एकूण 8022 परिणाम
नोव्हेंबर 10, 2016
वेंगुर्ले : येथील पालिकेत चौरंगी लढत होत असून, कॉंग्रेस व शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची भीती आहे. मात्र ही बंडखोरी थांबविण्यात कॉंग्रेस व शिवसेना किती यशस्वी होते हे 11 ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजणार आहे. ही निवडणूक पालकमंत्री दीपक केसरकर (शिवसेना), बंदर विकासमंत्री...
नोव्हेंबर 09, 2016
16 जानेवारी 1978 रोजी मंगळवार होता. तत्कालिन मोरारजी देसाई सरकारने राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्या मार्फत वटहुकूम काढला आणि एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रूपयांच्या नोटा रद्दबातल ठरविल्या. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण तेव्हा संसदेचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी या निर्णयाचे स्वागत...
नोव्हेंबर 09, 2016
मुंबई - वेबसिरीजला सध्या तरुणांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच त्यांना लाखोंनी हिट्‌स मिळत आहेत. मराठी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी वेबसिरीजनेही मोठी झेप घेतली आहे. "चावट ग्रुप'ची निर्मिती असलेली "स्ट्रगलर साला' वेबसिरीज तर सातासमुद्रापार पोचली आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे....
नोव्हेंबर 09, 2016
पुणे - ""शहरात पडलेला कचरा पाहून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या परिस्थितीची लाज वाटते,'' अशी भावना मी व्यक्त करताना, पुणे शहराबद्दल कोठेही अनादर व्यक्त केलेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी केले आहे.  शहरात साचलेल्या कचऱ्याच्या...
नोव्हेंबर 09, 2016
येरवडा - बंडगार्डन पुलावर दीड कोटी रुपये खर्च करून खुले कलादालन सुरू करण्यात आले आहे. मात्र पाच महिने लोटले तरी महापालिकेची उदासीनता आणि प्रसिद्धीच्या अभावामुळे या ठिकाणी अद्याप कलाकारांना कला प्रदर्शित करता आलेली नाही. बंडगार्डन पूल केवळ वॉकिंग प्लाझा म्हणून म्हणून उभा आहे.  बंडगार्डन पुलावरील...
नोव्हेंबर 09, 2016
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात करण्यात आले. सुमारे 20 लाख रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना महापौर अश्‍विनी रामाणे यांनी या बैठकीत दिल्या. पानसरे यांच्या...
नोव्हेंबर 09, 2016
मालेगाव - येथील कॅम्प भागातील गजबजलेल्या हेरंब गणेश मंदिरामागील पापा मैदानावरून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयितांनी मध्य प्रदेशातून हे कट्टे आणल्याची शक्‍यता आहे. कट्ट्याचा वापर करून पंचशीलनगरमध्ये तसेच शहरात अन्य तीन...
नोव्हेंबर 08, 2016
सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसमधील बंडखोरीची दखल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. येत्या १३ नोव्हेंबरला वसंतदादा जन्मशताब्दीच्या निमित्ताने ते सांगलीत येत असून निवडणुकीसंदर्भात नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी बंडखोरीबाबतही चर्चा करणार...
नोव्हेंबर 08, 2016
आंदोलनकर्त्यांना अटक - दरासाठी सकल ऊस परिषदेचा ‘स्वाभिमानी’ला घरचा आहेर इस्लामपूर - ऊस आंदोलन काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची त्रेधा उडवणाऱ्या पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज खऱ्या अर्थाने मंत्र्यांचे दुखणे काय असते, याचा अनुभव आला. इस्लामपुरातील त्यांच्या आलिशान बंगल्यासमोर आज सकल ऊस...
नोव्हेंबर 08, 2016
बेळगाव - अटकेत असलेल्या पाच मराठी तरुणांवर सोमवारी (ता. ७) पोलिसांनी चक्क राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  हे कलम आताच अचानक का, असा प्रश्‍न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारला असता एकानेही समर्पक उत्तर दिले नाही. यावरून मराठीभाषकांना दडपण्यासाठी कर्नाटक शासन कुठल्या थराला जात आहे, हे स्पष्ट होते...
