे सांगत बंब न...
November 22, 2020
लव्ह जिहाद (Love Jihad)  मुद्यावर भाजप दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केलाय. एका बाजूला भाजप लव्ह जिहाद प्रकरणात कठोर  कायदे लागू करण्याची भाषा करत आहे.  दुसरीकडे असा प्रकार करणाऱ्यांना पक्षात प्रवेश ही दिला जात आहे. या...
November 21, 2020
पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी भारत शिवाजी बागल यांना डाळिंब बागेतून भरघोस उत्पादन मिळाले आहे. सात एकर बागेतून त्यांना यावर्षी 40 टन उत्पन्न मिळाले आहे. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांनी बाग लगडली आहे.  लॉकडाउननंतर हळूहळू शेतीमालाचे दर वाढू...
November 20, 2020
बोरंगाव : येथील निंबळक-बोरंगाव एक किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ' रस्त्यात खड्डा कि खड्डात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपा च्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने केलेले अतिक्रमणामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे...
November 20, 2020
केत्तूर (सोलापूर) : दोन महिन्यांपूर्वी 20 रुपये जुडीप्रमाणे विकली जाणारी कोथिंबीर आता मात्र एक रुपया जुडी या दराने विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक मात्र घायाळ झाला आहे. मजुरी तसेच वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादकांनी कोथिंबीर तशीच सोडून दिली आहे तर काही ठिकाणी गुरांना टाकली जाऊ लागली आहे. ...
November 19, 2020
मंचर : अरब राष्ट्रांमध्ये पदवीधरांना शून्य टक्के व्याजदराने उद्योग व्यावसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. फक्त एक टक्का प्रोसेसिंग शुल्क आकारले जाते. याप्रमाणेच राज्य शासनाने बेरोजगार पदवीधरांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी...
November 18, 2020
कारंजा (जि. वर्धा) :  महामार्गावर देववाडी लगत सुक्‍यामेवाचा ट्रक उलटला. असे असले तरी हा अपघात बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. यावरून पोलिसांनी ट्रकचालक आणि वाहकाला अटक केली आहे. या दोघांनी काही इतर आरोपींच्या सहाय्याने यातील बऱ्याच साहित्याची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांना...
November 18, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या...
November 17, 2020
वाशी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचा (एमआयडीसी) कारभार कागदपत्रांद्वारे चालत होता. त्यामध्ये मोठ्या प्रमणात बदल करण्यात आले असून एमआयडीसीची "ई कनेक्‍ट'कडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी "सिंगल विंडो सिस्टम' सुरू करण्यात आली आहे. कोरोनाकाळात लॉकडॉऊन लागू करण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू...
November 16, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब हे वीरपुरुष होते. त्या वीरास अखेरची मानवंदना देण्यासाठी 17 नोव्हेंबर, 2012 रोजी शिवतीर्थावर 40 लाख...
November 16, 2020
सांगली : मोबाईल, टी.व्ही. आणि सोशल मिडीयाच्या मोहजालात अडकलेल्या आताच्या पिढीचा मैदानाकडे ओढा कमीच आहे. कोरोना महामारीनंतर सर्व लोकांमध्ये निरोगी, सदृढ शरीर मिळवण्यासाठी व्यायाम आणि मैदानावर ओढा वाढलेला आहे. तरूणांना मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी सह्याद्रीनगर येथील क्रीडा विकास फाऊंडेशन व्हॉलीबॉल क्...
November 15, 2020
दिल्ली : गगुरु रामदेव बाबा हे येनकेन कारणाने सातत्याने चर्चेत असतात. त्यांचा पंतजली हा ब्रँडदेखील बाजारात चर्चेला असतो. आपल्या वक्तव्याबाबत रामदेव बाबा प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा राजकीय भूमिका घेताना दिसतात. त्यांचं भाजपशी असलेलं सख्य हे काही लपून राहिलेले नाहीये. अशातच रामदेव बाबांनी असं एक वक्तव्य...
November 14, 2020
बोंडले (सोलापूर) : फलटण तालुक्‍यातील न्यू फलटण शुगर कारखाना, साखरवाडी यांच्याकडे माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ऊसबिलाची कोट्यवधींची रक्कम गेली दोन- तीन वर्षे थकीत होती. ही रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे व बोंबाबोंब आंदोलनाचा धसका घेऊन...