एकूण 132 परिणाम
जानेवारी 25, 2020
मुंबई : टीव्ही सिरिअल विश्वातील अभिनेत्री सेजल शर्मा हिचा वयाच्या 25 व्या वर्षी धक्कादायक मृत्यू झाला आहे. सेजलने मुंबईच्या राहत्या घरी आत्महत्या केल्य़ाची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (ता. 24 ) ला मुंबईच्य़ा मीरा रोड परिसरातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुखद बातमी समोर आली आहे....
जानेवारी 21, 2020
दाओस (स्वित्झर्लंड) : वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 'क्रिस्टल' पुरस्काराने भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार तिला मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीबद्दल देण्यात आला. दाओस येथील सोहळ्यात "क्रिस्टल' पुरस्कार स्वीकारणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री होती...
जानेवारी 21, 2020
वैद्यकीयदृष्ट्या नैराश्याने ग्रासलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. इतर बहुतेक प्रकरणात नैराश्य हे स्वनिर्मित आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून तुमची मनःस्थिती निराश होते. यात नक्कीच शारीरिक, रासायनिक प्रक्रिया सामील आहे. प्रत्येक गोष्टीला रासायनिक आधार आहे, पण तुम्ही  ...
जानेवारी 21, 2020
कोणी कौतुक केले तर हुरळून जायला होते. पण, आपल्या एखाद्या ‘पोस्ट’ला मिळणाऱ्या ‘लाइक्स’वरून स्वतःला आजमावणे कितपत योग्य आहे? ‘लाइक करणे’ हा आजच्या ‘ऑनलाइन’च्या जगतात परवलीचा शब्द झाला आहे. स्तुती कुणाला आवडत नाही. सगळ्यांनाच आवडते. कुणी कौतुकाचे चार शब्द व्यक्त केले, तर निश्चितच क्षणभर सुखावह वाटते....
जानेवारी 19, 2020
स्वप्नं मोठीच असली पाहिजेत असं नाही. ती ‘तुमची’ असणं महत्त्वाचं आहे! तुम्ही बाळगलेलं स्वप्न हे जर खरोखरच तुमचं स्वतःचं स्वप्न असेल तर ते कधी ना कधी साकारण्यात तुम्ही यशस्वी व्हालच. एखादा दगड जसा पाण्यात टाकल्याबरोबर तळाशी जातो तसे तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत अगदी सहजपणे पोचाल... प्रत्येक वेळी...
जानेवारी 18, 2020
नांदेड : खेळण्या बागडण्याच्या वयातील मुले अभ्यासाच्या दडपणाखाली येऊन जगभरातील १५ टक्के मुले नैराश्येच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यात मराठवाड्याचे प्रमाण सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. परंतु, हल्ली मुलांच्या अभ्यासाशिवाय बऱ्याच पालकांचे मुलांच्या बारीक हालचालींकडे लक्ष नसते. त्यामुळे मुलांमधील हा...
जानेवारी 13, 2020
नांदेड : आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आवडत नसतील, आपल्या मनात त्याविषयी राग, तिरस्कार, चीड, खंत असेल तर मन मलीन होत राहते. मग आयुष्य एक ओझं होऊन बसते. डोक्यावरचं ओझं कुणी उतरवू लागेल; पण मनावरचं ओझं कोण उतरवेल? मनांवर ओझं घेऊन वाटचाल करणारी माणसं  दुःखी असल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या...
जानेवारी 05, 2020
Happy Birthday Uday Chopra : रोमँटिक चित्रपटाची निर्मिती करणारे दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा आपणा सगळ्यांनाच माहित आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीला असलेल्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना यश चोप्रांनी ओळख मिळवून दिली. यश चोप्रांमुळे यशराज बॅनर हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा बॅनर बनला. - ताज्या...
डिसेंबर 30, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. आदित्य पाटील, मनोविकारतज्ज्ञ हा आजार कुणाला नको व्हायला. बाकीचं काही झालं तर सांगू तर शकतो. हा आजार म्हणजे तोंड दाबून मुक्यांचा मार. सगळ्यांना त्रास होतो ना हो डॉक्टर. सगळ्या घरादाराची ओढाताण चाललीय. कसं होणार हो सगळं. मनोविकारग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांसोबतचे हे नेहमीचे संभाषण...
डिसेंबर 29, 2019
वारजे माळवाडी : सध्या अंधार, नैराश्य खूप आहे. समाजात मोठ्या प्रमाणावर विषमता वाढलेली आहे. बेकारी, प्रदूषण ही राक्षसे आपण निर्माण केली आहेत. विद्यार्थी, शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्याला स्वीकारलेली जीवनशैली आणि चुकीच्या दिशेने जाणारी आपली विकासनीती कारणीभूत असल्याचे मत प्रसिद्ध लेखक ...
