एकूण 871 परिणाम
मार्च 22, 2019
पुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम उमेदवारानेच निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे - निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांनी फक्त भाषणबाजी न करता ठोस कार्यक्रम द्यावा...
मार्च 20, 2019
अंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्या युवकांना त्याने एकप्रकारे धडाच दिला आहे. तालुक्यातील...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...
मार्च 18, 2019
नाशिक -  आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तरुणांना नैराश्‍य येते. अगदी मोबाईलवर गेम खेळण्यास मज्जाव केला, तर टोकाचे पाऊल उचलले गेल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अठरा वर्षांपासून येथील पंकज बूब "मस्क्‍युलर डिस्ट्रॉफी' या असाध्य आजाराने ग्रस्त असून, जगभरात यावर कुठे उपचार नसतानाही मोठ्या हिमतीने...
मार्च 18, 2019
मी बालरोगतज्ज्ञ म्हणून गेली 52 वर्षे नागपूरला खासगी व्यवसायात आहे. "बालरोग' विषयातली पदविका प्राप्त केल्यानंतर काही काळ माझे आतेभाऊ डॉ. मनोहर केशव ऊर्फ नानासाहेब साल्पेकर यांच्या हाताखाली उमेदवारी केली. नागपुरातील ते पहिले पदविकाधारक बालरोगतज्ज्ञ. त्या काळात त्यांच्या दवाखान्यात सतत बालरुग्णांची...
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा...
मार्च 15, 2019
वाटा करिअरच्या  आपण आज कॉमर्स शाखा निवडीबद्दल पाहुयात. सर्वांना सामावून घेणारी अशी ही शाखा आहे. गणित उत्तम असल्यास ते घेऊन कॉमर्समधील उत्तुंग शिखरे काबीज होतात. गणित नको असले, तरीही फार बिघडत नाही. मात्र, इयत्ता दहावीपर्यंतचे व्यावहारिक गणित मात्र कायमच वापरावे लागते. नफा, तोटा, टक्केवारी शिवाय...
मार्च 15, 2019
पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्‍यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी...
मार्च 15, 2019
कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना शेतीत काम करण्याबरोबरच शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती. गावातील दारूबंदीपासून सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी राजगुरुनगर येथे ‘पालवी सामाजिक संस्था’ स्थापन केली. सतत प्रेरणास्थानी असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे या आदर्श...
मार्च 15, 2019
ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी लाभली. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले. वाफगाव (ता. खेड) या...
मार्च 15, 2019
आमच्यात पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. पतीसारखा जोडीदार मिळाला, हे माझे भाग्य समजते. देवाकडे एकच मागणी असून पुढचा माझ्या आयुष्यातला प्रवास माझ्या पतीबरोबर आनंदाचा व सुख-समाधानाचा राहणार आहे आणि राहो. माझे माहेर बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी सोमेश्...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 14, 2019
सातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपापल्या महाविद्यालयांचे झेंडे खांद्यावर घेऊन राष्ट्रीय छात्रसेनेच्या शिस्तीत भगवे स्नातक पोषाख परिधान करून पदवीच्या यशस्वितेचे तेज चेहऱ्यावर मिरवत काढलेल्या मिरवणुकीने आज येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिवाजी विद्यापीठाचा पदवी...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 14, 2019
आयुष्याच्या जडणघडणीत यजमान प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, माझी दोन्ही मुले व दोन्हीही कुटुंबांतील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळाल्याने आयुष्याची दमदार वाटचाल करू शकले. शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याने देश-परदेशात जाण्याची संधी मिळाली. इयत्ता तिसरीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि तिथूनच माझ्या...
मार्च 14, 2019
सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल. माझा जन्म माटुंगा - मुंबई...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
मार्च 14, 2019
पतीच्या मार्गदर्शनाखाली श्‍वेता तांबे यांनी ‘स्वामी मेडिकल स्टोअर्स’ नावाने दुसरे दुकान सुरू करून व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच सखी महिला बचत गट स्थापन केला व महिलांना एकत्र आणले. सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. ओतूर गावचे सरपंच संतोष देविदास तांबे यांच्या पत्नी...
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी दिवसांतला व कमी...