नोव्हेंबर 08, 2016
बाजारात विक्रीसाठी आलेला भाजीपाला, फळफळावळे व अन्नधान्य दर्जेदार असेल, तर त्यासाठी जास्तीचे चार पैसे मोजायला ग्राहकाची हरकत नसते. म्हणजेच बाजारव्यवस्थेतील गुणवत्तेचा पाया ठळक बनतो आहे. त्याची जाणीव शेतमाल उत्पादकांना होऊ लागली आहे. त्या दृष्टीने शेतकरी स्वत:त, शेतीत बदल करू पाहतोय. त्या बदलाचे...
नोव्हेंबर 08, 2016
नवी मुंबई -नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिवाळीला मिळणारे सानुग्रह अनुदान (बोनस) नाकारले आहे. चांगले काम करण्यासाठी सरकारकडून आम्हाला वेतन व भत्ते दिले जातात, मग बोनस कशासाठी घ्यायचा, असे सांगून त्यांनी इतर अधिकाऱ्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. मुंढेंसह प्रतिनियुक्तीवर आलेल्या...
नोव्हेंबर 08, 2016
पुणे - "जागोजागी पडलेला कचरा पाहून लोकप्रतिनिधी म्हणून मला माझ्या शहराची लाज वाटते...' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या कथित वक्तव्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी एकत्र येत...
नोव्हेंबर 07, 2016
नाशिक - शाश्‍वत शेती व तिच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक ही साखळी स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासोबतच शेतकरी सुखी व संपन्न करण्याचा निर्धार करीत दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेची रविवारी (ता.६) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सांगता झाली.  "अन्नसुरक्षेच्या...
नोव्हेंबर 07, 2016
तज्ज्ञांनी दाखविली प्रक्रिया उद्योगांची वाट; आत्मविश्‍वासाची केली पेरणी नाशिक - शेती क्षेत्राशी निगडित प्रश्‍नांवर चिंता वाहत बसण्यापेक्षा, शासनशरण प्रवृत्ती न ठेवता हिमतीच्या बळावर शेतकरी तरुणाईनेही आता प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उद्योजकतेची कास धरली पाहिजे, असे सांगत अनेक तज्ज्ञ,...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...
नोव्हेंबर 07, 2016
पॉप्युलरचं अंतरंग पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. नवेपणाचा शोध घेणाऱ्या या प्रकाशन संस्थेचं संपादकीय धोरण कसं घडत गेलं याची कल्पना या पुस्तकामुळं येतेच, शिवाय अनेक साहित्यविषयक घडामोडींचा मागोवाही घेता येतो. रामदास भटकळ यांनी स्वत- अनेक...
नोव्हेंबर 07, 2016
नाशिक - गात्रे शिथिल झालेली असतानाही 25 वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा उत्साह घेऊन गावागावात प्रकाशाचे दीप लावणारे पाडूरंग चव्हाण फलोत्पादन परिषदेला हजेरी लावणारे सर्वात वयस्कर शेतकरी ठरले आहेत. महापरिषदेनंतर तातडीने गावी जाऊन शेतकऱ्यांचा समूह तयार करुन त्यांची कंपनी स्थापन करण्याचा...
नोव्हेंबर 07, 2016
कऱ्हाड - पालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारीची अंतिम मुदत अद्यापही सहा दिवस आहे. त्या कालवधीत उमेदवारी मागे घेण्यासाठीचे राजकारण गतीत आले आहे. अनेक ठिकाणी दबावतंत्राने, अनेक ठिकाणी चर्चेतून अर्ज मागे घेण्याच्या वाटाघाटी सुरू आहेत. काही ठिकाणी पैसे देवून लोक "मॅनेज' केले जात आहेत. त्या वाटाघाटी पदरात...
नोव्हेंबर 07, 2016
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसमध्ये पुन्हा बिनसले तर, भाजप- शिवसेना जवळ आल्याचे चित्र आहे. या घटनांचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार असून, त्याचे पडसाद पुण्यातही नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा भाजपला मिळणार का? राष्ट्रवादी आपली ताकद...