एकूण 660 परिणाम
डिसेंबर 16, 2018
नवी मुंबई - सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
डिसेंबर 13, 2018
तुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला हरताळ फासला जात आहे. अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुषांच्या हातातच जास्त दिसत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने अबोली रिक्षासाठी परवाने मागणाऱ्यांचे...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी सर्वसामान्यांची पावती फाडणाऱ्या पोलिसांनाही आता या गुन्ह्यांसाठी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भात नवी मुंबईचे...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५०...
डिसेंबर 12, 2018
पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.  नवी मुंबई...
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि...
डिसेंबर 04, 2018
ऐरोली - ""महाराष्ट्रातील व देशातील इतर शहरांना पाणीप्रश्न भेडसावत असताना नवी मुंबईचे पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने केलेले आहे, की पुढील पन्नास वर्षे शहरात पाणीकपात करावी लागणार नाही आणि तेही कोणत्याही प्रकारची घरपट्टी, पाणीपट्टी न वाढवता'', असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी रविवारी (...
डिसेंबर 04, 2018
नवी मुंबई  - नेरूळ आणि तुर्भे भागात खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, जुईपाडा आणि बोनसरी येथे सुसज्ज गटारे व पावणे उड्डाणपुलाजवळ पादचारी पूल अशा विविध नागरी विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 10 कोटींच्या विकासकामांना...
डिसेंबर 04, 2018
तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले....
डिसेंबर 01, 2018
प्रभादेवी - आयुष्यभर समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या राधाबाई सारंग यांनी ९७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांनीही अवयवदानाचा संकल्प केला असून, इतरांनाही त्याबाबत आवाहन केले आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
डिसेंबर 01, 2018
नवी मुंबई - गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू झाली असतानाच वाशीतील एका खासगी शाळेतील मुलांना ही लस टोचल्यानंतर त्रास झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोन दिवस अफवांना पेव फुटले आहे. शहरातील तब्बल साडेआठ लाख मुलांना ही लस देण्याचे लक्ष्य ठेवलेल्या पालिकेसाठी हे धक्कादायक...
नोव्हेंबर 27, 2018
नवी मुंबई - शहरात उघड्यावर, पदपथाच्या किनारी आणि मिळेल त्या जागी घाणेरड्या अवस्थेत बेकायदा पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर यापूढे कारवाई केली जाणार आहे. कत्तल करताना प्राण्यांची आरोग्य तपासणी न करता थेट उघड्यावर कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याने नागरीकांकडून खरेदी...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती....
नोव्हेंबर 26, 2018
२१ व्या शतकातील स्मार्ट सिटी, सायबर सिटी व प्लान सिटी अशा अनेक बिरुदावल्यांनी प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानके, त्यावरील वाणिज्य कार्यालये, बीपीओ, मॉल्स अशा महत्त्वांच्या ठिकाणी अद्यापही सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत...
नोव्हेंबर 25, 2018
नवी मुंबई : सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेल्या लोकलची जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला धडक बसली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. लोकलचा वेग कमी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधी यांनी त्यात बाज मारल्याचे दिसून येते. स्वभाव आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचे उडणारे खटके यामुळे...
नोव्हेंबर 18, 2018
नवी मुंबईनवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने पोलिस उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करून सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शेलार सध्या नवी मुंबई...
नोव्हेंबर 16, 2018
तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून...
नोव्हेंबर 14, 2018
ऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे दर अजून चढेच आहेत. पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्या मात्र महागल्या आहेत.  घाऊक बाजारात भाज्यांची परराज्यातून...