एकूण 211 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे अनेक चमत्कार दडले आहेत. नगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशय परिसरातील साम्रद गावाजवळील सांदण दरी हे असेच एक अनुपम निसर्गशिल्प. पश्‍चिम घाटातल्या या परिसराला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. साहसी निसर्ग पर्यटन करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण बनले आहे....
ऑक्टोबर 30, 2018
रत्नागिरी - कडाक्‍याच्या उन्हाबरोबर अचानक सुरू झालेल्या मतलई वाऱ्यांनी कोकणात थंडी जाणवू लागली आहे. या बदलाने आंबा बागायतदार सुखावले आहेत. हवेतील वातावरण पंधरा दिवस असेच स्थिर राहीले तर मोहोर लवकर येईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे.  सप्टेंबरच्या अखेरीस परतीच्या पावसाचे ढोल वाजले. जून, जुलै व ऑगस्ट...
ऑक्टोबर 11, 2018
केत्तूर, (जि. सोलापूर) - उजनी पाणलोट परिसरातील पारेवाडी, जिंती व वाशिंबे (ता. करमाळा) रेल्वे स्टेशन परिसरात आज (ता. 10) पडलेल्या दाट धुक्‍यामुळे पाच फूट अंतरावरील काहीही दिसत नव्हते. याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला. या रेल्वे स्टेशन परिसरात या गाड्यांना ब्रेक घ्यावा लागला. धुके...
ऑक्टोबर 10, 2018
केतूर (सोलापूर) : बुधवारी (ता. 10) सकाळी उजनी पाणलोट परिसरातील पारेवाडी, जिंती, वाशिंबे (ता. करमाळा) रेल्वे स्टेशन परिसरात पडलेल्या प्रचंड पांढऱ्या धुक्यामुळे पाच फूटअंतरावरील काहीही दिसून येत नव्हते.  आज सकाळी बुधवार केतूर परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात पांढरी धुके पडल्याने पाच फूट...
सप्टेंबर 17, 2018
तारळे - तारळे व पाटणपासून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य सडावाघापूर पठारावर निळ्या रंगाची सीतेची आसव, पिवळी सोनकी व मिकी माउस आदी प्रकारातील फुले फुलली आहेत. पिवळ्या मिकी माउसच्या, तर निळ्या रंगाच्या सीतेची आसव फुलांमुळे पठारावर पिवळा व निळा सडा पडल्याचा भास होत आहे. ही रंगांची उधळण...
सप्टेंबर 12, 2018
परळी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळ्यात विविधरंगी फुलांचा बहर सुरू झाला आहे. कासपाठोपाठच आता चाळकेवाडीचे पठारही फुलांनी भरून गेले आहे. विविध रंगांच्या फुलांनी चाळकेवाडी पठारावर उधळणच केली आहे. मुळातच तांबड्या मातीमुळे उठून दिसणारे हे पठार आता पिवळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या...
सप्टेंबर 09, 2018
कोल्हापूर - परिसरात गेल्या अडीच-तीन महिन्यानंतर पावसाने थोडी उघडीप दिली आहे. आज (रविवारी) पहाटेपासून काही तास परिसरात धुके दाटले होते.(छायाचित्र - बी डी चेचर)
सप्टेंबर 03, 2018
सातारा - धुके, भुरभरणारा पाऊस, सर्वत्र हिरवळीचा गालीचा, वाजणारे ढोल अशा आल्हाददायक वातावरणातील सातारा हिल हाफ मॅरेथॉन माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ही स्पर्धा नव्हे तर जणू एक उत्सव होता. विशेष म्हणजे सातारा-कास रस्त्यावर कोठेही मला ना प्लॅस्टिक दिसले, ना कचरा दिसला. ‘सकाळ’ने राबविलेल्या ‘...
