एकूण 635 परिणाम
एप्रिल 17, 2019
मुंबई - राज्यात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली असून 3,379 गावे आणि 7,856 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील धरणे व तलावांतील पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठीच करावा अशा सक्‍त सूचना मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा...
एप्रिल 16, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज (ता. 16) पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सुरक्षित पुणे, हरीत पुणे, गतीमान पुणे, आनंदी पुणे या चतुःसूत्रीवर या जाहीरनाम्यात जोशी यांनी भर दिला आहे. तर प्रत्येक पुणेकराच्या मनातील पुणे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल,...
एप्रिल 15, 2019
नागपूर - उन्हाची दाहकता वाढली असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयांनी पंधरा दिवसांपूर्वीच तळ गाठला. परिणामी शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यातही अशीच स्थिती असून, गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील धरणांतील पाण्याची स्थिती जलसंपदा विभागाच्या...
एप्रिल 14, 2019
देऊर ः लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात रंगत येऊ लागली आहे. रणरणत्या उन्हाळ्यात आणि दुष्काळातील ही निवडणूक नेते, उमेदवारांसाठी तापदायक ठरू पाहात आहे. यंदा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम व गडद तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. त्यामुळे मार्चपासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे....
एप्रिल 14, 2019
जळगाव ः राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने यंदा शेतकऱ्यांसह नागरिकांची निराशा केल्याचे चित्र आहे. दरवर्षी या अभियानाच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. ज्या गावांची या अभियानासाठी निवड केली होती त्यापैकी 454 गावे "जल परिपूर्ण' (पाणीदार) झाल्याची...
एप्रिल 14, 2019
मुंबई : ग्रामीण भागातील पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या तापमानामुळे अनेक लहान पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत. त्यातच मक्‍याचे भाव वाढल्यामुळे एक ते पाच हजार कोंबड्या पाळणाऱ्या व्यावसायिकांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील पुरवठा 10 ते 15 टक्के कमी झाल्याने चिकन महागच आहे. मुंबईत...
एप्रिल 11, 2019
कोल्हापूर - वनसंपदेने बहरलेल्या पश्‍चिम घाटात डोंगर, दऱ्या खोऱ्यातून नाल्याचे झऱ्यांचे पाणी वाहते. पावसाळ्यात येथे सुपानं पाऊस पडतो मात्र, उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा येथील भूमिपुत्र वर्षानुवर्षे सोसतो आहे. सुरू झालेल्या कडक उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहे. डोंगरी भागातील तब्बल 12 वाड्या...
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे...
एप्रिल 10, 2019
कऱ्हाड - पाण्यासाठी समृद्ध असणाऱ्या कऱ्हाड तालुक्‍यालाही यंदा पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. तालुक्‍यातील मसूरच्या पूर्वेकडील आणि दक्षिण मांड नदीच्या खोऱ्यातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतून टॅंकरने पाणी देण्याची मागणी झाली आहे. कऱ्हाड तालुक्‍यात लघुपाटबंधारे...
एप्रिल 09, 2019
पुणे - दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर...
एप्रिल 08, 2019
हिंगोली - मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न उग्र बनत असून ग्रामीण भागाची होरपळ सुरू आहे. अनेक गावांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. हिंगोलीच्या औंढा तालुक्‍यातील लक्ष्मण नाईक तांडा या गावातही अशीच स्थिती आहे. दोन पाणीपुरवठा योजना असूनही गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. दीड किलोमीटरवरून...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद - गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा ‘जुगाड’ करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली. या विहिरीतून २२ दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांवर आला आहे. कागजीपुऱ्यातील गावकऱ्यांनी...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी लागवडीमुळे हा...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद - गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा "जुगाड' करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली. या विहिरीतून 22 दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता 12 दिवसांवर आला आहे. कागजीपुऱ्यातील...
एप्रिल 08, 2019
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आश्‍वासनांचा अक्षरशः पाऊस पडत आहे; तर वास्तवात मात्र पाण्याअभावी घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा अंतर्विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना जाणवत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. वास्तविक या प्रश्‍नाची चर्चा उन्हाची भट्टी...
एप्रिल 07, 2019
येवला : गावांना पाणीटंचाई निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ मार्च, एप्रिल, मे या महिन्यात येते. खूपच भयानक टंचाई असेल तर जानेवारीपासून टँकर सुरू करण्याची वेळ आल्याचा अनुभव तालुक्याने घेतला आहे. मात्र, तालुक्यात वर्ष उलटला तरीही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 12 मार्च २०१८ टँकर...
एप्रिल 06, 2019
भोकरदन (जालना) : पाणी टंचाईमुळे गावातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी पाणी शेंदतांना पाय घसरु विहिरीत पडल्याने एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाला. आज शनिवार (ता.6) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ या गावात ही घटना घडली. दीपाली विष्णू शिंदे (वय 17) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील...
एप्रिल 03, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे (ता. चाळीसगाव) गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांआड केवळ दहाच मिनिटे पाणी मिळत असल्याने सध्याच्या रणरणत्या उन्हात अभोणेकरांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य...
एप्रिल 02, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘आम्हाला पोटाला भाकर नको पण पिण्यासाठी पाणी द्या’, अशी आर्त मागणी करुन कुंझर (ता. चाळीसगाव) येथील महिलांनी पोटतिडकीने आपली पाण्याची समस्या ‘सकाळ’कडे मांडली. गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी विशेषतः महिलांना वणवण भटकावे लागत आहे....
मार्च 28, 2019
नेरळ - कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाईला आदिवासी ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडात झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे यासाठी या आदिवासी वाडीमधील महिला रात्र विहिरीवर काढतात. कर्जतच्या आदिवासी भागात असे प्रकार नेहमीचे...