एकूण 5201 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : जगाला जोडणारे माध्यम म्हणून फेसबुक तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. परंतु, काही महाभागांकडून फेसबुकसह अन्य सोशल साइट्‌सचा गैरवापर केला जात आहे. अज्ञात आरोपीने अशाच पद्धतीने मैत्रीचे जाळे फेकून युवतीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने पदाधिकारी व सदस्य नाही. अधिकारी ऐकत नसल्याच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यामुळे सीईओ संजय यादव नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहे. 19 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अद्याप...
ऑगस्ट 18, 2019
धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : नागपूर-औरंगाबाद एक्‍स्प्रेस हायवेवर घुईखेड गावाजवळ मारोती अल्टो व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत पती व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी व आईचा पुलगाव येथे मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील तळेगाव दशासर पोलिस ठाण्यांतर्गत रविवारला (ता.) दुपारी...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या लघुपटाची नागपूरकरांनी निर्मिती केली आहे. बहुजन समाज व आंबेडकरी समाज यांच्यात मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण व्हावे यासाठी चित्रपटाची निर्मिती...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : आठ दिवसांत समस्या सोडवा, नाहीतर मी सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करा, असे सांगेन अशी तंबी परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. जी व्यवस्था न्याय देत नाही तिला आपण फेकून द्यायला हवे, असे आपल्या शिक्षकांनी...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेते भाजपमध्ये येत आहेत. यामुळे संधी हिरावल्या जात असल्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. भविष्यात याचा फटका भाजपला बसू शकतो, अशी धोक्‍याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपला दिली....
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : मागील चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणावरून टीबी वॉर्डातील इमारतींना टाळे लावण्यात आले. परंतु, परिसरात काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथील जीर्ण झालेले निवासी गाळे अवैधरीत्या भाड्याने दिल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या निवासी गाळ्यांच्या परिसरात...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : उत्तर नागपुरात लष्करीबागेतील बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाच्या लोकार्पण समारंभात माजी मंत्री नितीन राऊत यांना आमंत्रित न केल्याने तसेच पत्रिकेत नाव घेतल्याने समर्थकांनी शनिवारी घोषणाबाजी केली. राऊत समर्थकांनी महापौर नंदा जिचकार व आमदार डॉ. मिलिंद माने यांना घेराव करीत प्रश्‍नांचा...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ चौकातील आरोग्यकेंद्रात दीड महिन्यापासून डॉक्‍टर नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने एकीकडे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेश थांबले आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : नागपूर विभागीय उपसंचालक पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला तिढा अधिक वाढत आहे. खुद्द शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी डॉ. शिवलिंग पटवे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. दोन दिवसांत या आदेशावर निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले असताना, दहा दिवस उलटले असतानाही त्यावर...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : निवडणूक आयोगासह संविधानानुसार स्थापन झालेल्या लोकपाल, यूजीसी, आरबीआय आणि यूपीएससी या संस्थेच्या स्वायत्तेवर सरकारने निर्बंध आणले आहेत. एका दिवसात 370 कलम रद्द केले. सर्वसामान्यांचा स्वप्ने पाहण्याचा अधिकारही सरकारने हिरावला असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गणेश देवी...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : न्यायनिवाडा झटपट व्हावा, गोरगरिबांना कोर्ट-कचेऱ्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नये, यासाठी त्यांच्याशी संवाद साधून प्रकरणांचा निवाडा करणाऱ्या "मध्यस्थांची आज गरज आहे. त्यासाठी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय कायदा व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : नोटाबंदीनंतर देशातील उद्योग क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले. यासाठी एकप्रकारे बॅंकांचे धोरण जबाबदार आहे. यातून बाहेर येण्यासाठी बॅंकांनी एनबीएफएस सारख्यांना कर्जपुरवठा करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या फेटरीचा नावलौकिक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. फेटरी येथील नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात महाराष्ट्र...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : शंभरपैकी एखादाच अधिकारी चांगला असतो. उर्वरित अधिकारी फाइल मार्गी लावण्याऐवजी ती कशी रोखता येईल, नियमांची भक्कम फौज त्याभोवती कशी लावता येईल याचाच विचार करतात. याच नकारात्मकतेने लघुउद्योगांचा विकास खुंटल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपाल यांनी...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : गणरायाच्या आगमनाला आणि निरोप देताना उड्डाणपुलांवर नाचण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. वाजतगाजत नाचताना अपघात होऊ नये याकरिता पोलिस आणि मनपाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. लवकरच पुलावर नाचण्यास बंदीचा आदेश काढण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणरायाचे आगमन धडाक्‍यात...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : घरात घुसून मुलीची छेड काढणाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अजनी पोलिसांनी केवळ धमकीचा "अदखलपात्र' गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे तर पीडितेला दिलेल्या "एफआयआर'च्या प्रतीवर ड्यूटी ऑफिसरच्या नावाचा उल्लेख कुठेही दिसत नसल्याने प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे...
ऑगस्ट 18, 2019
जलालखेडा (जि.नागपूर):  एकीकडे शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यादृष्टीने मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्‍लासरुम ही संकल्पना पुढे आणली. मात्र दुसरीकडे शाळांना जोडण्यात आलेला वीजबिल भरणा होत नसल्याने वीजजोडण्या कापल्या जात आहेत. त्यामुळे पंतप्रधान डिजिटल...
ऑगस्ट 18, 2019
भद्रावती(चंद्रपूर ) : राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण या विषयाच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील एक दशकापासून ऐरणीवर आहे. या पदांसाठी आवश्‍यक कार्यभार, बिंदूनामावली व संचमान्यता असताना देखिल...