एकूण 8054 परिणाम
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...
जून 18, 2019
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाखेचे माजी संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या पुढाकाराने प्रक्षेत्रात लिची या महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण पिकाचा...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 18, 2019
पुणे - वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाने ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून निषेध केला.  देशात ईव्हीएमविरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते. त्यामुळे आघाडीचे...
जून 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सातठिकाणी जिल्हा रूग्णालयांना असा दर्जा देण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याला ट्विटरव्दारे दुजोरा दिला आहे....
जून 17, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने "ईव्हीएम हटाओ देश बचाओ" अंतर्गत पुणे शहराच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी...
जून 17, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या गरवारे स्टेडियमकडे महापालिकेच्या यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. अखेर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनीच पुढाकार घेऊन रविवारी (ता.१६) मैदान चकाचक केले.  महापालिकेच्या गरवारे स्टेडियमवर शहराच्या...
जून 17, 2019
उमरी : उमरी तालुक्यातील तळेगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमाचा त्याची पत्नी आम्रपाली हैबते हिने विजेचा वायरने शाॅक देऊन जीवे मारुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी पत्नीला उमरी पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस...
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.  मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की,...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 16, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्याचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाला तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनीही आज (रविवार) तीव्र विरोध केला. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. बारामतीत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज झालेल्या बैठकीत नीरा...
जून 16, 2019
फलटण : सातारा येथे काल दुपारी राजे प्रतिष्ठान व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी विधान परिषद सभापती व फलटण तालुक्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केलेल्या दहनाच्या निषेधार्थ तालुक्यातील गावोगावी सदर घटनेचा निषेध रामराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. आज...
जून 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिलेली साथ आणि मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचे आकडे मांडून पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच हवेत, अशी आग्रही मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शनिवारी केली. परंतु, कॉंग्रेससोबत आघाडी राहणार असल्याचे...
जून 15, 2019
महाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने किल्ले रायगडावर आज (शनिवार)...
जून 15, 2019
कऱ्हाड ; राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिणसह सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीत भाजपने टार्गेट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रेठरे बुद्रूक येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची घोषणा करत भाजपने अनेक अंगाने त्यात गोळा...
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत...
जून 15, 2019
सोलापूर - मिरजहून नाझरा (ता. सांगोला) येथे दुचाकीवरून जाताना 9 जूनला झालेल्या अपघातात राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर (वय 20) याच्या डोक्‍याला जबर मार लागला होता. त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याला "ब्रेनडेड'...
जून 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच मेहबुब शेख तर कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी अनिल पतंगे,...