डिसेंबर 19, 2019
नांदेड : आज प्रत्येकजण मिळविलेल्या उत्पन्नातून बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेक क्षेत्रात पगार कमी मिळतो. मिळणाऱ्या पगारावर कसरत करत घरगाडा अनेकांना चालवावा लागतो. तर मग बचतीचा प्रश्‍न येत नाही. तरीही माणूस आपल्या भविष्यासाठी पोटाला चिमटे देत बचत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय व कशी बचत...
डिसेंबर 17, 2019
सहज, सुलभ, निरोगी आयुष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतात परंतु त्याचे संतुलन कसे करावे याबबत योग्य ज्ञान नसल्याने बऱ्याचदा अपयशाचे दरवाजे उघडतात. असे का घडते याबाबत मार्गदर्शन व्हायला हवे कारण निरोगी आयुष्याकडे खऱ्या अर्थाने पाहणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी महत्तवाच्या...
डिसेंबर 15, 2019
‘पब्जी’ गेममुळं नुकतीच एका मुलानं आत्महत्या केली. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. व्हिडिओ गेम्सचा विळखा विशेषतः नव्या पिढीभोवती वेगानं आवळला जात असल्याचं दिसत आहे. हा विळखा कमी कसा करायचा, हे व्यसन वाढत गेलं तर कोणत्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात, यातून बाहेर कसं पडायचं आदी गोष्टींबाबत...
डिसेंबर 06, 2019
व्यायाम तर नेहमी हवाच. पण, गरोदरपणातही व्यायाम केलाच पाहिजे. गर्भारपणामुळे शरीरात होणाऱ्या बदलांना आणि त्यामुळे येणाऱ्या आरोग्य समस्यांना व्यायामाच्या मदतीने सामोरे जाता येईल.    स्त्रियांनो, तुम्ही कधी गरोदरपणात व्यायामाचा विचार केला आहे? केला नसेल, तर यापुढे विचार करा. यामुळे तुमच्या गरोदरपणाशी...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धेच्या युगात जीवनशैली बदलत चालली आहे. मोबाईल, जंक फूड तसेच आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लहान वयात विविध आजाराला निमंत्रण मिळत आहे. मुलांमध्ये मानसिक विकार जडत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.  आरोग्याला घातक गेल्या काही वर्षांत लहान...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : उच्च शिक्षण घेऊन आज अनेकजण नोकरीच्या शोधात भटकंती करत आहेत. त्यात काहींना नोकरी मिळते, काहींना मिळत नाही. परिणामी नैराश्य येऊन व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी करतात. मात्र, ज्यांच्याकडे इच्छा आहे, कल्पकता आहे ते नोकरीच्या मागे न धावता आपला वेगळा मार्ग धुंडतात....
नोव्हेंबर 29, 2019
ही घटना पंचेचाळीस वर्षापूर्वींची आहे. मला मात्र ती कालच घडल्यासारखे वाटते आणि अंगावर काटा येतो. मी त्या काळी बँक आँफ महाराष्ट्रमध्ये नगरला नोकरीस होतो. कोपरगाववरून नगरला बदलून आलो होतो. आई, दोन भाऊ आणि मी नगरला राहत होतो. धाकटा भाऊ श्रीपाद ऊर्फ आनंदा याला नोकरी नव्हती. खूप प्रयत्न करून तो दमून गेला...
नोव्हेंबर 26, 2019
बारामती शहर - गेल्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांना हायसे वाटले. अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भाजपसोबत अजित पवार गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या मागे नेमके काय राजकारण आहे हे अनेकांच्या समजण्यापलिकडचे...
नोव्हेंबर 21, 2019
बदलत्या खाण्याच्या पद्धती, मैदानी खेळ खेळण्याचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढू लागली आहे. हा लठ्ठपणा पुढे जाऊन नैराश्‍याचे कारण होऊ शकतो. लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांचा फार जवळचा सबंध आहे.  ज्या मुलींचा BMI (Body Mass Index) आवश्यकतेपेक्षा अधिक असतो, अशा मुलींना मुलांच्या तुलनेत...
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : ''आसमानी संकटात सुलतानी कारभारामुळे जम्मू काश्मीरमधील शेतकरी पिचलेला आहे, आमच्यासाठी सरकार काहीच करत नाही या नैराश्याने शेतकरी ग्रासले आहेत. कलम ३७० हटविल्याने सफरचंद, अक्रोड, केसर बाजारात न गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या समस्यांनी पिचलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसण्याचा...