सप्टेंबर 03, 2018
सातारा - धुक्‍याची दुलई, रिमझिम पडणारा पाऊस, पाहावे तिकडे डोळ्यांना सुखावणारे हिरव्या गालिचाने नटलेले डोंगर, त्यातून जाणारा वळणावळणाचा ओला रस्ता अन्‌ मंद वाऱ्याने जाणवणारा सुखद गारवा अशा उल्हसित करणाऱ्या वातावरणात आज पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा अमाप उत्साहात झाली. ओल्या हिरव्या...
ऑगस्ट 26, 2018
ठाणे : माळशेज घाटात दरड कोसळल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 21) घाटात दरड कोसळल्याने कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चार दिवस घाटातील दरड हटविण्याचे काम सुरू होते. वाहतूक पूर्ववत झाली असली तरी खबरदारीचा उपाय...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : कुलू-मनालीहून चंडीगडकडे जाताना 66 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरडी कोसळल्याने पुण्या-मुंबईच्या बारा पर्यटकांसह शेकडो नागरिक रस्त्यातच अडकून पडले. कोसळणाऱ्या दरडी, दाट धुके आणि पाऊस यामुळे कुठलीही मदत मिळण्याची चिन्हे नव्हती. अशा वातावरणात तब्बल 14...
ऑगस्ट 24, 2018
पाऊस बरसताना येतात मनातही अलवारपणे शब्दांचे "घन ओथंबून...' पाऊस म्हटले, की उडणारी तारांबळ, रस्त्यांवर साचणारे पाणी, गाड्यांमुळे अंगावर उडणारे पाण्याचे, चिखलाचे शिंतोडे, रेनकोट, छत्री बाळगण्याचा वैताग असला तरी ग्रीष्माने हैराण झालेला प्रत्येक जीव मात्र सुखावतो. पायात पैंजण लेवून नृत्य करावे तसे...
ऑगस्ट 23, 2018
राजापूर - श्रावण सरींची पावसात सुरू असलेली भुरभूर, त्याच्या जोडीने डोंगर रांगांमधून दाटून येणारे दाट धुके, त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन...अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागांतील कातळ परिसर विविधांगी रंगबीरंगी फुलांनी खुलला...
ऑगस्ट 22, 2018
सरळगांव : माळशेज घाटात कोसळलेल्या दरडी (राडारोडा) हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सूरू आहे. पाऊस व धुके असल्याने सलग पणे काम होत नसल्याने आजही घाटातील वाहातूक सूरू होणार नसल्याची माहीती कल्याण प्रांत अधिकारी प्रशांत उकिरडे यांनी दिली. पावसाने उघाड दिल्यास सायंकाळपर्यंत घाटातील वाहातूक...
ऑगस्ट 21, 2018
सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील  माळसेज घाटात दरड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहीती मुरबाडचे नायब तहसीलदार हनुमंता जगताप यांनी दिली. वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला असून वाहातूक सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.     माळशेज...
ऑगस्ट 14, 2018
नागठाणे - प्रसिद्धीपासून काही अंतर दूर असलेला केळवली (ता. सातारा) येथील धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. सुटीच्या दिवसांत पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळताना दिसत आहे. साताऱ्यापासून ३५ किलोमीटरवर असलेला केळवली येथील धबधबा मोजक्‍याच पर्यटकांपर्यंत पोचला आहे. साताऱ्यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता...
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
ऑगस्ट 08, 2018
वणी (नाशिक) - सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगी गड हिरव्यागार भरझरी शालुने नटला असून, बहरलेल्या निसर्ग सौदर्यांची गडावर भाविकांबरोबरच पर्यटक, तरुणाईला भुरळ पडली आहे.  जुन महिन्यात पावसाने पाच सहा दिवस वगळता पाट फिरवली होती. मात्र जुलै...
ऑगस्ट 01, 2018
महाबळेश्वर - कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेल्या आंबेनळी घाटाची दुरुस्ती व देखभालीची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परंतु, निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय त्याकडे बघितले जात नाही, हेही दुर्दैव आहे. ...