एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे....
सप्टेंबर 17, 2018
देऊर - दरवर्षी पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी  व दुष्काळ जाहीर करण्यासाठी हेतुपुरस्सर स्थानिक अधिकारी,व राजकीय व्यक्ती पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी कमी दाखवितात. त्यामुळे उत्पादन कमी आल्यावर सुध्दा नुकसान भरपाई मंजूर होत नाही. पन्नास पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर झाली तरी त्यापासून शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई - ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी देण्याची अट बंधनकारक करत शेतकरी पाणीवापर संस्थांना परवाने देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने अवलंबले आहे. यादृष्टीने कोयना, कृष्णा आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यानंतरच परवाने दिले जाणार आहेत.  मान्सूनचा...
सप्टेंबर 03, 2018
मुंबई - सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत असून, शेंद्ररी बोंड अळी नियंत्रणासाठी 17 कोटी इतका निधी वितरित केला आहे. राष्ट्रीय कृषी...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - बेसुमार पाणीउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. याला आळा घालण्यासाठी जलसाठ्यानुसार पीकपद्धती अवलंबण्याबरोबरच मनमानी पाणीउपशावर यापुढे निर्बंध घातले जाणार आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महाराष्ट्र...
ऑगस्ट 08, 2018
पाली - एकविसाव्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करत आहेत. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. रायगड जिल्ह्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके...
जुलै 23, 2018
बीड - येथील कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय गोदामाला भीषण आग लागून साडेचार कोटींच्या कापसाच्या गाठी भस्मसात झाल्याची घटना रविवारी (ता. २२) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. तब्बल तीन तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जुलै 06, 2018
नागपूर - बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी राज्य शासनाने पाठवलेला प्रस्ताव केंद्र शासनाकडून फेटाळला आहे. बियाणे कंपन्यांनी आधीच नुकसानभरपाई देण्यास असमर्थता दर्शविली आहे. पीकविम्यातूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याचे बोलले जाते. खरीप हंगामात...
जुलै 01, 2018
नागपूर - पेरणीच्या हंगाम येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार असून ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पेरणी होईल, असा अंदाज आहे. यावर्षी प्रसिद्ध कंपन्यांच्या वेष्टणामध्ये बोगस बियाणे बाजारात आल्याची चर्चा आहे. याची सरासरी टक्‍केवारी ५ टक्‍के असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धस्स झाले आहे. विदर्भात २ कोटींपेक्षा अधिक...
जून 01, 2018
नागपूर - बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी ६८ कोटीची गरज असताना शासनाने फक्त १८ कोटींचा निधीच दिला. यामुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  यातून मोजक्‍याच शेतकऱ्यांना मदत होणार असल्याने प्रशासनाकडून मदतीसाठी भेदभाव होत असल्याची टीका शेतकऱ्यांकडून होण्याची शक्‍यता...
मे 14, 2018
शिरुरः निमोणे परिसरातील जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. येथील विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे तर, काही ठिकाणी विहिरींचे पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. घोड नदीकाठच्या गावांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली...
मे 13, 2018
आफ्रिकेबद्दल आपल्या प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. मानव जातीचा उगमच आफ्रिकेत झालेला आहे. त्यामुळे आफ्रिकेबद्दल उत्सुकता असतेच. नेदरलॅंडमधील वाखनिनन विद्यापीठ आणि आफ्रिकेतील युगांडामधील मेकेरेरे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या `वातावरणातील बदल आणि शेती आणि इतर नैसर्गिक संसाधनात करावयाचं अनुकुलन`...
मे 11, 2018
नागपूर - बोंडअळीच्या नुकसानासाठी मदत निधी देण्यात आला असून, नागपूर  जिल्ह्याला ६८ कोटी ५७ लाखांचा निधी मिळाला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सर्व १३ ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार असून त्यासाठी सुधारित आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, हा निधी फक्त ८ तालुक्‍...
मे 10, 2018
बीड - गेल्या वर्षीच्या खरिपातील कापूस पिकाची बोंडअळीने झालेल्या नुकसानीची अखेर भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील सहा लाख ९२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, प्रशासनाने मागणी केलेली सर्वच २५६ कोटी ५८ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम तीन टप्प्यांत मिळणार असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात...
मे 04, 2018
जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. खानदेशातील कापूस अव्वल दर्जाचा...
एप्रिल 26, 2018
देवळी (जि. वर्धा) - देवळी येथे एकपाळा शिवारात शंकर रामजी झिलपे (रा. एकपाळा) यांच्याकडे अनधिकृत कापसाची 36 पाकिटे जप्त करण्यात आली. बियाणे गुणनियंत्रण जिल्हा भरारी पथकाने तालुकास्तरीय पथकाच्या मदतीने बुधवारी ही कारवाई केली. सदर बियाण्यांच्या पाकिटावर कुठल्याही कंपनीचे लेबल नव्हते, त्यावर लॉट...
एप्रिल 20, 2018
प्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची वीस एकर शेती आहे. प्रारंभी काही वर्षे त्यांनी पारंपरिक पद्धतीने रासायनिक निविष्ठांचा वापर करत शेती केली. मात्र १९९५ पासून त्यांना रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यामुळे...
मार्च 30, 2018
लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते. कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली....
मार्च 22, 2018
बारमाही वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी वसलेले कवठे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) हे सुमारे दोन हजारांवर लोकवस्ती असलेले गाव आहे. साहजिकच गावची शेतजमीन बागायती आहे. विहिरी आणि कॅनालचाही गावातील सिंचनाला मोठा आधार असतो.  भेदिक शाहिरी कलेची परंपरा   कवठे गावाला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज...
जानेवारी 12, 2018
अमरावती - बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे संकट आगामी हंगामात गहिरे होण्याचा धोका लक्षात घेता यावर मात करण्यासाठी बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह जिनिंग-प्रेसिंग तसेच बियाणे गोदामामध्ये फेरोमोन्स ट्रॅप लावले जात आहेत.  राज्यातील कपाशीचे ३२.५८ लाख हेक्‍टर क्षेत्र बोंडअळीने...